Home गाजावाजा Pension Scheme : महिलांची पावले आता पेन्शनकडे अटल पेन्शन योजनेत महिलांचा वाढता सहभाग
गाजावाजा

Pension Scheme : महिलांची पावले आता पेन्शनकडे अटल पेन्शन योजनेत महिलांचा वाढता सहभाग

0

Pension Scheme : देशातील महिलांमध्ये आर्थिक सुरक्षिततेबाबतची जाणीव वाढताना दिसत आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana APY). या योजनेत महिलांचा सहभाग सातत्याने वाढत असून नव्याने नोंदणी करणाऱ्यांपैकी सुमारे 55 टक्के महिला आहेत, अशी माहिती अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे. यामुळे महिलांमध्ये निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळवण्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे स्पष्ट होते.

(Pension Scheme )

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना असून ती विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वयोगटातील भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतात. यामध्ये ठरावीक रक्कम नियमितपणे जमा केल्यास 60 वर्षांनंतर दरमहा 1000 ते 5000 रुपयांपर्यंत निश्चित पेन्शन मिळते. ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली असून निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा हा तिचा मुख्य उद्देश आहे.

Pension Scheme
Pension Scheme

सध्या या योजनेत देशभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले आहेत. अधिकृत माहितीनुसार अटल पेन्शन योजनेचे एकूण सदस्य 7.65 कोटींहून अधिक झाले आहेत. या योजनेत महिलांची भागीदारीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एकूण सदस्यांपैकी जवळपास 48 टक्के महिलाआहेत, तर नव्या सदस्यांमध्ये महिलांचे प्रमाण 55 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागातील स्वयं-सहायता गट, बँका आणि आर्थिक साक्षरता मोहिमा यामुळे महिलांचा सहभाग वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

======================

हे देखिल वाचा :

Old Pension Scheme लागू करणार पंजाब, जाणून घ्या योजनेबद्दल अधिक

PPF Scheme : महिन्याला फक्त ७,००० रुपयांच्या गुंतवणुकीत तयार होईल तब्बल ५७.७२ लाखांचा सुरक्षित फंड

Investment : बाळाच्या जन्मापासून सुरू करा गुंतवणूक, भविष्यात तयार होईल तब्बल 3 कोटींचा फंड!

=====================

या योजनेत गुंतवणूक करण्याची पद्धतही सोपी आहे. नागरिकांना बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यामार्फत मासिक, तिमाही किंवा सहामाही योगदान देता येते. योगदानाची रक्कम व्यक्तीच्या वयानुसार आणि निवडलेल्या पेन्शन पर्यायानुसार ठरते. किमान 20 वर्षे योगदान दिल्यानंतर 60 वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. तसेच सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला पेन्शनचा लाभ मिळू शकतो.  (Pension Scheme )

तज्ज्ञांच्या मते, महिलांनी आर्थिक नियोजनावर भर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी अटल पेन्शन योजना हा सुरक्षित पर्याय ठरू शकतो. कमी गुंतवणुकीत निश्चित पेन्शन मिळण्याची सुविधा असल्यामुळे या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी महिलांनी अशा सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा

Law Awareness : गाडीवर लाल-निळा दिवा लावण्याचा अधिकार कोणाला ?

Law Awareness : अलीकडेच मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांच्या गाडीवर लाल-निळा दिवा...

गाजावाजा

Police : ‘तडीपार’ कारवाई म्हणजे नेमकं काय ? Police कशी करते अंमलबजावणी

Police :  गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्यापैकीच एक...

गाजावाजा

परंपरा की वादग्रस्त प्रथा ? ‘या’ समाजात दुसऱ्याची पत्नी पळवून लग्न करण्याची विचित्र रीत

Bride Capture Traction : जगभरात विविध संस्कृती आणि परंपरा आढळतात. काही परंपरा...

गाजावाजा

Parkinsons : तरुणांमध्ये वाढतोय Parkinson’s Disease चा धोका!

Parkinsons : पूर्वी वृद्धापकाळाशी संबंधित मानला जाणारा पार्किन्सनचा आजार आता तरुणांमध्येही वाढताना...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!