अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून २० जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. तेव्हापासून त्यांनी अवघ्या जगाला वेठीस धरल्याची चर्चा आहे. सुरुवातीला टॅरिफ कार्डाची धमकी देत त्यांनी जागतिक व्यापार क्षेत्रात अस्थिरता निर्माण केली. त्यानंतर ट्रम्प कॅनडा आणि ग्रीनलॅंडच्या मागे लागले आणि या देशांना अमेरिकेत सामावून घेण्याची भाषा करू लागले. जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत तेथील अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करून अमेरिकेच्या तुरुंगात टाकल्याचा दावा केला. शिवाय स्वतःला व्हेनेझुएलाचे “कार्यवाहक अध्यक्ष” म्हणून घोषित केले. त्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या ट्रम्प यांनी इराणबरोबर युद्ध सुरू केले. इराण कधीही अणुबॉम्ब तयार करू शकतो, हे जगासाठी धोकादायक असल्याचे सांगत सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांना बॉम्बहल्ल्यात मारण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभर महागाई आणि तिसऱ्या महायुद्धाचे सावट पसरले आहे. हे कमी की काय, म्हणून आता ट्रम्प आणखी एका देशाच्या मागे लागले आहेत. दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनाने क्युबावर केला आहे. ( Donald Trump )

क्युबामध्ये शासनबदल घडवून आणण्यासाठी तयारी सुरू केल्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयाला अमेरिकेतूनच विरोध होत आहे. आधीच इराणबरोबरच्या युद्धात अमेरिकेला मोठा फटका बसत आहे. या संघर्षामुळे युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मध्यपूर्वेतील देशांनाही या युद्धात ओढले गेले आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी क्युबामध्ये सत्तांतराचे संकेत दिल्याने त्यांच्याच देशात विरोधाची लाट उठली आहे.
इराणसोबतच्या युद्धात अमेरिका एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम केला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमक्या फोल ठरल्याचे म्हटले जाते. त्यांनी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन यांच्याकडे मदत मागितली, मात्र या देशांनी ती मागणी नाकारल्याची माहिती आहे. आता अमेरिकेतही तेलटंचाईची चिन्हे दिसू लागल्याने ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला आहे. तरीही त्यांनी आणखी एका देशाबरोबर संघर्षाचे संकेत दिले आहेत. अमेरिकन प्रशासनाने दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांच्या यादीत क्युबाचा पुन्हा समावेश केला असून ट्रम्प यांनी क्युबाला धडा शिकवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी क्युबाला अयशस्वी राष्ट्र म्हटले आहे. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले असले तरी इराणसोबतचे युद्ध संपल्यानंतर क्युबावर कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. ( Donald Trump )
=======
हे देखील वाचा : Benjamin Netanyahu : नेतन्याहू जिंदा है तो… या दाव्यानं जगभर खळबळ
=======
या घोषणेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या क्युबा गंभीर आर्थिक आणि ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. क्युबाचे अध्यक्ष मिगेल डियाझ-कॅनेल यांनी अमेरिकेसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. मात्र ट्रम्प यांनी व्हेनेझुएला आणि इराणमध्ये केलेल्या कारवाईसारखी कारवाई क्युबावर केली तर अमेरिका धडा शिकेल, अशी चेतावणी देत क्युबा आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या दहशतवाद प्रायोजक देशांच्या यादीत समावेश झाल्यामुळे क्युबावर कठोर निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे क्युबाचा आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांमध्ये प्रवेश मर्यादित झाला आहे. या आर्थिक नाकेबंदीचा फटका उद्योगक्षेत्राला बसला आहे. इंधन, अन्न आणि वीज टंचाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढला असून आंदोलनांची स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा फायदा घेत ट्रम्प यांनी क्युबामध्ये शासनबदलाची भाषा केली आहे. “मी क्युबाला मुक्त करू शकतो आणि त्यावर कब्जाही करू शकतो. मला त्याच्यासोबत जे करायचे आहे ते करू शकतो,” असे वक्तव्य करत त्यांनी हस्तक्षेपाचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांच्या या “हम करे सो कायदा” वृत्तीवर अमेरिकन जनतेतूनही टीका होत आहे. ( Donald Trump )
– सई बने
- Ayatollah Khamenei strike
- China France UK stance
- Cuba regime change
- Donald Trump foreign policy
- economic blockade Cuba
- energy crisis America
- geopolitical tensions 2026
- global inflation impact
- global oil shortage
- Hormuz Strait crisis
- international diplomatic crisis
- international sanctions Cuba
- Middle East conflict
- Miguel Diaz Canel statement
- NATO allies response
- Nicolás Maduro arrest
- oil supply disruption
- regime change strategy
- rising global instability.
- state sponsor of terrorism list
- US domestic opposition
- US global isolation
- US military escalation
- US–Iran war
- Venezuela intervention