इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाची जगातील अनेक देशांना झळ बसत आहे. या युद्धामुळे इराणकडून जे देश कच्चे तेल घेतात त्या देशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लगत आहे. इराणकडून इंधन आणि कच्चे तेल न मिळाल्याने त्या देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. भारतात देखील याचा प्रभाव पाहायला मिळत असला तरी त्याचे प्रमाण मात्र कमी आहे. काळे सोने अशी ओळख असलेल्या कच्च्या तेलाला सुरुवातीपासूनच मोठी किंमत आहे. मात्र हे कच्चे तेल तयार होते तरी कसे? आणि याच कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल बनते कसे? याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. (Crude Oil)
कच्चे तेल हे लाखो वर्षांपूर्वी समुद्रतळाशी गाडल्या गेलेल्या मृत सागरी जीव, वनस्पती आणि सूक्ष्मजीवांच्या प्लँक्टन अवशेषांपासून तयार होते. उच्च दाब, प्रचंड उष्णता आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे या सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन त्यांचे रूपांतर हायड्रोकार्बन्समध्ये होते, ज्याला कच्चे तेल म्हणतात. पेट्रोल किंवा डिझेल हे काही एका दिवसात तयार होत नाही. लाखो वर्षांपूर्वी समुद्रामध्ये राहणारे ‘प्लँक्टन’ नावाचे सूक्ष्मजीव आणि छोटे समुद्री जीव मेल्यावर समुद्राच्या तळाशी चिखलात गाडले गेले. पृथ्वीच्या पोटातील प्रचंड उष्णता साधारणपणे 60 ते 100 अंश सेल्सिअस आणि वरून पडलेला माती-दगडांचा दाब यामुळे या मृत जीवांचे रूपांतर हायड्रोकार्बन्समध्ये झाले. आज आपण जे तेल वापरतो, ते प्रत्यक्षात या प्राचीन समुद्री जीवांचे अवशेष आहेत. हे विज्ञानाने सिद्ध केलेले सत्य आहे. (Oil)
जमिनीखाली तेल तयार झाले आणि ते जमिनीत नक्की कुठे आहे? हे कसे समजते? तेल शोधणे ही अत्यंत खर्चिक आणि तांत्रिक प्रक्रिया आहे. यासाठी ‘सिस्मिक सर्व्हे’ केला जातो, म्हणजेच जमिनीच्या आत लहरी सोडून दगडांच्या रचनेचा अभ्यास केला जातो. जर त्या खडकांमध्ये तेल साठल्याचे संकेत मिळाले, तर ड्रिलिंग मशिनच्या सहाय्याने हजारो मीटर खोल विहिरी खोदल्या जातात. भारतात ओएनजीसी कृष्णा-गोदावरी खोऱ्यात अशाच प्रकारे उत्खनन करत आहे. (Todays Marathi HEadline)

जमिनीतून निघालेले तेल थेट गाडीत टाकता येत नाही, कारण ते अत्यंत घट्ट आणि अशुद्ध असतं. याला गुजरातच्या जामनगरसारख्या मोठ्या रिफायनरीमध्ये नेले जाते. तिथे ‘अंशात्मक ऊर्ध्वपातन’ प्रक्रियेत या तेलाला 350 ते 400 अंश सेल्सिअसपर्यंत गरम केले जाते.वेगवेगळ्या तापमानाला यातून वेगवेगळे पदार्थ बाहेर पडतात:सर्वात वर: एलपीजी गॅस आणि पेट्रोल.मध्यभागी: डिझेल, केरोसीन आणि जेट इंधन.सर्वात खाली: वंगण, इंजिन ऑईल आणि डांबर. एका 159 लिटरच्या कच्च्या तेलाच्या बॅरलमधून साधारण 72 लिटर पेट्रोल आणि 45 लिटर डिझेल मिळते. (Marathi)
भारताला तिन्ही बाजुंनी विशाल समुद्रकिनारा असला तरी, भारतात जास्त तेल का तयार होत नाही. आपण 85% तेल आयात का करतो? तर आपल्याकडील तेलाचे साठे अत्यंत खोलवर आणि दुर्मिळ आहेत. भारताकडे सध्या केवळ 65 कोटी मेट्रिक टन तेल साठा आहे, जो आपल्या गरजेच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळेच आपल्याला आपल्या एकूण गरजेपैकी 85% तेल परदेशातून आयात करावे लागते. (Top Marathi News)
कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल आणि केरोसीन यांसारखी उत्पादने बनविण्याच्या प्रक्रियेला इंग्रजीत रिफायनिंग म्हणतात. शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान, कच्चे तेल वेगळ्या घटकांमध्ये मोडले जाते, ज्याला हायड्रोकार्बन्स म्हणतात. या हायड्रोकार्बन्सचा वापर विविध प्रकारचे इंधन आणि इतर उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. शुद्धीकरणासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. यामध्ये डिस्टिलेशन, क्रॅकिंग, रिफॉर्मिंग आणि अल्किलेशन यासारख्या प्रक्रियांचा समावेश होतो. (Latest Marathi Headline)
========
Iran’s NOPO Special Forces : IRGC पेक्षा घातक आहे NOPO
========
पेट्रोल कसे बनते?
पेट्रोल हा लहान कार्बन साखळ्यांनी बनलेला हलका हायड्रोकार्बन आहे. डिस्टिलेशन दरम्यान पेट्रोल कच्च्या तेलापासून वेगळे केले जाते, नंतर ते वेगवेगळ्या संयुगे मिसळले जाते, जेणेकरून त्याची गुणवत्ता वाढवता येते. यानंतरच पेट्रोल बनते, जे आमची वाहने चालवते. (Top Trending News)
डिझेल कसे बनते?
डिझेल हे जड हायड्रोकार्बन्सपासून बनवले जाते. हे डिस्टिलेशन प्रक्रियेद्वारे देखील तयार केले जाते. डिझेल तयार करण्यासाठी, ते अनेक वेळा हायड्रोट्रीट केले जाते जेणेकरून त्यातून सल्फर आणि इतर अशुद्धता काढून टाकता येतील. यामुळे पर्यावरणाला किंचित कमी हानी होते. (Top Stories)
रॉकेल कसे तयार केले जाते?
केरोसीन म्हणजेच रॉकेल देखील ऊर्धपातन प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. डिझेलच्या अगदी वरच्या डिस्टिलेशन टॉवरमध्ये रॉकेल तेल जमा होते. केरोसीन हे मध्यम श्रेणीतील हायड्रोकार्बनपासून बनलेले असते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- America
- crude oil
- crude oil news
- how to made Crude Oil
- how to made dizel
- how to made kerosene
- how to made petrol
- iran
- iran and america war
- know about
- know about Crude Oil
- North America and South America Antarctica
- अमेरिका
- अमेरिका आणि इराण
- इराण
- कच्चे तेल
- कच्चे तेल माहिती
- जमिनीत कच्चे तेल कसे तयार होते?
- डिझेल कसे बनते?
- पेट्रोल कसे बनते?
- भारत
- रॉकेल कसे बनते?