Home लाईफ स्टाईल Gudhipadwa : गुढीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे आहे विशेष अर्थ
लाईफ स्टाईल

Gudhipadwa : गुढीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे आहे विशेष अर्थ

1

ज्या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली तो दिवस होता, चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. या दिवशी हिंदू नवीन वर्ष देखील सुरु होते. गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या साडे तीन मुहूर्तापैकी एक दिवस. गुढीपाडवा हा पूर्ण मुहूर्त मानला जातो. या दिवशी अनेक शुभ कामे केली जातात शिवाय मोठमोठ्या खरेदी देखील करतात. गुढी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरी गुढी उभारली जाते. गुढी ही विजयाचे प्रतीक मानले जाते. असे सांगितले जाते की, जेव्हा श्रीराम, लक्ष्मण आणि सीता त्यांचा १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येमध्ये परत आले तेव्हा अयोध्यावासियांनी दारासमोर गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते. (Gudhipadwa)

यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या गुढीपाडव्याला ओळखतात. गुढीपाडव्याच्या दारांसमोर गुढी उभारली जाते. गुढी उभारताना एका उंच बांबूच्या काठीवर रेश्मी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पानं, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदी अथवा पितळ्याचा गडू बसवला जातो. ही गुढी नव्या सुरुवातीबरोबरच स्नेह, विजय, आनंद आणि मांगल्याचे प्रतिक असल्याचे मानली जाते. मात्र या सर्व साहित्याचा नक्की मतितार्थ काय आहे? (Todays Marathi HEadline)

Gudhipadwa

कलश – गुढीच्या सर्वात वरील भागावर असलेला कलश हा यशाचं प्रतिक असतो.
कडुलिंब- कडुलिंबचा पाला हा आरोग्याचं प्रतिक असतो.
फुलांचा हार – फुलांचा हार मांगल्याचं प्रतिक मानला जातो.
साखर गाठी – साखरेची गाठ ही माधुर्य आणि गोडवा निर्देशित करते.
जरीची साडी – जरीची साडी हे वैभवाचं प्रतिक मानलं जातं. (Marathi News)
वेळूची काठी – ज्या काठीवर गुढी उभी केलेली असते ती वेळूची काठी सामर्थ्याचं प्रतिक असते.
श्रीफळ – गुढी उभारली जाते तिथे ठेवण्यात येणारा नारळ हा सिद्धीचं प्रतिक असतो.
हळदी – कुंकू – गुढीला वाहिलं जाणारं हळदी-कुंकू हे सौभाग्याचं प्रतिक असतं.
पाट अथवा चौरंग – गुढी ज्या पाटावर उभी केली जाते तो पाट स्थैर्याचं प्रतिक असतो.
सुपारी – सुपारी ही संकल्पाचं प्रतिक असते. (Top Stories)

========

Gudhipadwa : गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची योग्य पद्धत काय?

========

पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीची सुरुवात गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ०६:५२ वाजता होणार आहे. ही तिथी शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी पहाटे ०४:५२ वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, गुढीपाडव्याचा सण गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. याच दिवसापासून मराठी शक संवत १९४८ आणि चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होईल. (Social News)

(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!