मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आल्यानंतर लोकं गगनचुंबी उंच उंच इमारती बघून चक्रवतात. कारण या अशा मोठया शहरांमध्ये लोकसंख्या जास्त आणि राहण्यासाठी जागा कमी असल्याने एकावर एक असे अनेक मजले चढवून उंच बिल्डिंग बांधल्या जात आहेत. मात्र आता तर उंच बिल्डिंग बांधण्याची जणू स्पर्धाच चालू आहे. कारण अनेक मेट्रो सिटीमध्ये आपल्याला अनेक उंच बिल्डिंग पाहायला मिळतात. आता उंच बिल्डिंग म्हटल्यावर अनेक लोकांना 25 ते 30 मजले असलेली बिल्डिंग डोळ्यासमोर येते. मुंबईमध्ये तर 50 मजली उंच बिल्डिंग देखील सहज पाहायला मिळतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की, जागातल्या सर्वात उंच बिल्डिंग कोणत्या आहेत आणि त्या किती मजली आहेत? (Towers)
बुर्ज खलिफा
आता जगातील सर्वात उंच बिल्डिंग म्हटल्यावर सर्वांनाच पहिले नाव माहितीच असेल आणि ते म्हणजे ‘बुर्ज खलिफा’. दुबईतली बुर्ज खलिफा ही जगातली सर्वांत उंच इमारत आहे. या इमारतीला 163 मजले असून, तिची उंची 828 मीटर्स अर्थात 2717 फूट आहे. या बुर्ज खलिफा इमारतीचे अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्यामुळे या इमारतीला कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे.

मर्डेका 118
ही इमारत क्वालालंपूर मलेशिया येथील आहे. बुर्ज खलिफा नंतर याच इमारतीचा नंबर लागतो. या इमारतीला पीएनबी 118 म्हणून देखील ओळखले जाते. या बिल्डिंगची उंची 678.9 मीटर आहे. ही जगातील दुसरी आणि आग्नेय आशियातील सर्वात उंच इमारत आहे. 118 मजले असल्यामुळेच या इमारतीला मर्डेका 118 असे म्हटले जाते.

शांघाय टॉवर
चीनमधील शांघाय टॉवर जगातील तिसरी सर्वात उंच इमारत आहे. या टॉवरची उंची 632 मीटर आहे आणि यामध्ये 128 मजले आहेत. त्याची वक्र रचना जोरदार हवेचा दाब कमी करण्यास मदत करते.

मक्का क्लॉक रॉयल टॉवर
ही इमारत सौदी अरेबिया येथे आहे. या इमारतीची उंच 601 मीटर आहे. टॉवर मक्कामध्ये जगातील सर्वात मोठे घड्याळ आहे. या इमारतीमध्ये 120 माजले आहेत. ही इमारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. 1,972 फूट आहे. 2012 साली या टॉवरची निर्मिती झाली होती. (LAtest Marathi Headline)

वर्ल्ड ट्रेड सेंटर
वर्ल्ड ट्रेड सेंटर ही इमारती न्यूयॉर्क शहरत आहे. 2014 साली या इमारतीचे काम पूर्ण झाले होते. या इमारतीची उंची ही 1776 फूट आहे. 2001 साली याच वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये अल-कायदाच्या अतिरेक्यांनी हायजॅक केलेली दोन विमाने ‘ट्विन टॉवर्स’वर धडकवल्यामुळे सुमारे २,९९७ लोकांचा मृत्यू झाला. हा जगातील आजवरचा मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.

पिंग ॲन फायनान्स सेंटर
पिंग ॲन फायनान्स सेंटर ही चीनमधील शेन्झेन शहरात स्थित एक अत्यंत उंच गगनचुंबी इमारत आहे। २०१७ मध्ये पूर्ण झालेली, ही ५९९.१ मीटर (१,९६६ फूट) उंच, ११५ मजली इमारत शेन्झेनमधील सर्वात उंच, चीनमधील दुसरी आणि जगातील चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत मानली जाते. या इमारतीमध्ये जगातील सर्वात वेगवान लिफ्ट सिस्टीमपैकी एक सिस्टीम आहे. (Top Trending News)

लोटे वर्ल्ड टॉवर
लोटे वर्ल्ड टॉवर हे टॉवर दक्षिण कोरियामधील सोलमध्ये आहे. हे टॉवर 555 मीटर उंच आहे. या टॉवरची रचना पारंपारिक कोरियन कलेपासून प्रेरित आहे. या टॉवरमध्ये एक शॉपिंग एरिया, लक्झरी निवासस्थाने आणि एक प्रतिष्ठित हॉटेल आहे. लोटे वर्ल्ड टॉवर ही १२३ मजली गगनचुंबी इमारत आहे, जी जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक आहे. (Social News)

इंटरनॅशनल कॉमर्स सेंटर
इंटरनॅशनल कॉमर्स सेंटर ही इमारत हाँगकाँग, चीन येथे आहे. या इमारतीची उंची ही 1,588 फूट इतकी आहे. या इमारतीचे बांधकाम हे 2010 मध्ये पूर्ण झाले होते.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics