उन्हाचा तडाखा वाढल्याने आता सर्वच लोकं स्वतःची काळजी घेताना दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे अनेक त्रास होतात. या उन्हामुळे त्वचेवर देखील मोठा परिणाम होत आहे. उन्हामुळे त्वचा काळी पडत असून, त्वचेवर काळे डाग पडणे, सनटॅन होणे, आपली त्वचा तेलकट किंवा कोरडी पडणे, त्वचेवर घामोळे येणे, त्वचेवर पुरळ येणे, घामोळे आदी अनेक त्रास जाणवत आहे. चेहऱ्यावर टॅनिंग वाढणे ही नैसर्गिक क्रिया आहे. सूर्यकिरणांमधील अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचण्यासाठी त्वचा मेलॅनिन तयार करते यामुळे चेहऱ्यावर काळेपणा वाढतो. पार्लरमध्ये जाऊन आपण कितीही महागडी ट्रीटमेंट केली तरी आपल्याला फारसा काही फरक जाणवत नाही. आणि जरी फरक जाणवला तरी नेहमी नेहमी आपण पार्लरमध्ये जाऊन महाग उपचार घेणे आर्थिक दृष्ट्या आणि वेळेअभावी शक्य होत नाही. यासाठीच उन्हाळ्यात त्वचा नीट ठेवण्यासाठी आणि टॅनिंग काढण्यासाठी सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे उपाय करून तुम्ही तुमची त्वचा कायम सतेज ठेऊ शकता. (Skin Care)
* हळद आणि बेसनाचा पॅक लावून त्वचेचा टॅन सहज निघू शकतो. यासाठी दोन चमचे बेसन पीठ घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा गुलाबजल आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्या. मग टॅनिंग झालेली त्वचा पाण्याने स्वच्छ करून त्यावर ही पेस्ट लावून घ्या. 10 मिनिटे पेस्ट लावून ठेवा आणि मग धुवून टाका. तुम्ही हा पॅक दर दुसऱ्या दिवशी लावू शकता यामुळे त्वचेचे टॅनिंग दूर होते.(Summer Care)
* चेहऱ्यावरचे टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबू मधाचा फेसपॅक खूपच लाभदायक आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात मध टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेली डेड स्किन कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. मधाचा वापर केल्यामुळे त्वचा उजळदार होते आणि नैसर्गिक ग्लो चेहऱ्यावर येतो. (Marathi)
* शरीराला हायड्रेटेड राहण्यासाठी गरज असते. तशीच त्वचेलाही असते. उन्हाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी हायड्रेटिंग मास्कची निवड करा. रात्री झोपण्यापूर्वी हायड्रेटिंग मास्क चेहऱ्याला लावा आणि थोड्या वेळाने चेहरा धुवा. असे केल्याने त्वचा टवटवीत राहते. दिवसभरात खराब झालेली त्वचा स्वच्छ होते. (Top Marathi News)
* टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात जे त्वचेचा काळपटपणा कमी करण्यास मदत करतात. टोमॅटोचा फेस पॅक बनवण्यासाठी, दोन चमचे टोमॅटोच्या रसात एक चमचा मध मिसळा आणि तो चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. हा पॅक त्वचेचा काळपटपणा कमी करतो, त्वचा उजळ करतो आणि तेलकटपणा नियंत्रित करतो. (Todays Marathi HEadline)

* काकडी त्वचेला त्वरित थंडावा देते आणि चंदन त्वचेला आराम देते. काकडी आणि चंदनाचा फेस पॅक बनवण्यासाठी, दोन चमचे काकडीचा रस आणि एक चमचा चंदनाची पावडर एकत्र करून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनंतर धुवून टाका. यामुळे उन्हामुळे भाजलेल्या त्वचेपासून आराम मिळतो आणि त्वचेला थंडावा मिळतो. त्वचेचा काळपटपणा कमी करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे. (Latest Marathi Headline)
* उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरायला विसरु नका. दिवसातून किमान 3 वेळा सनस्क्रीन वापरा. बाहेर जाताना सनस्क्रिन लावायला विसरु नका. उन्हाळ्यात त्वचा हायड्रेटेड ठेवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे चेहऱ्यावर अॅंटी ऑक्सिडंट फेस सीरम वापरणे. वातावरणामुळे त्वचेचे होणारे नुकसान सिरममुळे कमी होते. (Top Trending News)
* मधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र हाच मध आपल्या त्वचेसाठीही तितकाच उपयुक्त ठरतो. एका बाऊलमध्ये दोन चमचे पपईची पेस्ट घ्या. त्यामध्ये एक चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण नीट एकत्र करा. जिथे जिथे त्वचा काळवंडली आहे किंवा टॅनिंग झाले आहे, त्या भागावर हे मिश्रण लावून 20 मिनिटांनी ते थंड पाण्याने धुवून टाका. नियमित वापरानंतर बदल दिसून येईल. (Top Stories)
* त्वचेचे टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा उपयोगी ठरू शकतो. बटाट्यात कॅटेकोलेस नावाचं एंजाइम असतं ज्यामुळे त्वचेचा टोन ब्राईट होण्यास मदत होते. टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही तीन कच्चे बटाटे घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट टॅन झालेल्या त्वचेवर लावा यामुळे काही दिवसात त्वचा पुन्हा ब्राईट होते. (Social News)
========
Health Care : वयाच्या चाळीशीतही हाडं राहतील मजबूत, डाएटमध्ये समावेश करा हे फूड्स
Women Health : मासिक पाळीमध्ये होणारा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
========
लक्षात ठेवा
– उन्हाळ्यात हेवी मेकअप करणे टाळा. लाईट मेकअपला प्राधान्य द्या.
– दुपारी 12 ते 5 या उन्हाच्या वेळेत बाहेर पडू नका
– उन्हाळा आहे म्हणून सतत एसीमध्ये बसू नका. त्यामुळेही त्रास होऊ शकतो.
– फ्रिजमधले थंड पाणी पिण्याऐवजी माठातले पाणी प्या.
– त्वचा कोरडी पडेल असे साबण आंघोळ करताना वापरु नका.
– डोळ्यांसाठी सनग्लासेस वापरा.
– उन्हाळ्यात घराबाहेर जात असाल तर चेहरा अनेक वेळा धुत राहा.
(टीप: ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून, कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics