America, Israel आणि Iran यांच्यातील युद्धामुळे जग भीषण विनाशाकडे जात आहे. अमेरिकेने आपल्या हवाई दलाची सर्वात शक्तिशाली सामरिक ताकद एकाच वेळी तैनात केली आहे. अमेरिकेचे तीनही लांब पल्ल्याचे स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स – B-2 Spirit, B-1 Lancer आणि B-52 स्ट्रॅटोफोर्ट्रेस – एकाच वेळी सक्रिय लढाऊ तैनातीत असण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे, इराणने आपल्या शेवटच्या शस्त्रापर्यंत अमेरिकेसोबत लढा देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मध्यपूर्वेतील हल्लेही अधिक आक्रमक करण्यात आले आहेत. त्यामुळे हे युद्ध अणुयुद्धाकडे सरकत असल्याची भीती व्यक्त होत आहे. असे झाल्यास फक्त या तीन देशांनाच फटका बसणार नाही, तर संपूर्ण जग पुढील काही वर्षे अणुयुद्धाच्या ज्वाळांमध्ये होरपळेल. तज्ज्ञांनी जगावर न्यूक्लियर विंटरचे सावट गडद होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. ( US-Iran-Israel )

न्यूक्लियर विंटर म्हणजे मोठ्या प्रमाणात अणुयुद्ध झाल्यास निर्माण होणारी कृत्रिम थंडी. तज्ज्ञांच्या मते हे वातावरण इतके घातक असू शकते की सूर्यप्रकाशही पृथ्वीवर पोहोचणार नाही. अणुयुद्धामुळे मातीचे आणि धुराचे कण वातावरणात पसरतील. त्यामुळे कडाक्याची थंडी आणि दूषित वातावरणाचा सामना मानवाला करावा लागेल. निसर्गावर याचे गंभीर परिणाम होतील, वृक्षसंपदा नष्ट होईल आणि जलसाठे प्रदूषित होतील, अशी भीती आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
अमेरिका-इराण युद्धाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. या युद्धात दोन्ही देशांकडून अधिक घातक हत्यारांचा वापर होत आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि जलस्रोतांची मोठी हानी होत आहे. दोन्ही बाजूंनी अणुबॉम्बचा वापर होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात इराणमध्ये दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के अणुचाचणीचे परिणाम असू शकतात, असा संशय व्यक्त होत आहे. अमेरिकेतही अशाच प्रकारचे भूकंप जाणवल्याने अमेरिका अणुयुद्धाची तयारी करत असल्याची शंका व्यक्त होत आहे. ( US-Iran-Israel )
इराणने इस्रायलवर विनाशकारी हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. हा हल्ला अणुबॉम्बच्या स्वरूपात असू शकतो, असा कयास आहे. तसे झाल्यास इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिका इराणवर अणुबॉम्बचा वापर करू शकते. अशा परिस्थितीत जगावर न्यूक्लियर विंटरचे सावट पसरेल. न्यूक्लियर विंटर म्हणजे अणु हिवाळा — मोठ्या प्रमाणातील अणुस्फोटांमुळे निर्माण होणाऱ्या आगी, धूर आणि काजळी वरच्या वातावरणात पोहोचतात. ही काजळी इतक्या मोठ्या प्रमाणात असते की ती सूर्यप्रकाश रोखू शकते. सूर्यप्रकाश कमी झाल्यास पृथ्वीवरील तापमानात मोठी घट होते. यामुळे मानव, प्राणी-पक्षी आणि पिकांवर गंभीर परिणाम होतात. जलसाठे दूषित झाल्याने भविष्यात दुष्काळाचे सावट निर्माण होऊ शकते.
=======
हे देखील वाचा : Iran : अमेरिका, इस्रायलसह इराणच्या महिला सैनिकही आता रणांगणात !
=======
अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत असलेल्या शस्त्रास्त्रांच्या वापरामुळे आधीच पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. इराणच्या तेहरानमधील आकाशात काळे ढग दाटले आणि काळ्या रंगाचा पाऊस पडल्याच्या घटना घडल्या. तज्ज्ञांच्या मते हा प्रकार न्यूक्लियर विंटरच्या प्रारंभिक लक्षणांसारखा असू शकतो. युद्ध थांबण्याऐवजी अधिक भीषण होत चालले आहे. अमेरिकेचे सुपरसॉनिक बॉम्बर बी-१बी लान्सर ब्रिटिश एअरबेसवर उतरले आहे. ‘द बोन’ म्हणून ओळखले जाणारे हे विमान ताशी १४४८ किमी वेगाने उड्डाण करू शकते आणि एकाच वेळी २४ क्रूझ क्षेपणास्त्रे डागू शकते. त्यामुळे अमेरिका इराणच्या भूमिगत अणु तळांना लक्ष्य करणार असल्याची माहिती आहे. ( US-Iran-Israel )
असे झाल्यास इराणकडूनही प्रतिहल्ला होण्याची शक्यता आहे. तेहरानमध्ये पडणाऱ्या काळ्या पावसामुळे नागरिकांना डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रकार ‘अॅसिड रेन’शी संबंधित असू शकतो. तेहरानमधील अनेक तेल साठवण केंद्रांना आग लागल्याने जळत्या इंधनाचा वास हवेत पसरला आहे आणि सूर्यकिरणेही अस्पष्ट झाली आहेत. या सर्वामुळे पर्यावरणाची हानी गंभीर स्वरूपाची झाली आहे. पुढील काही वर्षे या भागातील हवामानाचे चक्र बदलण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता तरी या देशांनी युद्ध थांबवावे, अशी मागणी वाढत आहे.
– सई बने
- acid rain effects
- atmospheric soot
- atomic weapons risk
- B-1B Lancer
- B-2 Spirit
- B-52 Stratofortress
- blocked sunlight
- environmental destruction
- geopolitical crisis
- global climate impact
- global cooling
- global security concerns
- Israel involvement
- Middle East tensions
- military escalation
- nuclear war fears
- nuclear winter threat
- oil facility fires
- radioactive fallout
- strategic bombers deployment
- Tehran black rain
- UN intervention demand
- US Iran conflict
- weapons of mass destruction