Home राशीभविष्य Horoscope : आजचा दिवस ‘या’ राशींसाठी लाभदायक
राशीभविष्य

Horoscope : आजचा दिवस ‘या’ राशींसाठी लाभदायक

0

आज 21 मार्च शनिवार तर आज चैत्र नवरात्रातील तिसरा दिवस असून आज देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते. आजचा दिवस कोणत्या राशींसाठी कसा असेल हे आपण आजच्या राशिभविष्यमधून जाणून घेऊया.

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणारा आहे. आजच्या दिवसांत अनेक अनुकूल बदल पहायला मिळतील. आज असे काहीतरी घडेल ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल. शिवाय आजच्या दिवसात तुमच्या हातून शुभकार्य घडण्याची शक्यता आहे.

वृषभ
आज वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. आपल्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यवसायात वाढ होईल. आज आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. शिवाय कामाचे नियोजन करा आणि मगच काम करा.

मिथुन
आज तुम्हाला नोकरीत नवीन अनुभव येऊ शकतात. दिवसाची सुरुवात थोडी कठीण झाली तरी उरलेला दिवस तुमचाच असेल. आज तुम्हाला तुमच्या कामात नशिबाची साथ मिळेल. अचानक प्रवासाचे देखील योग जमून येत आहे. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला समाधान लाभेल.

कर्क
कर्क राशीसाठी आजचा दिवस ठीक असेल. महत्त्वाची कामे आजच्या दिवसांत पूर्ण होतील. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा होणार आहे. एखाद्या मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला एका मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल.

सिंह
आज सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल. परदेश प्रवासाचे नियोजन केले जाईल. आज सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील.

कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. कामामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबीयांसोबत वेळ नक्की घालवा. बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील.

तूळ
तूळ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्याकडे पाहुणे येतील आणि त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण असेल. आज दिवसभरात तुम्हाला एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमची कामे पूर्ण करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागेल.

वृश्चिक
आज अनावश्यक खर्च टाळा. आज महिलावर्गाला किचनमध्ये जास्त काम करावे लागू शकते. कामामध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आजच्या दिवसात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. आज घरात आनंदाचे वातावरण राहील.

धनु
तुमच्या कामाची पद्धत सुधारण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात प्रगती होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप मिळेल.

मकर
मकर राशीसाठी आजचा दिवस मिश्रीत स्वरुपाचा असेल. काही जुन्या अडचणी किंवा वाद आज मिटण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे.

कुंभ
कुंभ राशीसाठी आजचा दिवस भावनिक असणार आहे. आज कोणतेही निर्णय घेताना नीट विचार करा, भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आज काही नवीन प्रोजेक्ट्स हाती लागतील.

मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. करिअरमध्ये आणि व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. आज कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. जवळच्या नात्यांमध्ये थोडे वाद होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहयोगाने तुम्हाला अनेक कामे पूर्ण करता येतील.

(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

राशीभविष्य

Horoscope : जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

28 मार्च शनिवार. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाचा दहावा दिवस आहे. शनिवार हनुमानजींचा...

राशीभविष्य

Horoscope : आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असेल?

आज 13 मार्च शुक्रवार. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असून आजच्या दिवशी...

राशीभविष्य

Horoscope : राशिभविष्य! आज ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ

आज ७ मार्च शनिवार. आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची...

राशीभविष्य

Horoscope : फेब्रुवारीचा शेवटचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार विशेष

आज २८ फेब्रुवारी शनिवार. शनिवार हा हनुमान आणि शनिदेव यांना समर्पित असलेला...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!