आर्य चाणक्य हे भारतातील अतिशय महान आणि मोठे विचारवंत होते. त्यांनी जवळपास सर्वच विषयांवर त्यांचे विचार व्यक्त केले आहेत. आचार्य चाणक्य हे केवळ एक महान राजकारणी नव्हते, तर ते मानवी स्वभावाचे उत्तम पारखी देखील होते. त्यांनी आपल्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात अनेक गोष्टींवर त्यांचे विचार मांडले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कायम आनंद किंवा सुख असते असे नाही. सगळ्यांच्याच आयुष्यात नेहमीच सुख आणि दुःख येत असतात. आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, त्यांच्या वागणुकीचा, बोलण्याचा परिणाम आपल्यावर देखील नकळत होत असतो. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल आणि सुखी राहायचे असेल तर तुम्ही काही लोकांपासून दूर राहिले पाहिजे. (Chanakyaniti)
चाणक्य नीतीनुसार, माणसाची ओळख त्याच्या संगतीवरून होते. आपण ज्या लोकांसोबत राहतो, त्यांच्या विचारांचा आणि ऊर्जेचा आपल्यावर नकळत परिणाम होत असतो. चुकीच्या प्रवृत्तीचे लोक केवळ तुमचे नुकसान करत नाहीत, तर ते तुमच्या चारित्रावरही डाग लावू शकतात. म्हणूनच, कोणाला मित्र बनवायचे आणि कोणाशी केवळ औपचारिक नाते ठेवायचे, याची समज असणे सुखी जीवनासाठी अनिवार्य आहे. (Marathi)
स्वार्थी व्यक्ती
चाणक्य नितीनुसार, स्वर्थी आणि मतलबी व्यक्तीपासून दूर राहिलं पाहिजे. कारण ही व्यक्ती नेहमी स्वतःचाच फायदा पाहतो. स्वतःच्या फायद्यासाठी ही लोक दुसऱ्यांना नुकसान पोहचवण्यातही मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे ज्यांनी स्वतःचे हित प्रथम ठेवले त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे, असा सल्ला आचार्य चाणक्या यांनी दिला आहे. (Todays Marathi Headline)
कपटी व्यक्ती
कपटी व्यक्ती हा कोणालाच सोडत नाही. ही लोक एखाद्याची फसवणूक करण्यास मागे पुढे पाहत नाही. ते तुमच्यासोबतही केव्हा काय करतील याचा नेम नाही. संधी मिळताच ते तुमचा विश्वासघात करत तुमची फसवणूक करु शकता त्यामुळे आशा व्यक्तीपासून नेहमी दूर राहावे. (Top Marathi News)

चिडखोर व्यक्ती
आचार्य चाणक्य यांच्यानुसार जी व्यक्ती सतत संतापलेली असते. ज्याला छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, अशी व्यक्ती केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही समस्या निर्माण करणारी ठरते. चाणक्य नितीनुसार, माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा त्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक कळत नाही. आणि तो चुकीच असं पाऊल उचलतो. जे त्याच्यासह त्याच्या सोबतच्या लोकांसाठी समस्या निर्माण करणार ठरतं. त्यामुळे अशा व्यक्तीपासून दूर राहिलेले चांगले. (Top Trending News)
नकारात्मक विचार असलेले लोकं
नकारात्मक विचार असलेले लोकदेखील यश मिळवू शकत नाहीत. कारण कोणतेही काम करण्याआधीच असे लोक त्याबद्दल नकारात्मक विचार तयार करतात. नकारात्मक विचारांमुळे तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात आणि व्यक्ती आपले ध्येय साध्य करू शकत नाही. त्यामुळे माणसाने हा दोष लगेच आपल्यात सोडला पाहिजे. (Latest Marathi Headline)
अतिप्रशंसा करणारी व्यक्ती
जर कोणी तुमची विनाकारण सतत प्रशंसा करत असेल तर त्याच्यापासून दूर राहा. अशी व्यक्ती तुम्हाला तुमच्या उणीवा न सांगून तुम्हाला अंधारात ठेवेल. अशी व्यक्ती खोटी स्तुती करून आपले काम करून घेतात. तुमच्या शक्ती आणि पैशामुळे ते तुमच्याशी जवळीक साधताता. या लोकांपासूनही दूर राहावे असे चाणक्या नितीत सांगितले आहे. (Top Stories)
========
Chaturthi : वैशाख महिन्यात येणाऱ्या विकट संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि माहिती
========
दुसऱ्यांचे गुपित उघडणारे
जी व्यक्ती इतरांची गुपिते सर्वांसमोर उघड करतात त्यांच्यावर कधी विश्वास ठेवू नये. जर ती व्यक्ती दुसऱ्याचे गुपित तुमच्यासमोर उघड करत असेल तर तो तुमचे गुपितही इतरांकडे उघड करु शकतो. यामुळे तुमचे खूप नुकसान होऊ शकते. अशा लोकांपासून नेहमी अंतर राखले पाहिजे.
सतत रडगाणे करणारे लोकं
काही लोक आयुष्यात कितीही सुख मिळाले तरी नेहमी आपल्या दुःखाचे प्रदर्शन करतात आणि नकारात्मकता पसरवतात. अशा लोकांशी जास्त जवळिक ठेवल्यास तुमच्या मनातील सकारात्मकता नष्ट होते आणि तुम्हीही नैराश्याकडे झुकू लागता. (Social News)
( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)