आज चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. आज माताराणीच्या आठव्या रूपाची अर्थात महागौरीची पूजा केली जाते. शिवाय आज अष्टमी असल्याने कन्या पूजन देखील केले जाते. आज चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आपण हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात असलेल्या ज्वालाजीदेवी मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया. ज्वाला देवी मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील कालीधर टेकडीवर देवीला समर्पित हे मंदिर आहे. जातीच्या मातेचे मंदिर म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देवी सतीची जीभ पडली होती अशी मान्यता आहे. या मंदिराचा शोध पांडवांनी लावल्याचे सांगितले जाते. (Chaitra Navratri)
हिमाचल प्रदेशातील या शक्तीपीठात वर्षानुवर्षे ९ नैसर्गिक ज्वाला धगधगत आहेत. या ज्वालांचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून संशोधन करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 9 किलोमीटर खोदूनही शास्त्रज्ञांना या ठिकाणाचे रहस्य कळाले नाही आहे. पुराणकथेनुसार, भगवान शिवाच्या तांडवाला थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी माता सतीचे शरीर तुकडे केले. तिची जीभ या स्थळी पडली, आणि तेव्हापासून इथे नैसर्गिक ज्वाला जळत राहिली आहे. म्हणतात की अग्नी तत्वाशी संबंधित असल्याने ही ज्वाला कधीच विझत नाही. गर्भगृहात नऊ पवित्र ज्वाला सतत प्रज्वलित राहतात. ज्याचं दर्शन झालं, त्याचे दुःख-दरिद्र दूर होतात, असा लोकांचा विश्वास आहे. (Jwala Devi Temple)
गोरीपुरा डेरापासून ज्वालाजी मंदिर 20 किलोमीटर अंतरावर आहे. पठाणकोट मार्गेही या मंदिराला सरळ येता येते. कांगडा ज्वालाजी दोन तासांचा बस प्रवास आहे. सम्राट भूमिचंद्र याने सतीची जीभ शोधण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. राजाला देवीची आज्ञा झाली, तो येथील पर्वतावर आला आणि त्याने घनदाट जंगलात ज्वालाजी मंदिर बांधले. हे मंदिर 1835 मध्ये बांधले गेले. ज्वाला देवी मंदिर हे मंदिर सर्वप्रथम राजा भूमी चंद यांनी बांधले होते. नंतर महाराजा रणजित सिंग आणि राजा संसारचंद यांनी १८३५ मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. (Todays Marathi Headline)

ज्या पृथ्वीवर मंदिर बांधले आहे त्या पृथ्वीवरून 9 ज्वाला निघत आहेत. या 9 ज्वाला चंडी, हिंगलाज, अन्नपूर्णा, महालक्ष्मी, विंद्यावासिनी, सरस्वती, अंबिका, अंजीदेवी आणि महाकाली या नावाने ओळखल्या जातात. सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे देवी ज्वालामुखीच्या या मंदिरात मातेची कोणतीही मूर्ती बसवली जात नाही, तर पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडणाऱ्या मातेच्या नऊ ज्योतींची पूजा केली जाते. महाभारतामध्ये या ज्वालाजीचा उल्लेख आलेला आहे. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांनी येथील यात्रा केली. येथील मुख्य जेतीचे नाव महाकाली आहे. (Top Trending News)
आजूबाजूला जंगल आहे. येथील मंदिरामध्ये भाविक गोरख दिब्बीचे दर्शन घेतात. दिब्बी म्हणजे जलकुंड. येथील ज्वाला काही वेळा क्षणभर दिसते नंतर गुप्त होते. येथे गुरू गोरखनाथांची मूर्ती आहे. सेवाभवन हे ज्वालादेवीचे शयनस्थान आहे. येथे चांदीचा पलंग (सिंहासन) आहे. जवळच राधा-कृष्ण मंदिर आहे. गोरख दिब्बीच वर लाल शिवाल व सिद्ध मंदिर आहे. अंबिकेश्वर महादेव मंदिर सिद्ध नागाजरुन मंदिरापासून एक फर्लांगभर आहे. त्याच्याजवळ टेढा मंदिर आहे. या ठिकाणी भगवान शिव भैरवाच्या रूपात येथे विराजमान आहेत. (Top Stories)
========
Ram Navami : मनोकामना पूर्ण करण्यासाठी रामनवमीला करा ‘हे’ उपाय
Ram Navami : श्रीरामांची कुलदेवी कोण होती माहिती आहे का?
========
ज्वालामुखी मातेच्या या मंदिराच्या ज्योतीची बातमी सम्राट अकबराला कळताच तो आपल्या सैन्यासह ज्योत विझवण्यासाठी पोहोचला. त्याच्या सैन्याने ज्योत विझवण्याचे सर्व प्रयत्न केले पण तो अयशस्वी ठरला. हा चमत्कार पाहून तो नतमस्तक झाला आणि दुसऱ्या दिवशी सोन्याचे छत्र घेऊन मातेला अर्पण करण्यासाठी ज्वालामुखीच्या मंदिरात पोहोचला, पण ते छत्र खाली पडून त्याचे धातूमध्ये रूपांतर झाले झाले. अशी मान्यता आहे. नवरात्रीच्या काळात या मंदिराला लाखो भाविक भेट देतात. माँ ज्वालाची आरती, दर्शन, आणि अखंड दिव्य ज्योतीचे तेज पाहताना भक्तांना अध्यात्मिक उर्जा मिळते. ‘पाण्यातही न विझणारी ही ज्योत’ भक्तांसाठी फक्त चमत्कार नाही, तर त्यांची श्रद्धा, आत्मविश्वास आणि अढळ भक्तीचे प्रतीक आहे. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Chaitra Navratri
- Chaitra Navratri 2026
- Himachal Pradesh
- jwala devi temple
- jwala devi temple himachal pradesh
- jwala devi temple himachal pradesh history
- jwala devi temple significance
- चैत्र नवरात्र
- चैत्र नवरात्र २०२६
- ज्वाला मंदिर
- ज्वाला मंदिर महत्त्व
- ज्वाला मंदिर माहिती
- ज्वाला मंदिर हिमाचल प्रदेश
- ज्वाला मंदिरची माहिती
- ज्वाला मंदिरचे महत्त्व
- हिमाचल प्रदेश