कायमच देवाने धर्माच्या, पृथ्वीच्या आणि लोकांच्या रक्षणार्थ विविध रूपं घेतले आहे. श्रीकृष्णांनी तर सांगितले देखील आहे,
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥”
अर्थात जेव्हा जगात पाप किंवा अन्याय वाढतो, तेव्हा ईश्वर प्रकट होऊन चांगल्या लोकांचे रक्षण करतात आणि वाईट प्रवृत्तींचा नाश करून पुन्हा धर्म प्रस्थापित करतात. त्रेतायुगात देखील जेव्हा रावणाचे पाप वाढले तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी राम अवतार घेतला आणि रावणाचा अंत केला. भगवान राम हे साधारण मनुष्य होते, जे आजही त्यांच्या गुणांसाठी ओळखले जातात. श्रीरामांनी कायम आपल्या कर्तव्याचे पालन केले. आज ते संपूर्ण मनुष्य जातीसाठी आदर्श आहेत. अशा या श्रीरामांनी आपले अवतार कार्य कसे संपवले असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. कारण अनेकांना रामायण फक्त श्रीराम वनवास संपवून अयोध्येमध्ये परत आले इथपर्यंतच माहिती आहे. पण यानंतर देखील रामायण आहे, ज्याला ‘उत्तर रामायण’ म्हटले जाते. याच उत्तर रामायणामध्ये श्रीरामांनी आपला अवतार कसा संपवला याबद्दल माहिती आहे. एका माहितीवरून आपण रामाच्या अवतारकार्य समाप्तीबद्दल जाणून घेऊया. (Shriram)
14 वर्षांनी वनवासातून परत आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी अयोध्येवर अनेक वर्षे रामराज्य केले. याकाळात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या. माता सीता देखील त्यांच्या मुलांना श्रीरामांकडे सोपवून अंतर्धान पावल्या होत्या. मात्र श्रीराम प्रभूंना आपले अवतार कार्य संपवण्याची आठवणच नव्हती. भगवान विष्णूनां वैकुंठात परत आणणे आवश्यक होते. सर्व देव यमराजाकडे गेले. त्यांच्यावर ही कामगिरी सोपावली. परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहेत तोपर्यंत मी त्या नगरीत पाऊलही टाकू शकत नाही असे सांगितले. (Ramnavami)
शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी काळावर सोपावली. त्याने ती मान्य केली. पण त्यालाही हनुमंताची भीती होतीच. म्हणून त्यांनी साधूचा वेष घेतला. बरोबर दुर्वास मुनींना घेतले, दोघेही अयोध्येत आले. काळ राजवाड्यात आला व त्यांनी प्रभू रामरायाला भेटण्याची ईच्छा प्रगट केली, रामरायांची भेट झाली. प्रभूंनी त्यांना ओळखले. काळाने एकांतात बोलण्याची विनंती केली. रामचंद्रांनी महालाच्या एका खोलीत त्यांना नेले. लक्ष्मणाला दारात पहारा देण्यासाठी उभे केले. कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा केली. आज्ञा मोडणाऱ्याला मृत्युदंड दिला जाईल असे बजावले. लक्ष्मण पहारा देत उभे राहिले. एकांतात काळाने भगवंतांना आपले अवतार कार्य संपवण्याची विनंती केली. (Marathi)
प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मृत्युअटळ आहे या सत्याची आठवण करून दिली. प्रभूंनी आपली विवषता बोलून दाखवली. लक्ष्मण व हनुमंत यांच्या भक्तीने मी बांधला गेलो आहे, ते मला अवतार संपवू देणार नाहीत असे सांगितले. लक्ष्मणांना बाजूला करण्याची योजना मी केली आहे असे काळाने सांगितले. ती जबाबदारी दुर्वासांना दिल्याचे सांगितले. तुम्ही हनुमंतांना बाजूला करा अशी विनंती केली. प्रभूंनी त्यास होकार दिला. तोपर्यंत दुर्वास मुनी तेथे आले. त्यांनी रामास भेटायचे आहे असे सांगीतले. लक्ष्मणा ने नकार दिला. प्रभूंची आज्ञा सांगीतली. पण दुर्वास ऐकेनात. ते अत्यंत क्रोधीष्ट झाले. आपली भेट नाकारणाऱ्यांना श्रीरामास आता मी शापच देतो असे म्हणू लागले. (Todays Marathi Headline)

लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभे राहिले. मुनींना आत जावू द्यावे तर बंधू आज्ञेचे उल्लंघन होईल व मृत्युदंडाला सामोरे जावे लागेल. नाही जावू द्यावे तर पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील. शेवटी लक्ष्मणाने मृत्यूला सामोरे जाण्याचे ठरवले. रामरायांना विचारून येतो असे म्हणून लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला. इकडे दुर्वास गुप्त झाले. लक्ष्मणाला पहाताच रामचंद्रांनी त्याला आपल्या आज्ञेची आठवण करून दिली. परंतु दुर्वास आल्यामुळे आज्ञा मोडावी लागली असे लक्ष्मणाने सांगितले. प्रभूंनी त्याला मृत्युदंड घेण्यास सांगीतले. अयोध्येच्या बाहेर तु निघून जा हाच तुला मृत्युदंड असे सांगीतले. समोर प्रत्यक्ष काळाला बसलेला पाहून लक्ष्मण काय समजायचे ते समजला. राजमहालाच्या बाहेर पडून लक्ष्मण शरयू तीरावर गेला. शरयू नदीत आपला देह त्यागून आपल्या मूळ स्वरुपात म्हणजे पुन्हा शेषनाग होऊन प्रभूंच्या येण्याची वाट पहात बसला. (Top Trending News)
इकडे प्रभू रामचंद्रांचाकाळाने निरोप घेतला. प्रभू खोलीच्या बाहेर आले. त्यांनी आपल्या हातातली अंगठी काढली. महालाच्या दोन दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती, त्या फटीत ती अंगठी टाकली. हनुमंताला बोलावून आणण्याची आज्ञा केली, हनुमंत आले. प्रभूंनी त्यास अंगठी फटीत अडकल्याचे सांगीतले. हनुमान अंगठी काढू लागले. पण फट लहान असल्याने काही केल्या अंगठी निघेना. मग हनुमंताने सुक्ष्मरूप घेतले व त्या फटीत गेले. पण ती फट म्हणजे एक सुरंग होता. त्या फटीतुन हनुमंत थेट पाताळात गेले. (Top Marathi News)
इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणांस सहन होत नाही, म्हणून आपणही आता शरयू मध्ये जातो असे सर्वांना सांगीतले. प्रजाजन रडू लागले शोक करू लागले रस्ता आडवू लागले. प्रभू मात्र कोणाचे ऐकेणात. शेष त्यांची वाट पाहत होता. प्रभू शरयू तीरावर आले. सर्व प्रजाही बरोबर आली. ज्या मार्गाने लक्ष्मणजी गेले त्याच मार्गाने प्रभूंनीही प्रवेश केला व पाण्यात नाहीसे झाले. इकडे हनुमंत पाताळात पोहोचले. वासूकी ने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी येथे आलो असे हनुमंतांनी सांगीतले. वासूकीने त्यांना अंगठ्यांचा ढीग दाखवला व यातून प्रभूंची अंगठी शोधून घेवून जा असे सांगीतले. परंतु त्या सगळ्या अंगठ्या सारख्याच होत्या. सर्व रामरायांच्याच होत्या. त्यामुळे मारुतीपुढे संभ्रम निर्माण झाला. तेव्हा खरी गोष्ट वासुकींनी त्यांना सांगितली. (Latest Marathi Headline)
============
Ram Navami : मनोकामना पूर्ण करण्यासाठी रामनवमीला करा ‘हे’ उपाय
Ram Navami : श्रीरामांची कुलदेवी कोण होती माहिती आहे का?
Shriram : प्रभू श्रीरामांच्या जन्माची कथा
Shriram : ‘हा’ आहे जगातील एकमेव देश जेथील राजा स्वत:ला मानतो श्रीरामांचा वंशज
============
आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत, हे ऐकून मारूतीराय मनोवेगाने शरयू तीरावर आले. सर्व प्रजाजन शोक करीत होते. मारुतीरायांनाही अनावर असा शोक झाला. त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा शरयूतुन शेषावर पहूडलेले भगवान महाविष्णू प्रगट झाले. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी भगवंताचे दर्शन घेतले. आपले कार्य संपल्यामुळे आपण वैकुंठी जात आहोत, कोणीही शोक करू नका असे सांगीतले. आपले दोन्हीही पुत्र व बंधूंचे पुत्र यांच्याकडे राज्यव्यवस्था लावून दिली आहे त्यांच्या आज्ञेत सुखाने रहा असा आशिर्वाद दिला. हनुमंत बरोबर येण्याचा हट्ट करू लागले. प्रभूंनी त्यांना त्यांच्या चिरंजीवीत्वाची आठवण करून दिली. अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्या वर दिली. सर्वांचा निरोप घेवून प्रभूंनी वैकुंठाला गमन केले. (Top Stories)
अजून एका आख्ययिकेनुसार आणि हिंदू पुराणांनुसार, प्रभू रामचंद्रांचा मृत्यूबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार, देवी सीतेने आपली मुलं लव आणि कुश यांना श्रीरामांच्या स्वाधीन केले आणि त्या धरती मातेसोबत जमीनीत सामावल्या आणि आपले अवतारकार्य संपवले. सीतेच्या जाण्याने भगवान श्रीराम इतके दुःखी झाले की त्यांनी यमराजाची संमती घेऊन शरयू नदीत जलसमाधी घेत आपले अवतारकार्य संपवले. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)