Home आंतरराष्ट्रीय US–Iran War : युद्धामुळे हवामानाचे चक्र उलटे फिरणार
आंतरराष्ट्रीय

US–Iran War : युद्धामुळे हवामानाचे चक्र उलटे फिरणार

71

अमेरिका-इराण युद्ध लवकर संपणार ही आशा आता धूसर वाटू लागली आहे. दिवसेंदिवस युद्धाची दाहकता वाढत असून दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी अनेक घातक शस्त्रास्त्रांचा वर्षाव करत आहेत. या युद्धात विजय कोणाचा होणार, या प्रश्नापेक्षा आता या युद्धामुळे पर्यावरणाचा आणखी किती ऱ्हास होणार हा प्रश्न विचारला जात आहे. इराणमध्ये अ‍ॅसिड पाऊस पडत आहे. ही फक्त मर्यादित घटना नाही, तर पुढील काही दिवसांत अमेरिका-इराण युद्ध अशाच प्रकारे सुरू राहिले तर संपूर्ण मध्यपूर्वेतील पर्यावरणाची कधीही भरून न निघणारी हानी होणार आहे. आत्तापर्यंत ज्या लष्करी कारवाया झाल्या त्यात १.३ दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित झाला आहे. या सर्वांमुळे या भागातील वृक्षसंपदेवर मोठा परिणाम झाला आहे. हे प्रमाण एवढे भयानक आहे की पुढील काही वर्षे येथे कुठलीही वनस्पती तग धरू शकणार नाही, असा पर्यावरण तज्ज्ञांचा अंदाज आहे. या युद्धामध्ये जी शस्त्रे चालवण्यात येत आहेत त्यातून मोठ्या प्रमाणात घातक वायू पसरत आहेत. इस्रायलने काही दिवसांपूर्वी व्हाईट फॉस्फरस असलेले शस्त्र वापरल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे मनुष्याच्या शरीरावर गंभीर परिणाम होतो, अगदी हाडेही वितळू शकतात. मात्र हा व्हाईट फॉस्फरस हवेसोबत मातीही दूषित करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत या मातीमध्ये कुठलेही पीक येऊ शकणार नाही. त्यामुळे या युद्धामुळे हा सर्व भाग मनुष्याच्या वास्तव्यासाठी अत्यंत धोकादायक होणार आहे. ( US–Iran War )

अमेरिका-इराण युद्धाचा पर्यावरणावर भयंकर परिणाम होत आहे. या युद्धामुळे जगभरातील हवामान तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. युद्धामध्ये ज्या संहारक शस्त्रांचा वापर होत आहे त्यामुळे तापमान अधिक वाढणार आहेच, शिवाय पुढील अनेक वर्षे हा संपूर्ण भाग मानवी वसाहतीसाठी धोकादायक ठरणार आहे. यासंदर्भात “वन अर्थ” या वैज्ञानिक जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित झाला असून त्यामुळे जगभरातील पर्यावरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. लँकेस्टर विद्यापीठ आणि लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातील संशोधकांनी या युद्धातून होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास केला आहे. या अहवालानुसार १.३ दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित झाला आहे. यामध्ये तोफखाना, रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि इतर लष्करी उपकरणांच्या वापरामुळे उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचा समावेश आहे. युद्धादरम्यान जड शस्त्रे आणि लष्करी वाहनांचा वापर केल्याने या वायूंचा मोठ्या प्रमाणात वातावरणात समावेश होतो. इराणमध्ये याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. इस्रायल-गाझा युद्ध सुरू झाल्यावर गाझामध्येही असाच परिणाम जाणवला होता. आता तो भागही प्रदूषणाच्या दृष्टीने मानवी वसाहतीसाठी धोकादायक ठरला आहे.

अभ्यासकांच्या मते, युद्ध संपल्यानंतर किती मनुष्यहानी झाली आणि किती किंमतीची शस्त्रास्त्रे वापरली गेली याचे मोजमाप केले जाते. मात्र त्यासोबत युद्धात किती मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली याचे मोजमाप सर्वप्रथम व्हायला हवे. युद्ध संपल्यानंतरही त्याचा पर्यावरणावर झालेला परिणाम काही वर्षे टिकून राहतो. युद्धामध्ये ज्या रचना नष्ट झाल्या आहेत त्यांची नव्याने बांधणी करण्यात येते तेव्हाही प्रदूषणाचा स्तर धोकादायक स्थितीत पोहोचतो. अर्थात युद्धामध्ये रस्ते, इमारती आणि अन्य संरचनांची हानी झालेली असते. या सर्वांची पुनर्बांधणी सुरू होते तेव्हाही कार्बन उत्सर्जनात लक्षणीय वाढ होते. त्यामुळेच युद्धाचा हवामानावर काय परिणाम झाला आहे याची मोजदाद करणे गरजेचे आहे. इराणच्या तेहरानसह अन्य शहरांचे आकाश एवढे काळवंडले आहे की येथे पुढील काही वर्षांत एखादा पक्षीही उडणार नाही. येथील प्राण्यांच्या जीवनावरही मोठा परिणाम झालेला आहे. ( US–Iran War )

=======

हे देखील वाचा : Crude Oil : जमिनीत कच्चे तेल तसे तयार होते? कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल कसे बनते?

=======

इराणमध्ये या युद्धामुळे काळा पाऊस पडत आहे. त्यामुळे डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास आणि सतत तेल जळण्याचा वास असा त्रास होत आहे. हा पाऊस अत्यंत धोकादायक असून तो आम्लयुक्त असू शकतो, अशी भीती रेड क्रेसेंट सोसायटीने व्यक्त केली आहे. हा पाऊस फक्त आत्ताच नाही, तर पुढील काही वर्षांत इराणमध्ये अधूनमधून पडणार असल्याचीही भीती पर्यावरण तज्ज्ञांना आहे. यामुळे येथील मानवी जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. प्रत्यक्ष युद्धात मानवी जीवनाची हानी झाली नसली तरी पुढे या हवामानामुळे अनेकांना जीवघेणे श्वसनाचे आजार होण्याचा धोका आहे. त्यातून पुढील काही वर्षांत येथील मानवी मृत्यूचे प्रमाण वाढण्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ( US–Iran War )

सई बने…

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!