Home आंतरराष्ट्रीय City of Dimona : इस्रायलमधील मिनी इंडिया
आंतरराष्ट्रीय

City of Dimona : इस्रायलमधील मिनी इंडिया

70

अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचे परिणाम अवघ्या जगावर होत आहेत. सुरुवातीला अमेरिकेने इराणवर अवघ्या दोन-तीन दिवसांत विजय मिळवता येईल, अशी शेखी मिरवली होती. मात्र इराणने आपल्या शस्त्रसज्जतेचा पुरावा देत अमेरिका आणि इस्रायलला जेरीस आणले आहे. एवढेच नाही, तर इस्रायलमधील अणुकेंद्र ज्या शहरात आहे, तिथेही क्षेपणास्त्र हल्ले करून इस्रायलला जबर धक्का दिला आहे. जगातील सर्वात रहस्यमय लष्करी तळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचे नाव आहे—डिमोना. डिमोनाचे अधिकृत नाव शिमोन पेरेस नेगेव्ह अणुसंशोधन केंद्र आहे. त्याला इस्रायलमध्ये डिमोना अणुकेंद्रनगर आणि मिनी इंडिया या नावाने ओळखले जाते. येथे आपल्या महाराष्ट्रामधून गेलेल्या इस्रायली नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे डिमोनाच्या रस्त्यांवरून चालताना अनेकवेळा मराठी ऐकायला मिळते. डिमोना हे ठिकाण दक्षिण इस्रायलमधील एक वाळवंटी शहर आहे. अर्थात, आता इस्रायलमधील आधुनिक शहर म्हणून याची ओळख असली, तरी सुरुवातीला या शहरातील जीवन सहज नव्हते. साधारण ७५ वर्षांपूर्वी भारतातील ज्यू डिमोनामध्ये येऊ लागले, तेव्हा त्यांना अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागले. कमी पाण्याचा वापर आणि रेतीच्या शहरात राहण्याचे आव्हान प्रमुख होते. पण हे आव्हान स्वीकारून भारतातून आलेल्या ज्यूंनी या डिमोनाचे रूप पालटले. अक्षरशः १२-१२ तास या शहराच्या उभारणीसाठी कष्ट केले. आता हेच डिमोना इस्रायलच्या संरक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळेच या डिमोना शहरावर इराणच्या क्षेपणास्त्राने मारा केल्यावर सर्वत्र खळबळ उडाली होती. ( City of Dimona )

दक्षिण इस्रायलमध्ये डिमोना नावाचे एक वाळवंटी शहर आहे. या शहराला अनेक नावांनी ओळखले जाते. त्यामध्ये इस्रायलचे अणुशहर हे एक नाव आहे. सोबतच डिमोना शहराला ‘लिटल इंडिया’ किंवा ‘मिनी इंडिया’ असेही म्हटले जाते. या डिमोना शहराचा इतिहास जाणण्यासारखा आहे. जेव्हा इस्रायलची निर्मिती होत होती, तेव्हा हा देश रेतीचा प्रदेश होता. त्यातही डिमोना हे पूर्णपणे रेतीचे शहर वाटेल असेच होते. तिथे राहणे अत्यंत कठीण होते. पाण्याची कमतरता होती. शिवाय रेतीच्या वादळांमुळे जे मोजके इस्रायली तिथे राहत होते, त्यांचे जीवन कठीण झाले होते. अशातच या डिमोना शहरात भारतीय वंशाच्या ज्यू नागरिकांचे स्थलांतर होऊ लागले. साधारण ७० ते ७५ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आता सुमारे ७,००० ते ८,००० भारतीय वंशाचे ज्यू डिमोनामध्ये राहतात. या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३० टक्के भारतीय वंशाचे ज्यू येथे आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील बेने-इस्रायल, कोचीन आणि बगदादी ज्यू समुदायांचा समावेश आहे. हे ज्यू १९५० आणि १९६० च्या दशकात महाराष्ट्र, केरळ आणि गुजरात येथून इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले. भारतातून हे ज्यू जेव्हा आपला मूळ देश मानत इस्रायलला गेले, तेव्हा ते सोबत भारतीय परंपराही घेऊन गेले. या परंपरा त्यांनी आजही डिमोना, पर्यायाने इस्रायलमध्ये जपल्या आहेत.

मुख्यतः डिमोनामधील ज्यू महाराष्ट्रीयन परंपरा अधिक पाळताना दिसतात. अगदी त्यांची बोलीभाषाही मराठी आहे. त्यांच्या रोजच्या खाद्यपदार्थांमध्ये मराठी खाद्यपदार्थांचा भरणा आहे. शिवाय अनेक मराठी सण तिथे साजरे केले जातात. त्यात जिलेबी, गुलाबजामून, श्रीखंड-पुरी असा मेनू केला जातो. आज डिमोनामध्ये कधीही गेले, तरी बॉलीवूडमधील गाण्यांचे बोल कानावर पडतात. शिवाय मराठी भाषाही ऐकू येते. ( City of Dimona )

=======

हे देखील वाचा : Israel : हमासनं इस्रायली ओलिसांची सुटका केली !

=======

त्यामुळेच डिमोनामध्ये राहणाऱ्या ज्यूंना भारतीय ज्यू म्हणून ओळखले जाते. १९५० च्या दशकात जे ज्यू इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले, त्यांची संख्या २००० पर्यंत होती. आता त्यांची तिसरी पिढी इस्रायलमध्ये आहे. या तिसऱ्या पिढीनेही भारतीय संस्कृती इस्रायलमध्ये जपली आहे. डिमोनामधील भारतीय ज्यू प्रामुख्याने उद्योग-व्यवसायात आहेत. शिवाय आयटी क्षेत्रामध्ये असणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. यातील अनेकजण शिक्षकी पेशामध्ये आहेत. काही अभिनेते आणि लेखकही आहेत. डिमोनामधील अनेक तरुण इस्रायली लष्करात महत्त्वाच्या पदांवर आहेत. डिमोनाची ओळख तेथील अणुभट्टीमुळेही आहे. या अणुभट्टीमुळेच मध्यपूर्वेच्या राजकारणात डिमोनाला महत्त्वाचे स्थान आहे. ( City of Dimona )

— सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!