उत्तम आरोग्यसाठी काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. व्यायाम हेच यावर बरेच लोकं उत्तर देतील, पण हे उत्तर पूर्णपणे खरे नाहीये. उत्तम आरोग्यासाठी सर्वात आधी पाहिजे, उत्तम आणि सकस आहार. आपण दररोज जेवतो, मात्र आपले जेवण हे आरोग्यासाठी कमी आणि जिभेसाठी जास्त असते. अर्थात आपण चवीचवीने जेवतो. मात्र एक सकारात्मक बाब म्हणजे, आता हे चित्र हळूहळू का असेना बदलताना दिसत आहे. आता घरांमध्ये पौष्टिक आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असे पदार्थ खाल्ले जात आहे. (Ragi)
आपल्या भारतीय लोकांच्या जेवणामध्ये धान्याला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक जेवणात एकतरी धान्य आपण खात असतो. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका आदी नानाविध प्रकारचे धान्य आपण खातो. यातलेच एक महत्त्वाचे आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम धान्य म्हणजे, नाचणी. अनेक ठिकाणी नाचणीला नांगली, रागी अशा नावांनी ओळखले जाते. पूर्वी नाचणीला दुर्लक्षित आणि गरिबांचे धान्य म्हूणन ओळख होती. मात्र आता हीच नाचणी श्रीमंत, अतिश्रीमंत लोकांच्या जेवणाची चव वाढवताना दिसत आहे. नाचणी खाण्यामुळे होणारे आरोग्यवर्धक फायदे पाहून सर्वच लोकांनी तिचा आपल्या आहारात समावेश केला आहे. नाचणी खाल्ल्याने कॅल्शियम मिळते हे अनेकांना माहिती असेल, मात्र यासोबतच नाचणीचे इतरही अनेक फायदे आहेत, ते कोणते चला पाहूया. (Health)
नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि फायबर हे तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. 100 ग्रॅम नाचणीमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही जास्त असते. नाचणीमध्ये विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट्सदेखील आढळतात, जे आरोग्याला अत्यंत फायदेशीर ठरतात. नाचणीमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम देखील असते, जे केवळ लहान मुलांसाठीच नाही तर गरोदर स्त्रिया तसेच वृद्ध स्त्री-पुरुषांसाठी देखील खूप महत्वाचे आहे. जे हाडे मजबूत ठेवतात. कॅल्शियम व्यतिरिक्त, या धान्यामध्ये व्हिटॅमिन डी देखील भरपूर आहे. व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्याचे काम करते. त्यामुळे अनेकवेळा हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेणे कठीण होते, अशा परिस्थितीत नाचणीचा आहारात समावेश केला जातो. (Marathi)

नाचणीमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नाचणीचे पीठ वजन कमी करण्यासाठी गुणकारी आहे. नाचणीमध्ये अनेक अत्यावश्यक अमीनो ॲसिडदेखील असतात. जे विशेषतः महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. उच्च कॅल्शियम सामग्रीमुळे, ऑस्टियोपोरोसिसने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी नाचणी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. हे पचन सुधारते, आतड्याच्या हालचालीसाठी फायदेशीर आहे आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते. हे नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री आहे. त्यामुळे ज्यांना ग्लुटेनची ऍलर्जी आहे, तेही त्यांचा आहारात समावेश करू शकतात. (Top Marathi News)
नाचणीला वजन कमी करणारे कारक म्हणण्यात काहीही चुकीचे नाही, जिथे ते अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण करते. तर त्यात समाविष्ट असलेले अमिनो अॅसिड ट्रिप्टोफॅन वजन कमी करण्यात एक घटक म्हणून काम करते. या ऍसिडमुळे पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. कमी GI गुणवत्तेमुळे मधुमेहाच्या रूग्णांसाठी नाचणी देखील सर्वोत्तम आहार आहे कारण त्यांना रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती वाटत नाही. मधुमेह, हायपरटेंशन, लठ्ठपणा अशा अनेक समस्यांसाठी नाचणी वरदान ठरू शकते. म्हणूनच मधुमेहींनी आहारात नाचणीचा वापर करायला हवा. टाईप 2 मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी नाचणीचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. (Latest Marathi Headline)
========
Heat Stroke : उष्माघाताचा हृदयावर गंभीर परिणाम
========
झोप आणि नैराश्य दूर करण्यासाठी देखील तुम्ही तुमच्या आहारात नाचणीचा समावेश करु शकता. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे तणाव कमी होतो. नाचणी खाल्ल्याने चिंता, नैराश्य आणि निद्रानाशाची समस्या देखील दूर होते. रोज नाचणी खाल्ल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ही नाचणी मदत करते. नाचणीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो. नाचणी हृदयासाठीही ही चांगली मानली जाते. दिवसात एकदा नाचणीचे सेवन करु शकता. यामध्ये असलेले आहारातील फायबर शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात प्रभावी आहे. खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीय वाढतो. (Top Stories)
सर्वच ऋतूंमध्ये त्वचेसंबंधित समस्या जाणवतात. त्यामुळे त्वचेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. नाचणीमध्ये फेरूलिक असिडव असते जे त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी मदत करते यामध्ये असणारे अँटिएजिंग गुण तुमची त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार करण्यास मदत करते. तसेच तुम्ही घरच्या घरी नाचणीपासून फेस मास्कसुद्धा बनवू शकता. (Social News)
(टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics