Home आरोग्य Eye Care : तीव्र उन्हामुळे तुमच्याही डोळ्यांची जळजळ होते? मग ‘हे’ उपाय कराच
आरोग्य

Eye Care : तीव्र उन्हामुळे तुमच्याही डोळ्यांची जळजळ होते? मग ‘हे’ उपाय कराच

71
Diwali

उन्हाळ्यात तीव्र उन्हाचा जसा आपल्या त्वचेवर, आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो तसाच परिणाम आपल्या डोळ्यांवर देखील होतो. डोळे हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील अवयव आहे. त्यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे खूपच आवश्यक आहे. अनेकदा अतिउष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ होते, डोळ्यांमध्ये कोरडेपणा देखील जाणवतो. डोळे दुखतात, डोळ्यांसमोर अंधारी देखील येते. वाढती उष्णता, आर्द्रता आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे डोळे कोरडे पडणे, डोळ्यांमध्ये खाज येणे आणि अंधुक दिसणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उन्हाळ्यात सूर्याची किरणे खूप तीव्र असतात, त्यामुळे डोळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी चष्मा लावणे योग्य ठरते. उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे असते. (Eye Care)

सूर्याची किरणे अधिक प्रखर होत असल्याने अनेकांचे डोळे कोरडे पडतात. अति उष्णतेमुळे शरीरातले पाणी शोषून घेतले जाते, ज्यामुळे डोळ्यांमधील पाणी देखील सुकते. अशावेळी डोळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर कोरड्या डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. म्हणून उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. (Marathi)

AC चा जास्त वापर टाळा
उन्हाळ्यात प्रत्येकांच्या घरात एसी चालतो, एसीची थंडगार हवा आल्हाददायी वाटत जरी असली तरी ही वा तुमचे डोळे कोरडे करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. एसी तुमच्या खोलीतील आर्द्रतेची पातळी लक्षणीयरीत्या कमी करते, ज्यामुळे तुमचे डोळे खूप कोरडे होऊ शकतात. ज्यामुळे जास्त AC खाली बसल्यामुळे डोळ्यांची जळजळ देखील होऊ शकते. हे टाळण्यासाठी, खोलीत आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी ह्युमिडिफायर वापरावे. एसी रूममध्ये जास्त वेळ थांबू नये, काही वेळ बाहेर जावे किंवा काही वेळ एसी बंद करावा. यामुळे तुमचे डोळे हायड्रेट राहण्यास मदत होईल. (Todays Marathi HEadline)

Eye Care

सन ग्लासेस वापरा
सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी ज्या प्रकारे सनस्क्रीन वापरणे खूप महत्वाचे आहे. त्याप्रमाणे अतिनील किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करणे देखील तितकेच गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असता तेव्हा तुमच्या डोळ्यांच्या पृष्ठभागावरची आर्द्रता कमी होते. हे टाळण्यासाठी, 100 टक्के अतिनील संरक्षणासह सनग्लासेसचा वापर करावा. यामुळे तुमच्या डोळ्याभोवती ओलावा जमा होण्यास मदत होईल. (Top Marathi News)

हायड्रेटेड रहा
शरीर निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी पिणे महत्वाचे आहे, परंतु तुमचे डोळे कोरडे होऊ नयेत म्हणून तुम्ही हायड्रेशनची देखील काळजी घेतली पाहिजे. या उष्णतेमध्ये, शरीर सहज निर्जलीकरण होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही रोज 4 ते 6 लिटर पाणी प्यावे. यामुळे डोळ्यांमध्ये पाणी तयार होण्यास आणि डोळ्यांमधील ओलावा कायम राखण्यास मदत होईल. (Latest Marathi Headline)

मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर मर्यादित करा
आजच्या काळात मोबाईल फोन किंवा लॅपटॉप सारख्या डिजिटल उपकरणांचा जास्त वापर केला जात आहे. डोळ्यांसाठी हे फारसे चांगले नाही. कारण यामुळे डोळ्यांवर अधिक दबाव पडतो, आणि डोळ्यांचे नैसर्गिक लुकलुकण्याचे प्रमाण देखील कमी होते. ज्यामुळे डोळे कोरडे होऊ शकतात. म्हणून, डिजिटल उपकरणांचा अत्यधिक वापर करणे टाळा. यासाठी तुम्ही 20-20-20 चा नियम पाळू शकता. याचा अर्थ असा स्क्रीन टाइम नंतर दर 20 मिनिटांनी, 20 फूट दूर काहीतरी पाहण्याचा 20 सेकंद प्रयत्न करा. असे केल्याने तुमच्या डोळ्यांच्या स्नायू कार्यशील होतील. आणि कोरडेपणापासूनही आराम मिळेल. (Top Stories)

========

Skin Care : उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय

========

योग्य आहार
आहाराचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो. जर आहारात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा अभाव असेल, तर डोळे कोरडे होण्याची शक्यता जास्त असते. डोळ्यांसाठी लाभदायक असणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये बदाम, आक्रोड, फ्लॅक्ससीड्स (अळशीच्या बिया), पालक, गाजर, संत्री आणि मका यांचा समावेश करावा. यामुळे डोळ्यांना आवश्यक पोषण मिळेल आणि डोळे तंदुरुस्त राहतील. (Social News)

(टीप: ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून, कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!