आज 13 मार्च शुक्रवार. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असून आजच्या दिवशी देवीचे दर्शन घेतल्याने लाभ तर होतीलच सोबतच जीवनातील दुःख देखील कमी होईल. आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल हे आपण आजच्या राशिभविष्यमधून जाणून घेऊया.
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी सरासरी असेल. तुम्हाला काही कामात अपेक्षित परिणाम मिळतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ आनंद देईल. आज तुमच्या बोलण्याने कोणाचे मन दुखवू शकते.
वृषभ
आजचा दिवस कामासाठी उत्तम आहे. आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जा. कौटुंबिक मतभेद उद्भवू शकतात. आज कामाच्या बाबतीत अनेक मतभेद असतील. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा.
मिथुन
आज हातात असलेल्या सर्व कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा. लवकरच लांबच्या प्रवासाचे योग जुळून येण्याची शक्यता आहेत.
कर्क
आज बोलताना योग्य शब्दांचा वापर करा. राग आणि घाईमुळे काम बिघडू शकते. आज तुमची सगळी कामे वेळेत पूर्ण कराल. आर्थिक गोष्टींमध्ये काटकसरीला प्राधान्य द्या. आज अचानक धनलाभ होऊ शकतो.
सिंह
आजचा दिवस यश आणि उत्साहाचा असेल. आज तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणाल. तुम्ही कामासाठी घेतलेले कष्ट केलेली मेहनत आज तुम्हाला फळ देईल.
कन्या
आज तुमचे आरोग्य चांगले राहील. आज करिअरमध्ये तुम्ही चांगली प्रगती करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुमचे जुने व्यवहार पुन्हा डोकेवर काढू शकतात.
तूळ
ऑफिसमध्ये जास्त कामामुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. आज बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनू शकतो. वेळेचा योग्य वापर करा. कुटुंबात तणाव वाढवू शकतील त्यामुळे वाद टाळा.
वृश्चिक
आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असेल. आज तुमचे सामाजिक किंवा राजकीय संबंध मजबूत होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. आज वाहन जपून चालवा.
धनु
तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. घरातील वातावरण आनंददायी राहील. एखाद्या गोष्टीवरून आई-वडिलांशी वाद होऊ शकतो. ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवा.
मकर
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. घरी धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल. तुम्ही आपल्या बोलण्याने आणि वागण्याने लोकांचे मनं जिंकाल. तुमच्या कामात तुम्हाला मित्रांकडून आणि तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल.
कुंभ
आज तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. वेळेवर काम पूर्ण करा. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आज तुम्ही एका कार्यक्रमाला उपस्थित राहाल.
मीन
वेळेनुसार तुमच्या कामाच्या पद्धतींमध्ये बदल करा. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक व्यवहारात सावध राहा आणि विचारपूर्वक गुंतवणूक करा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics