Home आंतरराष्ट्रीय Strait of Hormuz : अवाढव्य मालवाहू जहाजांची जादुई दुनिया
आंतरराष्ट्रीय

Strait of Hormuz : अवाढव्य मालवाहू जहाजांची जादुई दुनिया

71

अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक नव्या गोष्टींची माहिती समोर आली. त्यातील पहिली म्हणजे जागतिक व्यापारामध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालवाहू जहाजे. जगभर जो व्यापार सुरळीत सुरू आहे, त्यात या दोन गोष्टींचे मोठे महत्त्व आहे. इराण युद्धापूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज सरासरी सुमारे १३० ते १३८ मालवाहू जहाजे आणि तेलवाहू जहाजे जात असत. महिनाभरापूर्वी होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्गांपैकी एक होता आणि त्यातून ही भलीमोठी मालवाहू जहाजे सुरळीत ये-जा करत होती. मात्र अमेरिकेने इराणबरोबर युद्ध सुरू केल्यानंतर या मालवाहतूक जहाजांचे सर्वच गणित बिघडले आहे. अनेक मालवाहू जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकली आहेत. यामुळे जगभर अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. फक्त जहाजेच अडकली नाहीत, तर त्यावर मोठ्या संख्येने कर्मचारीही असून अनेक दिवस हे कर्मचारी युद्धाच्या छायेत आहेत. या सर्वांत मालवाहू जहाज म्हणजेच कार्गो शिप नेमके कसे असते, त्यावर किती सामान असते, याची चर्चा सुरू आहे. समुद्रावर तरंगणारी ही अवाढव्य जहाजे म्हणजे एक जादुई दुनिया असते. ( Strait of Hormuz )

मालवाहू जहाजांमधून मोठ्या प्रमाणात वस्तू, साहित्य आणि उत्पादने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशाच्या बंदरापर्यंत नेण्यात येतात. मालवाहू जहाजे ही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा मानली जातात. जागतिक दळणवळणाचा एक मोठा भाग या मालवाहू जहाजांच्या माध्यमातून हाताळला जातो. ही जहाजे बहुधा वेल्डेड स्टीलची बनलेली असतात. मालवाहू जहाजांचेही काही प्रकार असतात. त्यात कंटेनर जहाजे असतात, ज्यामध्ये प्रमाणित आकारात माल वाहून नेला जातो. टँकर्समधून तेल, वायू आणि द्रव रसायनांची वाहतूक केली जाते. बल्क कॅरियर्समधून कोळसा आणि धान्य वाहतूक केली जाते, तर जनरल कार्गो जहाजांमधून विविध प्रकारच्या मिश्र सामानाची ने-आण केली जाते. ही मालवाहू जहाजे अतिशय मजबूत असतात आणि साधारणतः २५ ते ३० वर्षे टिकतात. त्यावरील माल चढवण्यासाठी व उतरवण्यासाठी अनेकदा क्रेन किंवा तत्सम यंत्रांचा वापर करण्यात येतो. जगातील सर्वच देश अशा मालवाहू जहाजांवर अवलंबून आहेत. यातही चीनकडे सध्या जगातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक संख्येने मालवाहू जहाजे आहेत. त्यामुळे जागतिक जहाज वाहतूक क्षमतेचा एक महत्त्वपूर्ण भाग चीनच्या नियंत्रणात आहे. त्यानंतर ग्रीस, जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो. चीनकडे केवळ सर्वाधिक जहाजेच नाहीत, तर जगातील बहुसंख्य कंटेनर जहाजेही चीनमध्ये तयार होतात. चीनकडून मालवाहू जहाजे खरेदी करणाऱ्या देशांची संख्या देखील अधिक आहे. चीनपाठोपाठ जपानकडे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जहाजांचा ताफा आहे. मालवाहू जहाजे ज्या देशांकडे जास्त आहेत, त्यांची समुद्रावर सत्ता असते. तसेच ज्या देशांची बंदरे अधिक सुसज्ज असतात, त्यांचीही समुद्री व्यापारावर पकड मजबूत असते. चीन आणि सिंगापूरसारखे आशियाई देश यामध्ये आघाडीवर आहेत.

जगातील सर्वात मोठी मालवाहू जहाज कंपनी एमएससी, म्हणजे मेडिटेरेनियन शिपिंग कंपनी आहे. या कंपनीकडे ९०० हून अधिक जहाजांचा ताफा आहे आणि ती जागतिक स्तरावर सर्वात व्यापक मालवाहतूक आणि कंटेनर सेवा पुरवते. त्यानंतर स्वित्झर्लंडमधील लेघॉर्न ग्रुपचा क्रमांक लागतो. लेघॉर्न ग्रुप जगभरातील ५०० हून अधिक बंदरांवर कार्यरत आहे. याशिवाय या क्षेत्रात १९९६ पासून मेर्स्क या कंपनीचाही दबदबा आहे. भारतालाही मालवाहू जहाज बांधणी क्षेत्रात चांगले स्थान आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी जहाजबांधणी आणि दुरुस्ती कंपनी आहे. कोचीन शिपयार्डतर्फेच देशातील पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज बांधण्यात आले. चीनमधील यांगत्झे रिव्हर शिपबिल्डिंग ग्रुपचाही मालवाहू जहाजांच्या निर्मितीत दबदबा आहे. ( Strait of Hormuz )

=======

हे देखील वाचा : Iran–US–Israel Conflict : रझा पहलवी ऐवजी अमेरिका कुर्दिश गटासोबत

=======

मालवाहू जहाजे आकाराने अवाढव्य असतात. एमएससी इरिना हे २४,३४६ टीईयू क्षमतेचे जगातील सर्वात मोठे कंटेनर मालवाहू जहाज आहे. हे जहाज ४०० मीटरपेक्षा जास्त लांबीचे आहे. इरिना-श्रेणीतील मालवाहू जहाजे सध्या जगातील सर्वात मोठ्या जहाजांपैकी आहेत. एमएससी इरिना या श्रेणीतील चार मालवाहू जहाजे सध्या युरोप आणि पूर्व आशिया दरम्यान कार्यरत आहेत. तर ग्रीन कंटेनर जहाज हे एक पर्यावरणपूरक मालवाहू जहाज आहे, जे प्रदूषण आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी तयार केले आहे. आता यातील अनेक जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत अडकून असून युद्ध कधी संपणार, याची प्रतीक्षा करत आहेत. ( Strait of Hormuz )

— सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!