Home आंतरराष्ट्रीय Benjamin Netanyahu : नेतन्याहू जिंदा है तो… या दाव्यानं जगभर खळबळ
आंतरराष्ट्रीय

Benjamin Netanyahu : नेतन्याहू जिंदा है तो… या दाव्यानं जगभर खळबळ

70

गेल्या चोवीस तासांपासून सोशल मीडियावर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नेतन्याहू यांच्या खाजगी निवासस्थानावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्याची बातमी सुरुवातीला आली. या हल्ल्यात त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून नेतन्याहू आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षितपणे बंकरमध्ये हलवण्यात आल्याचे वृत्तही समोर आले. या सर्व घडामोडींमध्ये एक भारतीय पत्रकारही चर्चेत आले. इस्रायलमध्ये वार्तांकन करणारे आदित्य राज कौल यांनी नेतन्याहू यांनी एका ठिकाणाला दिलेल्या भेटीचा व्हिडिओ लाईव्ह केला. त्यानंतर काही क्षणांतच इराणच्या क्षेपणास्त्रांनी नेतन्याहू यांचा वेध घेतल्याची बातमी पसरली. तसेच आदित्य राज कौल यांना इस्रायली पोलिसांनी अटक केल्याचीही चर्चा झाली. या सगळ्यामुळे नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या. अखेर नेतन्याहू यांच्या कार्यालयाने हे सर्व वृत्त अफवा असल्याचे स्पष्ट केले. इस्रायलचे पंतप्रधान पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्या तब्येतीबाबतचे सर्व वृत्त खोटे असल्याचे सांगण्यात आले. मात्र या स्पष्टीकरणानंतर काही मिनिटांतच इराणच्या आयआरजीसीने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू जिवंत असतील तर त्यांना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून शोधून ठार मारू, अशी धमकी दिल्याने जगभर खळबळ उडाली आहे. ( Benjamin Netanyahu )

इराणबरोबर तीव्र युद्ध सुरू असताना नेतन्याहू यांच्याबाबतच्या अफवा अधिक वाढल्या आहेत. भारतीय पत्रकार आदित्य राज कौल यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात नेतन्याहू हवाई हल्ला झालेल्या ठिकाणाला भेट देताना दिसतात. त्यानंतरच त्यांच्या खाजगी निवासस्थानावर इराणचा हवाई हल्ला झाल्याची बातमी आली. यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली. दरम्यान सोशल मीडियावर नेतन्याहू यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला, ज्यात ते इराण युद्धाविषयी माहिती देताना दिसतात. मात्र त्या व्हिडिओत त्यांच्या उजव्या हाताला पाचऐवजी सहा बोटे असल्याचे दिसून आल्याने हा व्हिडिओ एआय किंवा डीपफेकद्वारे तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. काही वापरकर्त्यांनी सहा बोटांचे स्क्रीनशॉट शेअर करून त्याला एआय ग्लिच म्हटले. हा व्हिडिओ इस्रायली सरकारच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट झाल्याने गोंधळ अधिक वाढला आणि मृत्यूच्या अफवांना आणखी जोर मिळाला.

नेतन्याहू यांच्या मृत्यूची चर्चा एवढी वाढली की अखेर इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून ते आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर इराणच्या आयआरजीसीने इस्रायल आणि अमेरिकेवर आरोप करत तीव्र विधान केले. आयआरजीसीने नेतन्याहू यांना “बालखूनी” असे संबोधत, इराणवरील हल्ल्यांचा बदला घेण्याची धमकी दिली. ( Benjamin Netanyahu )

=======

हे देखील वाचा : Iran’s Kharg Island : खार्ग बेटावरील हल्ल्यामुळे युद्ध अधिक भडकणार

=======

आमच्या मुलांचा खून करणाऱ्या नेतन्याहूला कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच ते एकदा बचावले तरी सर्व शक्तीनिशी त्यांचा पाठलाग करून ठार मारले जाईल, असा इशाराही दिला. आयआरजीसीने नेतन्याहू यांना बालखूनी दर्शवणारी पोस्टरही प्रसिद्ध केली आहेत. दरम्यान, नेतन्याहू गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना दिसले नसल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे अफवा थांबत नाहीत. काही दाव्यांनुसार नेतन्याहू यांनी कुटुंबासह इस्रायल सोडून अन्य देशात आश्रय घेतल्याचेही सांगितले गेले आहे. ते कुठेही असले तरी शोधून ठार मारू, असा इशारा आयआरजीसीने दिला आहे. या सर्व दावे-प्रतिदाव्यांमुळे परिस्थिती अधिक साशंक झाली आहे. तसेच भारतीय पत्रकार आदित्य राज कौल यांना खरोखर अटक झाली आहे का, याबाबतही संभ्रम कायम आहे. इस्रायलच्या अधिकृत सोशल मीडियावर सहा बोटे दिसणारी चित्रफीत कशी प्रसारित झाली, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ( Benjamin Netanyahu )

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!