२०२६ या वर्षाचा दुसरा महिना सुरु झाला आहे. मात्र हा फेब्रुवारी महिना सर्वात घातक असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याला कारण म्हणजे, पंधरा दिवसाच्या आत दोन मोठी ग्रहण येत आहेत. वास्तविक ग्रहण ही खगोलिय घटना आहे. हिंदू धर्मात, सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही बाबत शुभ आणि अशुभ परिणामाचे कारक असल्याचे सांगण्यात आले आहे. २०२६ मध्ये, फाल्गुन महिन्यात येणारे हे दोन्ही ग्रहण पंधरा दिवसाच्या कालावधीत येत आहेत. त्यात होळीचा सणही येत असल्यामुळे या सर्वांचे परिणाम काय होणार याची चर्चा आहे. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहण खूप महत्वाचे मानले जाते. फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान फक्त १५ दिवसांच्या अंतराने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणार असल्यामुळे या ग्रहणांमध्ये काय करायचे, कशी काळजी घ्यायची याची चर्चा सुरु झाली आहे. शास्त्रांनुसार, कमी कालावधीत येणारी दोन ग्रहणे अशुभ मानली जातात. ( Two Eclipses Within 15 Days )

यातील पहिले ग्रहण हे १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आहे. फाल्गुन अमावस्येला येणारे हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. धार्मिक श्रद्धेनुसार, भारतात न दिसणाऱ्या ग्रहणासाठी सुतक काळ वैध नसतो. म्हणून, या दिवशी ग्रहण संबंधी कुठल्याही उपवासना करु नयेत, असे जाणकारांनी सांगितले आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिकामध्ये दिसेल. ते दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या काही भागात, नामिबिया, बोत्सवाना, येथे देखील अंशतः दिसणार आहे. झिम्बाब्वे, टांझानिया, मादागास्कर, मॉरिशस, लेसोथो, स्वाझीलँड येथूनही हे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५:२६ वाजता या सूर्यग्रहणाची सुरुवात होईल. यातील मुख्य कालावधी हा संध्याकाळी ७:१२ वाजता असेल. तर ग्रहणाची समाप्ती संध्याकाळी ७:५७ वाजता होईल.
हे एक ‘कंकणाकृती’ ग्रहण असेल, यात चंद्र सूर्याचा सुमारे ९२% भाग व्यापेल, या खगोळीय घटनेमुळे सूर्याभोवती ‘अग्नीचे वलय’ तयार होणार आहे. या सूर्यग्रहणानंतर बरोबर १५ दिवसांनी चंद्रग्रहण आहे. ३ मार्च २०२६ रोजी चंद्रग्रहण आणि होलिका दहनही असल्यामुळे भारतात याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. हे चंद्रग्रह भारतातून पूर्णपणे दिसणार आहे. चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याने, त्याचा सुतक काळ लागू होणार आहे. चंद्रग्रहणासाठी सुतक काळ हा ग्रहण सुरू होण्याच्या ९ तास आधी सुरू होतो. चंद्रग्रहण होलिका दहनाच्या दिवशाच असल्यानं अनेक मंदिर प्रांगणात होणा-या होलिका दहनाचा मुहूर्तही लांबण्याची शक्यता आहे. ग्रहण काळात बहुतांशी सर्वच मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येतात. ( Two Eclipses Within 15 Days )
मात्र ग्रहण काळ हा आध्यात्मिक साधना करण्याचा काळ मानला जातो. या काळात देवाच्या मूर्ती आणि चित्रांना स्पर्श करण्यास मनाई आहे. लोक श्रद्धेनुसार, सुतक काळात जपलेले मंत्र लवकर प्रभावी असतात. अलिकडच्या काळात ग्रहण काळात अनेक खगोलप्रेमी ग्रहण बघण्यासाठी मोकळ्या जागेवर जातात. दुर्बिणीच्या माध्यमातून ग्रहण बघितले जाते. यात सूर्य किंवा चंद्राकडे थेट पाहणे टाळा, असे आवाहन खगोलशास्त्रज्ञांतर्फे करण्यात आले आहे, असे केल्यास डोळ्यांना हानी पोहचण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. ३ मार्च रोजीचे चंद्रग्रहण पॅसिफिक महासागर आणि पश्चिम उत्तर अमेरिकेत दिसणार आहे. उर्वरित उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत ग्रहणाचा काही भाग दिसेल, परंतु चंद्र ग्रहण संपण्यापूर्वी मावळेल.
=======
हे देखील वाचा : Lord Shiv : महाशिवरात्री विशेष: महादेवांच्या डोक्यावर चंद्र का आहे?
=======
संपूर्ण ग्रहण जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक भागातून दिसेल. पूर्व युरोप, आफ्रिका किंवा पश्चिम आशियामध्ये ग्रहण दिसणार नाही. पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान, चंद्र गडद लाल दिसू शकतो आणि त्यालाच रक्त चंद्र म्हणजेच रेड मून म्हणून संबोधले जाते. पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान, चंद्र, गडद लाल किंवा नारिंगी दिसतो. कारण पृथ्वी सूर्याचा बहुतेक प्रकाश चंद्रावर पोहोचण्यापासून रोखते आणि चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा प्रकाश पृथ्वीच्या दाट वातावरणातून फिल्टर केला जातो. त्यामुळे चंद्र लाल रंगाचा दिसतो. ही केवळ खगोलीय घटना असून त्याकडे अभ्यासू नजरेनं पहा, असे आवाहन खगोलशास्त्रज्ञांनी केले आहे. ( Two Eclipses Within 15 Days )
सई बने
- 15 days gap
- annular solar eclipse
- Antarctica eclipse path
- astronomy enthusiasts
- atmospheric filtering.
- avoid direct viewing
- binoculars/telescope safety
- blood moon
- Earth’s shadow
- eclipse visibility regions
- geomagnetic myths vs science
- Hindu astrology
- Holika Dahan timing
- lunar eclipse March 3
- mantra chanting
- partial eclipse Africa
- Phalguna month
- red moon phenomenon
- safe viewing warning
- solar eclipse Feb 17
- South America visibility
- spiritual practices
- sutak not valid in India
- sutak period
- temple closures
- Two eclipses 2026