Home आंतरराष्ट्रीय Darya-e-Noor : भारतातून लुटलेला ‘दर्या-ए-नूर’ अजूनही इराणच्या खजिन्यात
आंतरराष्ट्रीय

Darya-e-Noor : भारतातून लुटलेला ‘दर्या-ए-नूर’ अजूनही इराणच्या खजिन्यात

70
महाराणा प्रताप

America-Iran युद्धाची दाहकता वाढली आहे. युद्धामध्ये क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असला तरी इराणमधील जनतेपुढे सर्वात मोठे संकट महागाईचे आहे. इराण सध्या गंभीर आर्थिक संकट आणि चलनवाढीचा सामना करत आहे. अन्न आणि दूध यांसारख्या मूलभूत गरजाही आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या स्थितीत इराणचा आधार सेंट्रल बँक ऑफ इराणच्या तिजोरीत असलेल्या शाही दागिन्यांवर आहे. ( Darya-e-Noor )

इराणच्या राजघराण्याचे प्रसिद्ध शाही दागिने तेहरानमधील फिरदौसी अव्हेन्यूवरील सेंट्रल बँक ऑफ इराणच्या तिजोरीत सुरक्षित ठेवलेले आहेत. हा खजिना ‘राष्ट्रीय रत्नांचा खजिना’ म्हणून ओळखला जातो. या खजिन्यावरच इराणच्या सरकारचा सध्या आर्थिक डोलारा उभा आहे. विशेष म्हणजे, इराणच्या या शाही खजिन्यातील अनेक अमूल्य रत्न, माणिक आणि जडजवाहिर भारतातील आहेत.

नादिर शाहने दिल्लीवर स्वारी केली तेव्हा तेथील खजिना लुटण्यात आला. यात दिल्लीचे प्रसिद्ध मयूर सिंहासन, कोहिनूर हिरा आणि दर्या-ए-नूर हिरा यांचा प्रामुख्याने समावेश होता. कोहिनूर हिरा नंतर ब्रिटनच्या राजघराण्याकडे गेला. मयूर सिंहासन वितळवून त्यातील सोने आणि रत्न वेगळे करण्यात आले. मात्र भारतातून लुटलेला ‘दर्या-ए-नूर’ हिरा अजूनही इराणच्या तिजोरीतील सर्वात मोठा हिरा मानला जातो. आज हा हिरा इराणच्या शाही खजिन्याचा भाग असून त्याच शाही खजिन्याच्या बळावर इराणमधील प्रशासन उभे आहे. ( Darya-e-Noor )

इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तेल डेपोंना आग लागली आहे. राजधानी तेहरानमधून मोठे आगीचे लोट दिसत आहेत. आकाशात काळे ढग दाटले असून काही ठिकाणी काळ्या पावसाच्या घटनाही नोंदवल्या गेल्या आहेत. अशा भयाण वातावरणात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आधीच मूलभूत गरजेच्या वस्तूंच्या किंमती वाढल्या होत्या; आता युद्धामुळे दूध आणि खाद्यवस्तूंची टंचाई वाढली आहे. अशा परिस्थितीत इराणचा प्रशासकीय गाडा कसा चालतो, याचे उत्तर या शाही खजिन्यात दडलेले आहे.

इराणच्या राजघराण्यातील हा शाही खजिना आता सेंट्रल बँकेच्या ताब्यात सुरक्षित आहे. जरी तो राजघराण्याचा खजिना म्हणून ओळखला जात असला तरी त्यात भारतातून लुटून आणलेल्या अनमोल रत्नांचा मोठा वाटा आहे. शतकानुशतके हा खजिना देशाच्या चलन आणि आर्थिक स्थैर्याचा प्रमुख आधार मानला जातो. ( Darya-e-Noor )

इराणचा शाही खजिना हा जगातील सर्वात मोठ्या आणि मौल्यवान ऐतिहासिक खजिन्यांपैकी एक आहे. सध्या तो तेहरानमधील राष्ट्रीय रत्नांच्या खजिन्यात सुरक्षित ठेवलेला आहे. याच खजिन्यात भारतातील सुप्रसिद्ध ‘दर्या-ए-नूर’ हिरा आहे. सुमारे १८२ कॅरेट वजनाचा हा गुलाबी हिरा जगातील सर्वात मोठ्या गुलाबी हिऱ्यांपैकी एक मानला जातो. हा हिरा एकेकाळी मुघल साम्राज्याच्या तिजोरीचा भाग होता.

१७३९ मध्ये पर्शियन शासक नादिर शाहने दिल्लीवर आक्रमण करून अनेक अमूल्य खजिने पर्शियाला नेले. यात दर्या-ए-नूरचा समावेश होता. दिल्लीतील लुटीत कोहिनूर हिरा, शाहजहानचे रत्नजडित मयूर सिंहासन, सुमारे ७०० दशलक्ष रुपयांचे सोने-चांदीची नाणी, मौल्यवान दगड, दागिने आणि शाही भांडी यांचा समावेश होता. तसेच रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणात दंड आणि खंडणी वसूल करण्यात आली. ( Darya-e-Noor )

=======

हे देखील वाचा : Gangaur Festival : गणगौर उत्सवासाठी परदेशी पर्यटकांनी जयपूर गजबजले

=======

१६ मे १७३९ रोजी नादिर शाह हा सर्व खजिन्यासह पर्शियाला परतला. त्यानंतर ही संपत्ती शाही खजिन्यात जमा झाली. कोहिनूर हिरा नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि आज तो ब्रिटनच्या राजमुकुटात मढवलेला आहे. मयूर सिंहासन वितळवून त्यातील सोने आणि रत्न वेगळे करण्यात आले व त्यांचा वापर राजघराण्यातील दागिने बनवण्यासाठी करण्यात आला. या खजिन्याची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये असल्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार त्याची किंमत २० ते ५० अब्ज डॉलर्सदरम्यान असू शकते. ( Darya-e-Noor )

१९३७ मध्ये इराणचे शासक रेझा शाह पहलवी यांनी शाही खजिना राजवाड्यातून सेंट्रल बँकेच्या नियंत्रणाखाली देण्याचा आदेश दिला. त्यानंतर हा खजिना देशाची राष्ट्रीय संपत्ती मानला गेला. आजही हा खजिना इराणच्या मध्यवर्ती बँकेच्या ताळेबंदात राष्ट्रीय राखीव म्हणून नोंदवला जातो. या संपूर्ण खजिन्यात भारताची शान असलेला दर्या-ए-नूर हिरा अजूनही सुरक्षित आहे.

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!