Home गाजावाजा स्पेशल Chaitrangan : चैत्र महिन्यात काढली जाणारी चैत्रांगण रांगोळी
गाजावाजा स्पेशल

Chaitrangan : चैत्र महिन्यात काढली जाणारी चैत्रांगण रांगोळी

75
Dolphin Research Center

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्ष. गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी साजरा केला जातो. या दिवशी हिंदू आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. विजयाची गुढी दारोदारी उभी करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. याच चैत्र महिन्याच्या तृतीयेला अर्थात तिसऱ्या दिसव्ही महाराष्ट्रामध्ये चैत्रगौरी बसवल्या जातात. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये ही चैत्रगौर बसवली जाते. आपली भारतीय संस्कृती अनेक गोष्टींनी आणि सणांनी समृद्ध आहे. रांगोळी ही देखील आपल्या देशातील अतिशय जुनी आणि प्रचलित परंपरा आहे. (Chaitrangan)

भारतात आजही अनेक घरांसमोर रोज रांगोळी काढली जाते. रांगोळी मांगल्याचे प्रतिक मानले जाते. गावाकडे किंवा शहरात अगदी दररोज घराबाहेर रांगोळी काढली जाते. रांगोळीतील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे चैत्रांगण. महाराष्ट्रात या रांगोळीला विशेष महत्त्व आहे. चैत्रांगण रांगोळी खासकरून चैत्र महिन्यात, चैत्रगौरीच्या दिवसांमध्ये काढली जाते. ही रांगोळी केवळ सजावटीसाठी नसून, ती आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि शुभतेचे प्रतीक आहे. चैत्रांगणा रांगोळीमध्ये अनेक शुभ चिन्हं असतात. यातील शुभचिन्हांचे महत्त्व नक्की काय आहे, जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

‘चैत्रांगण’ हे नावच सांगते की ही रांगोळी चैत्र महिन्यात अंगणात साजरी होते. यामध्ये पारंपरिक पद्धतीने 51 ते 64 शुभचिन्हे रेखाटली जातात, जी देवीच्या स्वागताचा भाग असतात. विशेषतः चैत्र शुद्ध पंचमी रोजी, देवी चैत्रगौरीच्या आगमनानिमित्त ही रांगोळी दरवाज्यासमोर, अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी साजशीरपणे काढली जाते. निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्रांगण काढले जाते. पूर्वी चैत्रांगणात ६४ चिन्हे काढली जात असत. मात्र, आता कालानुरूप त्यात बदल होत गेले आहेत. रांगोळीच्या सर्वात वरच्या बाजूला आंब्याचे तोरण काढले जाते. यानंतर त्याखाली देवघर काढले जाते. या देवघरात काढण्यात आलेली दोन प्रतिके शिव-पार्वती किंवा लक्ष्मी-नारायण वा चैत्रागौरी किंवा अनुराधा व स्वाती ही दोन सृजनाची नक्षत्रे असल्याचे मानले जाते. (Marathi News)

Chaitrangan

गणपती आणि सरस्वती साकारली जाते. आपल्याकडील समृद्धीची प्रतिके यात काढलेली दिसतात. हत्ती, घोडा, नागयुगुल, गरुड अशी समृद्धीची प्रतिके चिन्हांच्या स्वरुपात काढली जातात. याशिवाय कासव, बासरी, स्वस्तिक, त्रिशूळ, धनुष्यबाण, तुळशी वृदांवन, मोरपीस, कमळ, कलश, आंबा, केळी, सनई चौघडा, डमरू यांची प्रतिकात्मक चिन्हे काढली जातात. सोबतच सूर्य आणि चंद्र, यशाचे प्रतीक असलेला ध्वज, नववर्षाची सुरुवात म्हणून गुढी, शंख, पद्म, गदा, चक्र, गोपद्म, ओम, सौभाग्य लेणी म्हणजेच हळदी कुंकवाचा करंडा, फणी, पणती, सवाष्णीची ओटी म्हणजे खण-नारळ, रुद्राक्ष, सृजनाचे प्रतीक म्हणून पाळणा, कामधेनूसह वासरू, ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून अंबारी अशी विविध चिन्हे काढली जातात. (Latest Marathi Headline)

सोबतच ब्रह्मकमळ, ज्ञानकमळ, हे जगत्पिता ब्रह्मदेवाचे स्वरूप. विष्णूचा अवतार म्हणून कासव, तुळशी वृंदावन. गाय, वासरू हे कामधेनूचे प्रतीक. शंकराच्या गळ्याचा नाग, श्रीराम म्हणजे विष्णू त्यांचे वाहन गरुड काढले जाते. पूर्ण फळे आंबा, केळी, शिवलिंग, पणती, कलश, रुद्र, उंबर, पिंपळ वृक्ष आणि पाळणा.चैत्रांगणातून समृद्ध भारतीय संस्कृती प्रतिकात्मकरित्या दाखवली जाते, असे म्हणतात. (Top Stories)

=========

Navratri : जाणून घ्या चैत्र आणि अश्विन नवरात्रात नेमका फरक काय?

Gudhipadwa : गुढीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे आहे विशेष अर्थ

Chaitragauri : चैत्र महिन्यात तृतीयेला येणारी चैत्रगौरी

=========

चैत्रांगण रांगोळीची रचना ही सामान्यतः चौकोनी किंवा वर्तुळाकार असते. काही ठिकाणी ही रांगोळी केवळ पांढऱ्या रंगात, तर काही ठिकाणी रंगीबेरंगी स्वरूपात काढली जाते. ही रांगोळी काढताना शुभचिन्हे निश्चित क्रमाने, संतुलन राखून मांडली जातात. चैत्रांगण रांगोळी काढल्याने सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते. शिवाय देवीचा आशीर्वाद लाभतो. आपल्या कला आणि संस्कृतीचा संवर्धन होते. पिढी दर पिढी ज्ञानसंक्रमण साधले जाते. मात्र चैत्रांगण रांगोळी काढताना शुभचिन्हे योग्य जागी आणि क्रमाने मांडावीत. चैत्रांगण ही फक्त एक रांगोळी नसून, ती आपली परंपरा श्रद्धेची, संस्कृतीची आणि सौंदर्याची ओळख आहे. (Social News)

(टीप :वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!