आज गुड फ्राय डे. ख्रिश्चन लोकांचा अतिशय महत्त्वाचा दिवस. आजच्याच दिवशी प्रभू येशूंनी मानवतेसाठी आपले बलिदान दिले होते, त्यामुळे हा दिवस शोक व्यक्त करण्याचा दिवस असून, या दिवशी ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. गुड फ्रायडे नंतर येणाऱ्या रविवारी ख्रिश्चन बांधव त्यांचा ईस्टर संडे हा सण साजरा करतात. गुड फ्रायडेच्या एका दिवसांनंतर म्हणजे इस्टर संडेला येशू ख्रिस्त सुळावर चढवल्यानंतर पुन्हा जिवंत झाले होते अशी ख्रिश्चन धर्मीय लोकांमध्ये मान्यता आहे. यानंतर 40 दिवसांपर्यंत येशू ख्रिस्त पृथ्वीवर राहिले आणि त्यांनी शिष्यांना प्रेमाचा धडे दिले. शेवटी ते स्वर्गात निघून गेले, असे बायबलमध्ये असे लिहिले आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचे स्मरण केले जाते. या दिवशी लोक येशूंच्या आठवणीत दुःखी असतात. त्यानंतर इस्टरच्या दिवशी त्यांचा आनंद द्विगुणित होतो. या वर्षी इस्टर संडे 5 एप्रिल रोजी आहे. (Easter)
गुड फ्रायडे नंतर तिसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे ईस्टर संडे होय, ह्या दिवशी म्हणजे रविवारी येशू पुनर्जीवित झाले असे मानले जाते म्हणून हा दिवस आनंदाने साजरा करतात. ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस नंतरचा सर्वात मोठा सण म्हणजे ईस्टर संडे होय, या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृत झाल्यानंतर पुन्हा उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी 40 दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो. (Marathi)
ईस्टरचा आठवडा पवित्र आठवडा म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजे मौन्द्य गुरुवार, उत्तम शुक्रवार अर्थात गुड फ्रायडे आणि होली सॅटर्डे असे आहेत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो. ईस्टरची तारीख दरवर्षी बदलते कारण वसंत संपात पौर्णिमेच्या नंतरचा पहिला रविवार म्हणजे ईस्टर असे इसवी सन 325 मध्ये भरलेल्या ख्रिस्ती बिशप लोकांच्या संमेलनात ठरवले गेले. यहुदी लोकांच्या पासोव्हर या सणाच्या ऐवजी ईस्टर साजरा केला जातो असे काहींचे म्हणणे आहे. कारण बऱ्याच युरोपियन भाषांमध्ये ईस्टर हा शब्द पासोव्हरचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.ईस्टर साजरा करण्याच्या पद्धती मात्र देशागणिक वेगळ्या आहेत. प्रोटेस्टंट पंथीय लोकात ‘प्रभू उठला आहे’ असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते तर दुसरा माणूस ‘हो खरच प्रभू उठला आहे’ असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो. (Todays Marathi HEadline)

ख्रिश्चन धर्माच्या अभ्यासक नुसार ईस्टर या शब्दाचा जन्म ख्रिस्त या शब्दापासून झाला आहे. ह्या पवित्र रविवारला खजूरही म्हणतात. ईस्टर सण हा जीवनाचं नविन परिवर्तनाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. जेरुसलेममध्ये जेव्हा येशूंची लोकप्रियता वाढू लागली तेव्हा धर्मगुरूंनी रोमच्या राज्यकर्त्याचे कान भरायला सुरुवात केली. त्या लोकांनी येशूंवर धर्म आणि राज्याचा अवमान केल्याचा आरोप केला आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावून सुळावर लटकवले. यानंतर तिसऱ्या दिवशी इस्टरला ते पुन्हा जिवंत झाले असे मानले जाते. यानंतर येशूंचे अनुयायी पुन्हा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू लागले. येशूंच्या मृत्यूदंडानंतर पसलेला अंधार आणि निराशा या दरम्यान इस्टर हा नवीन जीवनाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. (Top Marathi News)
इस्टरच्या दिवशी अंड्याला विशेष महत्त्व असते. रंगीत अंड्यांशिवाय इस्टर संडेचे सेलिब्रेशन अर्धवट असते. या दिवशी लोक अंडी सजवतात आणि भेटवस्तूंच्या रुपात ती अंडी एकमेकांना देतात. काही ठिकाणी सजवलेली ही अंडी पालक लपवतात आणि मुलांना ती शोधावी लागतात. या दिवशी अंड्यांला यामुळे महत्त्व असते कारण ख्रिश्चन धर्मात लोक अंड्याला नवीन जीवन आणि उत्साहाचे प्रतीक मानतात. या दिवशी मेणबत्ती लावणे देखील शुभ मानले जाते. (Latest Marathi Headline)
इस्टर डेबद्दल ख्रिश्चन धर्मीयांमध्ये एक आख्ययिका देखील सांगितली जाते. रविवारी पहाटे अंधार असताना मेरी मॅग्डालीन कबरेजवळ आल्या आणि त्यांनी पाहिले की कबरेतून दगड बाजूला सरकलेला आहे. मग त्या शमौन पतरस आणि दुसरा शिष्यांकडे गेल्या आणि म्हणाल्या की त्यांनी येशूचे शरीर कबरेतून काढले आहे. सर्वजण तेथे पोहोचले आणि पाहिले की कफनाचे कपडे पडलेले होते. सर्वांनी पाहिले की येशू तेथे नाही. मग सर्व शिष्य निघून गेले, पण मरीया मग्दालीन तिथेच राहिल्या. रडत रडत मॅग्डालीनीने येशूचे शरीर जेथे ठेवले होते त्यात पुन्हा डोकावले आणि तेथे त्यांना पांढरे कपडे घातलेले दोन देवदूत डोक्यावर व पायाजवळ बसलेले दिसले. देवदूताने त्यांना विचारले, तू का शोक करीत आहेस? मग मॅग्डालीन म्हणाली की त्यांनी माझा प्रभू काढून घेतला आहे. असे बोलून ती वळताच त्यांना येशू तेथे उभे असल्याचे दिसले. येशू मग्दालिनींना म्हणाले, मी माझ्या पित्याकडे जात आहे आणि तू माझ्या भावांकडे जा. मरीया मॅग्डालीन शिष्यांकडे आल्या आणि म्हणाल्या की त्यांनी प्रभुला पाहिले आहे… असे देखील म्हटले जाते की येशूने काही शिष्यांना देखील दर्शन दिले. (Top Stories)
========
Good Friday : काय आहे गुड फ्राय डे या दिवसाचे महत्व?
========
रविवारी फक्त एका स्त्रीने त्यांना त्यांच्या कबरीजवळ जिवंत पाहिले. जिवंत दर्शनाचा हा प्रसंग ‘इस्टर’ म्हणून साजरा केला जातो. बायबलनुसार, येशू खरोखरच मेलेल्यांतून उठले आहे हे सिद्ध करण्यासाठी, प्रेषितांना पटवून देण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी आणि चर्चची स्थापना करण्यासाठी 40 दिवस या जगात जगले. त्यानंतर ते प्रेषितांना जैतूनच्या डोंगरावर घेऊन गेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद देत, ढगांनी त्यांना झाकून घेईपर्यंत आकाशाकडे उड्डाण केले. तेव्हा दोन देवदूत आले आणि त्यांना म्हणाले, ‘हा येशू, ज्याला तुम्ही तुमच्यातून स्वर्गात जाताना पाहत आहात, तो पुन्हा येईल, ज्याप्रमाणे तुम्ही त्या स्वर्गात जाताना पाहिले आहे. मग तो सर्व मानवांचा न्याय करील.’ (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Christian
- Christian Community
- christian religion
- christian religion festival
- Easter
- Easter sunday
- Easter sunday infor
- Easter sunday mahiti
- god yeshu
- information of Easter sunday
- significance of Easter sunday
- what is Easter sunday?
- yeshu
- yeshu christ
- इस्टर
- इस्टर संडे
- इस्टर संडे कसा साजरा करतात?
- इस्टर संडे का साजरा करतात?
- इस्टर संडे माहिती
- इस्टर संडेचे महत्त्व
- ख्रिश्चन
- ख्रिस्ती लोकं
- गुड फ्राय डे
- चर्च
- येशू
- येशू ख्रिस्त