चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जातो. मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा १९ मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी केवळ नवीन वर्षाची सुरुवातच नाही, तर मराठी शक संवत १९४८ ची देखील सुरुवात होईल. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये गुढी उभारली जाते. या गुढीची पूजा करून देवाकडे प्रार्थना केली जाते. मात्र गुढी उभारण्याची योग्य पद्धत नक्की कशी आहे जाणून घेऊया. (Marathi)
गुढी उभारण्याची योग्य पद्धत अशी आहे, गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. ही काठी धुताना तिला थोडी हळद लावून मग देखील ही काठी धुतली जाते. तिला हळद आणि कुंकू लावावे. यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस्र किंवा साडी गुंडाळली जाते. यावर मग, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधली जाते. या सर्व गोष्टी काठीला बांधून त्यांवर कलश तांब्या उपडा ठेवून तोसुद्धा घट्ट बसवावा. सजवलेल्या काठीला अष्टगंध, हळद कुंकू वाहावे. त्यानंतर गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ करुन घ्या. (Top Stories)

गुढीच्या खाली पाट ठेवा आणि त्याभोवती रांगोळी काढा. सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत पाटावर गुढी उभारा. गुढी उभारल्यानंतर अनेक ठिकाणी तिचे औक्षण केले जाते तर काही ठिकाणी ओवाळले जाते. गुढी उभारल्यानंतर – ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद। प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।। ही प्रार्थना म्हणावी. त्यानंतर पंचांगांचे पूजन करुन नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. पुढे कडुलिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुलिंबाचे पाणी घ्यावे. सूर्य मावळायला लागल्यावर त्याला नमस्कार करुन गुढी उतरवून ठेवावी. (Social News)
गुढीपाडवा आरती
गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
विश्व निर्मिती ब्रह्म करीतो, ब्रमहपुराणी असे,
अयोद्धेसी वनवासाहुनी राम पुन्हा परतसे,
गुढ्या-तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
माधव तसे मधुमास ही वेदातील ही नावे,
पंचांगाचे पूजन सर्वही करती मनोभावे,
सरस्वतीस गंध अन पाटी ही पुजिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
साखरमाळ कडुलिंबाची पाने फुलमाळा,
गडु चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू ,केशर , टिळा,
आदराने ब्रह्मध्वज या गुढीस संबोघिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
========
Gudipadwa : गुढी पाडवा १८ की १९ कोणत्या तारखेला? जाणून घ्या गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त!
========
पिशाच्च जाई दूर पळुनी कडुलिंबाचा टाळा,
कडू रसाचे सेवन करूया गूळ जिरे घाला,
गुढीपाडवा सण हा पहिला वर्षाचा करीती
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
गुढी उभारू चैत्र मासि प्रतिपदा ही तिथी
आरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णू किती
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics