Home सामाजिक Kharmas : खरमास येतोय…
सामाजिक

Kharmas : खरमास येतोय…

1

हिंदू धर्मात प्रत्येक तिथीचे वेगळे महत्त्व आहे. धार्मिक विधी कधी आणि कसे करावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिलेले असते. अशाच तिथींमध्ये खरमासचे विशेष महत्त्व सांगितले जाते. सूर्य गुरु राशीत असताना खरमास सुरू होतो. या तीस दिवसांच्या कालावधीत काय करावे आणि काय करू नये याची माहिती पौराणिक ग्रंथांमध्ये दिलेली आहे. खरमासमध्ये नामस्मरण केले जाते, मात्र या काळात पूजा आणि शुभ धार्मिक कार्ये केली जात नाहीत. २०२६ मध्ये खरमास १५ मार्च रोजी सुरू होणार असून १४ एप्रिलपर्यंत राहणार आहे. ( Kharmas )

सूर्य गुरु राशीत प्रवेश करताच खरमास सुरू होतो. १५ मार्च २०२६ रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन संक्रांती होताच खरमास सुरू होईल आणि १४ एप्रिलपर्यंत चालेल. खरमास दरम्यान कोणतेही शुभ कार्यक्रम केले जात नाहीत. लग्न, गृहप्रवेश, बारसे, नवीन व्यवसाय सुरू करणे आदी कार्ये या काळात टाळली जातात. हे फक्त धार्मिक कारणांमुळे नसून पौराणिक ग्रंथांमध्ये यामागे शास्त्रीय कारणेही दिली आहेत.

खरमासच्या काळात सूर्य गुरुच्या राशीत असल्यामुळे त्याची ऊर्जा कमी होते, असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, या काळात सूर्यदेवाच्या रथातील घोडे थकतात आणि त्यांना गाढवांवर बसवले जाते. घोडे आणि गाढव यांच्या वेगात मोठा फरक असल्यामुळे या काळात सर्व कार्ये मंदगतीने होतात, अशी धारणा आहे. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश, वाहन खरेदी यांसारखी कामे खरमासमध्ये करू नयेत, असे सांगितले जाते. ( Kharmas )

मात्र हा कालावधी भगवान विष्णूच्या नामस्मरणासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हा काळ आध्यात्मिक साधना, दान, पुण्यकर्म आणि भगवान विष्णूच्या पूजेसाठी योग्य असल्याचे सांगितले जाते. या काळात सूर्याला अर्घ्य देणे, आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे आणि गायींना हिरवा चारा खाऊ घालणे हे प्रगती आणि आध्यात्मिक शांततेचे प्रतीक मानले जाते. खरमास वर्षातून दोन वेळा येतो. दुसरा खरमास १६ डिसेंबर ते १४ जानेवारी या धनु संक्रांतीच्या काळात येतो.

२०२६ मध्ये पहिला खरमास १४ मार्च रोजी दुपारी १:०८ वाजता सूर्य संक्रमणानंतर सुरू होईल. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:३८ वाजता सूर्य मेष राशीत प्रवेश करताच खरमास समाप्त होईल. या काळात सूर्याची हालचाल मंदगतीने होत असल्याचे मानले जाते आणि त्यामुळे त्याची सकारात्मक ऊर्जा कमी होते. हिंदू धर्मानुसार प्रत्येक शुभ कार्यासाठी गुरु, शुक्र आणि सूर्य यांची शुभ स्थिती आवश्यक मानली जाते. त्यामुळे खरमासमध्ये शुभ कार्ये टाळली जातात. ( Kharmas )

मात्र या काळात भगवान विष्णूची आराधना केल्यास जीवनात प्रगती आणि शांतता मिळते, असे सांगितले जाते. विष्णू सहस्रनामाचे पठण, गरीब व गरजूंना दान देणे, मंदिरात दीपदान करणे यांना विशेष महत्त्व आहे. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख व समृद्धीचा आशीर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे.

=======

हे देखील वाचा : Gangaur Festival : गणगौर उत्सवासाठी परदेशी पर्यटकांनी जयपूर गजबजले

=======

खरमास हा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये हा आत्मनिरीक्षण आणि भक्तीचा कालावधी म्हणून वर्णन केला आहे. या काळात सांसारिक गोष्टींपासून दूर राहून तप आणि साधना केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे सांगितले जाते. ( Kharmas )

या काळात आहाराबाबतही विशेष मार्गदर्शन केले आहे. खरमास हा ऋतू बदलाचा काळ असल्यामुळे आजारपण आणि साथीच्या रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे साधा आणि सात्विक आहार घेणे हितावह मानले जाते. मूग डाळ, खिचडी, दूध, फळे आणि हिरव्या भाज्या यांसारखे हलके आणि पचायला सोपे पदार्थ खाणे उत्तम मानले जाते. कांदा, लसूण, मांस, मासे आणि मद्यपान यांसारखे तामसिक पदार्थ टाळावेत, असेही सांगितले जाते.

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Health Care
सामाजिक

Chardham Yatra : चारधाम यात्रेची तयारी सुरू

उत्तराखंडची चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त...

सामाजिक

Yamunotri Dham : यमुनोत्री धामची रहस्ये

उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ...

सामाजिक

Narmadeshwar Mahadev Temple : रंग बदलणारे शिवलिंग

उत्तर प्रदेशामध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे पौराणिक कथा...

सामाजिक

Chilkur Balaji Temple : अनोखे व्हिसा मंदिर

प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या महाबली हनुमानांचा जन्मोत्सव २ एप्रिल रोजी साजरा होणार...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!