सध्या चैत्र नवरात्र सुरु असून, सगळीकडे भक्तिमय वातावरण दिसून येत आहे. चैत्र नवरात्र हे दुर्गा देवीला समर्पित असून, याकाळात देवीची सेवा आणि उपासना केली जाते. चैत्र नवरात्राला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. नवरात्रीच्या काळात भक्तगण देवीच्या विविध मंदिरांना भेट देऊन तिचे दर्शन घेतात. भागवत पुराणातील उल्लेखानुसार, देशभरात १०८ शक्तीपीठे आहेत. त्यातील महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. (Chaitra Navratra)
साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. ‘अ’कार पीठ माहूर ‘उ’कार पीठ तुळजापूर ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रृंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ. साडेतीन शक्तीपीठांपैकी याच सप्तशृंगी पर्वतरांगांवर देवीने महिषासुराचा वध केल्याचे सांगितले जाते. (Saptashrungi Temple)
सप्तशृंगी हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने आपण सप्तशृंगी देवीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Marathi)
सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा आदी महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत. सप्तशृंगी देवीचे नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर आणि 4800 फूट उंचीवर वास्तव्य आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गडावर सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे. एका आख्यायिका आहे की महिषासुर मर्दन करण्यासाठी देवतांनी त्यांची याचना केली त्यामुळे देवी होमातून प्रकट झाली. तिचे हेच रूप म्हणजे सप्तशृंगीचे होते. हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात. हे ब्रह्मदेवाच्या कमंडळापासून निघालेल्या गिरीजा महानदीचे रूप तसेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे त्रिगुणात्मक असे स्वरूप म्हणजे देवी सप्तशृंगी. (Todays Marathi Headline)

या महिरपीत देवीची मूर्ती आठ फुटी उंच आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्णी आहे. या देवीचे डोळे तेजस्वी असून टपोरे आहेत. सर्व हात एकमेकांना लागलेले आहेत. महिषासुराशी लढण्यासाठी देवीला सर्व देवांनी शस्त्रे दिलेली असे. श्री भगवतीला १८ हात असून तिला अष्टादश देवी असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तीन आयुध धारण केलेली आहेत. (Top Trending Headline)
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी अशी मान्यता आहे. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. ही देवीची मूर्ती स्वयंभू तसेच भव्य आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आदींनी आपापली शस्त्रे व अस्त्रे देवीला दिल्याचे सांगितले जाते. (Top Marathi News)
सप्तश्रृंगी देवीचे एक वैशिष्ट्य म्हणजे चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न भासते, तर शारदीय नवरात्रात देवीचे मुख गंभीर असते, अशी मान्यता आहे. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आहे की, राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय, असे मानले जाते. एवढेच नाही तर सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. (Latest Marathi Headline)
प्राचीन काळात सप्तशृंग हे दंडकारण्याचा एक भाग होता. ऋषी मार्कंडेय आणि ऋषी पाराशर यांनी इथेच तपश्चर्या केली होती. या गडावर चढून मंदिरात जाण्यासाठी साधारणपणे 500 पायऱ्या चढून जावं लागते. सकाळी सहा वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत मंदिरात पूजा केली जाते. सप्तशृंगगड पश्चिमी डोंगराच्या रांगेत समुद्रतळा पासून साडेचार हजार फुटी उंचीवर आहे. येथे बरेच प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्र आहे. असे म्हणतात की वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम येथे आले असे. या सप्तशृंगी देवीच्या विरुद्ध दिशेला जवळच्या डोंगरावर मच्छिन्द्रनाथाचे मंदिर आहे. त्याचा समोर मार्कंडेय ऋषींचे डोंगर आहे. (Top Stories)
========
Gudipadwa : गुढी पाडवा १८ की १९ कोणत्या तारखेला? जाणून घ्या गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त!
========
पूर्वीच्याकाळी गडावर 108 कुंड असल्याचा उल्लेख आहे. त्यातील दहा ते पंधरा अस्तित्वात आहेत. देवीच्या मागील बाजूस उत्तरेकडे तांबूलतीर्थ आहे. या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीने पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला त्यामुळे पाणी लालसर झालं अशी तर काजलतीर्थ या कुंडात देवीने काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून हे पाणी काळसर रंगाचं अशी अख्यायिका आहे. सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामीनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते, असेही सांगितले जाते. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Aerospace Industries
- Chaitra Navratra
- Chaitra Navratra 2026
- Chaitra Navratra special
- Sade Teen Shaktipeeth
- saptashrungi devi
- saptashrungi devi nashik
- saptashrungi devi temple
- saptashrungi devi vani history
- vani
- चैत्र नवरात्र
- चैत्र नवरात्र २०२६
- सप्तशृंगी देवी
- सप्तशृंगी देवी वणी
- सप्तशृंगी देवीची माहिती
- सप्तशृंगीदेवी
- साडे तीन शक्तिपीठे