Home लाईफ स्टाईल Sunglasses : उन्हाळ्यासाठी सनग्लासेस खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की पाहा
लाईफ स्टाईल

Sunglasses : उन्हाळ्यासाठी सनग्लासेस खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की पाहा

71
Fitness Career
Fitness Career

वाढत्या उन्हामुळे सगळ्यांनाच खूप त्रास होत आहे. उन्हामुळे अंगाची होणारी लाही लाही खूपच त्रासदायक ठरत आहे. या उन्हाचा त्रास आपल्या डोळ्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. दिवसागणिक वाढत चाललेल्या वातावरणातील उष्णतेमुळे घराबाहेर पडणे देखील नकोसे झाले आहे. ऊन कितीही आले तरी नोकरी व्यवसायाला आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणाऱ्या लोकांना भर उन्हात घराबाहेर पडणे अनिवार्य असते. मग अनेकदा लोकं वेगवेगळे उपाय करत कडक उन्हापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. वाढत्या उन्हामुळे तर दिवसाच्या कोणत्याही वेळेत समोरचे काही दिसणेदेखील कठीण होऊन बसते. अशावेळी लोकं सनग्लासेस वापरण्याचा पर्याय निवडतात. सनग्लासेस वापरण्यामुळे डोळ्यांचे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून रक्षण होते, त्यामुळे अनेकजण प्रकर्षाने उन्हाळ्यात सनग्लासेस खरेदी करतात. पण तुम्ही खरेदी केलेले सनग्लासेस उन्हाळ्यासाठी योग्य आहेत की नाही किंवा यामुळे तुमच्या डोळ्यांचे खरंच उन्हापासून रक्षण होणार आहे का? (Sunglasses)

उन्हापासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी सामान्यतः सनग्लासेसचा वापर केला जातो. सनग्लासेस लावल्याने डोळ्यांना तीव्र सूर्यप्रकाश येण्यापासून प्रतिबंध होतो, ज्यामुळे तुम्ही सूर्यप्रकाशातही सहज पाहू शकता. हे सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून आणि तेजस्वी प्रकाश थेट तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यापासून डोळ्यांचे संरक्षण करते. UVA आणि विशेषत: UVB किरण डोळ्यांच्या पृष्ठभागाच्या ऊतींचे, कॉर्निया आणि लेन्सला नुकसान करतात, ज्यामुळे कालांतराने डोळ्यांच्या आणि दृष्टीच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. (Eye Care)

ऑप्टिकली करेक्ट आणि स्क्रॅच रेझिस्टंट लेन्सची निवड करा. चांगल्या दर्जाच्या मटेरियलपासून तयार झालेले सनग्लासेस दीर्घकाळ टीकतात. तुम्ही जर जास्त काळ सूर्यप्रकाशात वावरत असाल किंवा गाडी चालवत असाल तर पोलोराइज लेन्स वापरा. त्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही. सनग्लासेसची गुणवत्ता आणि सुरक्षिततेची हमी देणारी अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स इन्स्टीट्यूट (ANSI) किंवा युरोपियन कॉन्फॉर्मिटीची (CE) लेबल्स सनग्लासेसवर आहेत का ते बघा. तुमच्या कानावर आणि नाकावर सनग्लासेस नीट बसणं आवश्यक आहे. तसेच डोळेही नीट कव्हर होण्याची गरज असते. त्यामुळे व्यवस्थित फिटींग असलेल्या सनग्लासेसची निवड करा. (Todays Marathi Headline)

Sunglasses
how-to-choose-best-sunglasses-for-summer

सनग्लासेस खरेदी करताना, आपल्या चेहऱ्याचा आकार देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एव्हिएटर आणि रिफ्लेक्ट सनग्लासेस अंडाकृती चेहऱ्यावर चांगले दिसतात. असा फेस कट असलेल्या महिला रेक्टॅंगलर, ओवल किंवा राउंड फ्रेम घालू शकतात. जर तुमचा स्‍कायर फेस असेल तर तुम्ही कलर फ्रेम, ओवल, राउंड आणि टियर ड्रॉप शेप फ्रेम, फ्रेमलेस आणि कॅट आय सनग्लासेस सहज खरेदी करू शकता. यांवरही एव्हिएटर्स देखील तुम्हाला सूट होईल. हार्टशेप फेसवर एव्हिएटर्स, फ्रेमलेस ग्लासेस, न्यूट्रल कलर फ्रेम्स आणि अगदी लहान फ्रेम्सही छान दिसतील. त्याचबरोबर ट्रॅंगलर फेसवर राउंड ग्लासेस, एविएटर्स, कॅट आय ग्लासेस आणि ट्रान्सपरंट फ्रेमलेस ग्लासेस चांगले दिसतात. (Social Updates)

जर तुम्ही उन्हाळ्यासाठी सनग्लासेस खरेदी करत असाल तर फ्रेमचे मटेरिअल काळजीपूर्वक निवडावे. जड सनग्लासेस घेतल्यास घाम येण्याची शक्यता वाढते. तुमच्या सोयीनुसार गॉगल्सच्या फ्रेमचे मटेरिअल निवडा. खरं तर, सूर्यप्रकाशात गेल्यावर स्टीलच्या फ्रेम्सने तुमची त्वचा जळू शकते किंवा डाग करू शकते म्हणून तुम्ही पॉली कार्बोनेट, प्लास्टिक किंवा नायलॉन टायटॅनियम फ्रेम निवडल्यास अधिक चांगले होईल. (Top Trending News)

जेव्हाही तुम्ही सनग्लासेस खरेदी कराल तेव्हा तुमच्या चेहऱ्याच्या आकारासाठी फ्रेम योग्य असल्याची खात्री करा. जर सनग्लासेस मोठे असेल तर ते सैल दिसेल आणि जर ते लहान असेल तर तुम्ही अस्वस्थ व्हाल कारण ते चेहऱ्यावर घट्ट बसतील. म्हणूनच सनग्लासेस घालताना नेहमी खाली वाकून पहा, ते पडत नाहीत याची खात्री करा. कारण उन्हाळ्यात सनग्लासेस तुमच्या डोळ्यांचे रक्षण करते. योग्य फ्रेम तुमचा चेहरा हायलाइट करेल आणि फ्रेमचा लूक तुमच्या सौंदर्यात भर घालेल. (Latest Marathi Headline)

सनग्लासेस खरेदी करताना, त्यांच्या रंगावर जाऊ नका. सनग्लासेसची काच गडद रंगाची आहे म्हणून तो तुमच्या डोळ्यांसाठी सुरक्षित असेलच असे नाही. केवळ 100 टक्के UV किरणे ब्लॉक असलेले सनग्लासेसची खरेदी करा. पोलराइज्ड लेन्स किंवा रस्त्यांसारख्या परावर्तित पृष्ठभागांवरून परावर्तित होणाऱ्या सूर्यकिरणांची चमक कमी करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. सूर्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी, मोठ्या आकाराचे सनग्लासेस घालणे महत्वाचे आहे जेणेकरून सूर्यापासून निघणारे अतिनील किरण तुमच्या डोळ्यांत जाण्यापासून रोखतील. रंगीत लेन्स असलेले सनग्लासेस सूर्याला जास्त रोखत नाहीत. तथापि, तपकिरी किंवा गुलाबी रंगाच्या लेन्स अधिक विरोधाभासी प्रकाश प्रदान करतात. गोल्फ किंवा बेसबॉल सारख्या खेळातील खेळाडू या रंगाचे सनग्लासेस घालतात. (Top Stories)

======

Hair Fall Remedies : केसगळती थांबवायची आहे? स्कॅल्प मसाजची ही खास पद्धत फॉलो करा, महिन्याभरात दिसेल फरक

======

लोक बाजारातून स्वस्तातला चष्मा विकत घेतात. अशा सनग्लासेसमध्ये फक्त गडद रंगाच्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या लेन्स असतात जे अतिनील किरणांपासून कोणत्याही प्रकारे संरक्षण करत नाहीत. म्हणून, नेहमी चांगल्या ठिकाणाहून 100 टक्के सनग्लास संरक्षण असलेले चष्मे खरेदी करा. सनग्लासेस खरेदी करण्यापूर्वी डोळ्याच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर डोळ्यांची तपासणी करून योग्य प्रकारचे सनग्लासेस निवडण्यात मदत करू शकतात. सनग्लासेस खरेदी करणार असाल तर त्याचे मटेरियल कसे असेल याची सुद्धा माहिती घ्यावी. ते स्क्रॅच फ्री आहे की नाही हे सुद्धा पहा. बहुतांश लोक रस्त्यावरून एक्रेलिक लेन्स खरेदी करतात. जे तुमच्या डोळ्यांसाठी नुकसानदायक ठरू शकते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!