हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला मोठे महत्त्व आहे. नवरात्र म्हटले की, अनेकांना अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रच आठवते. मात्र एका वर्षात चार नवरात्र असतात. शारदीय नवरात्रासोबतच चैत्र नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्र साजरे केले जातात. शारदीय नवरात्राला मोठे महत्व असले तरी चैत्र नवरात्र देखील महत्त्वाचे असते. चैत्र नवरात्र हे चैत्र महिन्यात येते. हिंदू नवीन वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी चैत्र नवरात्राची सुरुवात होते. चैत्र नवरात्र देखील आदिमायेला समर्पित असते. या नवरात्राच्या पहिल्या दिवशी देखील घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. (Chaitra Navratri)
पंचांगानुसार, यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात गुरुवार, १९ मार्चपासून होत आहे आणि याची समाप्ती २६ मार्च रोजी राम नवमीच्या दिवशी होणार आहे. चैत्र नवरात्रामध्ये देखील शारदीय नवरात्राप्रमाणे पूजा अर्चना केली जाते. या नवरात्राच्या नऊ दिवसांच्या काळात देखील कन्यापूजन केले जाते, होम केला जातो. या दोन्ही नवरात्रातील गोष्टी सारख्याच असल्याने या नवरात्रामध्ये देखील नऊ दिवस नऊ वेगवेगळे रंग फॉलो केले जातात. मग यंदाच्या चैत्र नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणते नऊ रंग पळाले जाणार ते पाहूया. (Marathi)
नवरात्रीच्या ९ दिवसांतील रंग
नवरात्रीचा पहिला दिवस
नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित असून, या दिवशी देवी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग पिवळा आहे. हा रंग ऊर्जा, आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. (Todays Marathi Headline)
नवरात्रीचा दुसरा दिवस
नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित असून, या दिवशी ब्रह्मचारिणी देवींची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग हिरवा आहे. हिरवा रंग शांती, विकास आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. (Top Marathi Stories)
नवरात्रीचा तिसरा दिवस
नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटाला समर्पित असून, या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग राखाडी असून, राखाडी रंग हा संतुलन आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. (Latest Marathi Headline)

नवरात्रीचा चौथा दिवस
नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडाला समर्पित असून, नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग नारंगी असून, हा रंग उत्साह, ऊर्जा आणि धैर्याचे प्रतीक आहे. (Top Marathi News)
नवरात्रीचा पाचवा दिवस
नवरात्रीचा पाचवा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित असून, या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग पांढरा असून पांढरा रंग पवित्रता आणि शांतीचे प्रतीक आहे. (Social Updates)
नवरात्रीचा सहावा दिवस
नवरात्रीचा सहावा दिवस देवी कात्यायनीला समर्पित असून, या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग लाल असून, लाल रंग शक्ती, धैर्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे. देवी कात्यायनीची पूजा केल्याने विवाह आणि जीवनातील अडथळे दूर होतात. (Top Marathi HEadline)
नवरात्रीचा सातवा दिवस
नवरात्रीचा सातवा दिवस देवी कालरात्रिला समर्पित असून, या दिवशी कालरात्रीच्या देवीची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग निळा आहे. निळा रंग हा आत्मविश्वासाचे प्रतीक मानला जातो. (Top Trending News)
==========
Gudipadwa : गुढीवर तांब्याचाच कलश उपडा का ठेवतात?
==========
नवरात्रीचा आठवा दिवस
नवरात्रीचा आठवा दिवस देवी महागौरीला समर्पित आहे. या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग गुलाबी असून, गुलाबी रंग प्रेम, करुणा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. (Top Stories)
नवरात्रीचा नववा दिवस
नवरात्रीचा नववा दिवस देवी सिद्धिदात्रीला समर्पित आहे. या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. सिद्धिदात्री देवीला जांभळा रंग प्रिय आहे. जांभळा रंग अध्यात्म आणि यशाचे प्रतीक मानला जातो. (Social News)
(टीप :वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Chaitra Navratri
- Chaitra Navratri 2026
- Chaitra Navratri 9 day
- Chaitra Navratri 9 day 9 colour
- Chaitra Navratri colors
- Chaitra Navratri colours
- Chaitra Navratri date
- Chaitra Navratri information
- Chaitra Navratri significance
- चैत्र नवरात्री
- चैत्र नवरात्री २०२६
- चैत्र नवरात्री कधी आहे?
- चैत्र नवरात्री माहिती
- चैत्र नवरात्री रंग
- चैत्र नवरात्रीचे महत्त्व
- देवी दुर्गा