Home लाईफ स्टाईल Good Friday : काय आहे गुड फ्राय डे या दिवसाचे महत्व?
लाईफ स्टाईल

Good Friday : काय आहे गुड फ्राय डे या दिवसाचे महत्व?

72

अनेकदा आपण कॅलेंडरमध्ये ‘गुड फ्रायडे’ हे वाचतो. या दिवशी सुट्टी असल्याने आपण सुट्टीचा आनंद मानतो. गुड फ्रायडे हा ख्रिश्चन लोकांचा सण असल्याचे आपल्याला माहिती आहे. मात्र गुड फ्रायडे नक्की का साजरा करतात. शिवाय गुड फ्रायडे नंतर लगेच येणाऱ्या रविवारी ईस्टर संडे साजरा केला जातो. मग नक्की गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे हे सण का आणि कसे साजरे करातात. याची माहिती जाणून घेऊया. ‘गुड फ्रायडे’ हा ख्रिस्ती धर्मासाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. ईस्टर संडेच्या एक दिवस आधी हा दिवस साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्माचे लोक हा दिवस शोक दिवस मानतात. गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिस्ती धर्माचे अनुयायी चर्चमध्ये जातात आणि मानवतेसाठी येशू ख्रिस्ताने दिलेल्या बलिदानाचे स्मरण करतात. उद्या सर्वत्र गुड फ्रायडे साजरा होणार आहे. (Good Friday)

गुड फ्राय डे याचा शब्दश: अर्थ शुभ शुक्रवार असा होतो, त्यामुळे अनेक गैर ख्रिस्ती धर्मीय लोकांमध्ये या दिवसाबद्दल संभ्रम पाहायला मिळतो. आणि या संभ्रमातून ते ख्रिस्ती बांधवांना या गुड फ्राय डे च्या शुभेच्छा देखील देतात. खरे पाहिले तर हा दिवस शोक व्यक्त करण्याचा दिवस असून, या दिवशी प्रभू येशूंनी मानवतेसाठी आपले बलिदान दिले होते. या दिवशी ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. (Marathi)

बायबलनुसार, ज्या दिवशी प्रभू येशूंनी मानवतेसाठी आपले बलिदान दिले, तो दिवस शुक्रवार होता, आणि त्यामुळे या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जाते. या दिवशी आपल्या गुन्ह्यांची माफी येशूकडे मागितली जाते. जगभरात हा दिवस मोठ्या प्रमाणात पाळला जातो. चर्चमध्ये जमलेल्या बांधवांना पोप येशूच्या बलिदानाविषयी कहाणी सांगतात. रोमन कॅथलिक या दिवशी उपवास करतात. अनेक लोकं 40 दिवस उपवास धरतात, तर काही केवळ शुक्रवारी धरतात. येशू समाजाच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी क्रॉसवर चढला. समाज आणि मानवतेसाठी काम करण्याची प्रेरणा यातून मिळते, यासाठी या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जाते, अशी मान्यता आहे. ख्रिश्चन बांधव या दिवसाला होली फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे असेही म्हणतात. (Todays Marathi Headline)

Good Friday

लोकांमध्ये येशू ख्रिस्ताची वाढत्या लोकप्रियतेमुळे तिथल्या दांभिक धर्मगुरूंना चीड आली. त्यांनी येशूबद्दल रोमन शासक पिलातकडे तक्रार केली. त्याने पिलातला सांगितले की देवाचा पुत्र असल्याचा दावा करणारा हा तरुण केवळ पापीच नाही तर देवाच्या राज्याविषयीही बोलतो. ही तक्रार आल्यानंतर येशूवर देशद्रोह आणि धर्माचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर येशूला सुळावर चढवून मृत्यूदंड देण्याचा आदेश जारी करण्यात आला. जेव्हा येशू यांना क्रॉसवर लटकवून त्यांचा जीव घेण्याचा आदेश दिला तेव्हाही येशू यांनी त्या लोकांच्या अज्ञानतेसाठी देवाकडे प्रार्थना केली की, यांना माफ करा, कारण, यांना नाही माहित की हे काय करत आहेत, असे त्यांनी म्हटले. दिवशी त्यांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी फ्रायडे म्हणजेच शुक्रवारचा दिवस होता. म्हणून या दिवसाला गुड फ्रायडे असे म्हटले जाते. (Top Marathi News)

ख्रिश्चन समाजाच्या लोकांमध्ये अशी मान्यता आहे की प्रभु येशू ख्रिस्त हे देवाचा पुत्र होते. अज्ञान दूर करण्यासाठी आणि प्रेम आणि चांगुलपणा शिकवण्यासाठी ते या पृथ्वीवर आले. त्यामुळे जेव्हा पितालुसने कट्टर लोकांचे समाधान करण्यासाठी येशू ख्रिस्तांवर अनेक अत्याचार केले तरीही त्यांनी ते सर्व सहन केलं. जेव्हा येशू यांना क्रॉसवर लटकवून त्यांचा जीव घेण्याचा आदेश दिला तरीही येशूयांनी त्या लोकांच्या अज्ञानतेसाठी देवाला प्रार्थना केली की यांना माफ करा, कारण, यांना नाही माहित की हे काय करत आहेत. येशू यांनी प्रेमाच्या उदाहरण सादर करण्यासाठी आपली कुर्बानी दिली. ज्या दिवशी त्यांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी फ्रायडे म्हणजेच शुक्रवारचा दिवस होता. येशू यांनी महानता, त्याग, दया आणि प्रेमाची इच्छा पाहता या शुक्रवारला गुड फ्रायडे म्हटलं जाऊ लागले. (Latest Marathi Headline)

========

Iran’s Universities : इराणच्या अभियांत्रिकी विद्यापीठांचा जगभर दबदबा

========

हा दिवस दु:खाचा असला तरी त्याला ‘गुड’ म्हटले जाते. या गुडचा संदर्भ चांगला किंवा पवित्र असा आहे. ख्रिश्चन धर्मियांमध्ये या दिवसाला गुड किंवा पवित्र म्हणण्यामागील कारण म्हणजे यादिवशी येशूने मृत्यूवर विजय मिळवण्याचा मार्ग सर्वासाठी प्रशस्त केला, असं मानतात. येशूने मानवतेसाठी हे मोठे कार्य केले, असं म्हटलं जातं. म्हणूनच या दिवशी ‘हॅपी गुड फ्रायडे’ अशा शुभेच्छा देऊ नये. गुड फ्रायडेच्या साधारण दोन दिवसांनंतर येणाऱ्या रविवारी ‘ईस्टर संडे’ साजरा केला जातो. हा दिवस येशू ख्रिस्ताच्या पुनरुज्जीवनाचा म्हणजेच पुन्हा जिवंत होण्याचा आणि आनंदाचा दिवस मानला जातो. (Top Stories)

गुड फ्रायडेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यागच्या दिवसाची तयारी केली जाते. शोकाचे प्रतीक म्हणून काळे वस्त्र परिधान केले जातात. हा शोक दिवस असल्याने, टेलिव्हिजन, फोन आणि सोशल मीडियाचा वापर टाळला जातो. या दिवशी उपवास केला जातो. गुड फ्रायडेसाठी प्रार्थना सेवेला उपस्थित राहिले जाते. ‘ग्रेट थ्री अवर्स ॲगोनी मध्ये दुपारपासून 3.00 वाजेपर्यंत मौन पाळले जाते. घरात किंवा चर्चमध्ये असलेल्या पवित्र क्रॉसची पूजा केली जाते. येशू ख्रिस्ताची शिकवण वाचली जाते. त्यांनी सांगितलेले संदेश आणि शिकवण स्वतःच्या आयुष्यात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला जातो. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!