Home आंतरराष्ट्रीय Gates & Epstein Friendship : गेट्स पती पत्नींमधील तो तिसरा….
आंतरराष्ट्रीय

Gates & Epstein Friendship : गेट्स पती पत्नींमधील तो तिसरा….

0

सॉफ्टवेअर उद्योगात क्रांती घडवून आणणारे उद्योजक बिल गेट्स हे सध्या सर्वाधिक अडचणीतून जात आहेत. आत्तापर्यंत ज्या बिल गेटसं यांच्याकडे मानानं बघण्यात येत होते, त्याच ७० वर्षीय बिल गेट्स यांच्या चारित्र्याचा पडदा जेफ्री एपस्टाईन फाईलमधून फाडण्यात आला आहे. बिल गेट्स हे जगातील सर्वात मोठ्या वैयक्तिक संगणक सॉफ्टवेअर कंपनीचे सह-संस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि अनेक दशकांपासून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अग्रणी आहेत. त्यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे आरोग्य आणि शिक्षण यासारख्या विविध धर्मादाय कारणांसाठी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग दान केला आहे. मात्र आता सर्वांपेक्षा बिल गेट्स यांनी जेफ्री एपस्टाईन सारख्या विकृत व्यक्तीबरोबर केलेली मैत्री आणि त्यातून केलेले लहान मुलींचे लैंगिक शोषण, याचीच चर्चा सुरु आहे. ( Gates & Epstein Friendship )

या सर्वात बिल गेट्स यांचा घटस्फोट का झाला, याचेही कारण उघड झाले आहे. बिल गेट्सची माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी या घटस्फोटाचे कारण उघड करतांना जेफ्री एपस्टाईनचे नाव घेतले आहे. जेफ्री सोबत बिल गेट्सची झालेली जवळीक ही मेलिंडा यांना पसंत नव्हती. तीन मुलांची आई असलेल्या मेलिंडा यांनी बिल यांना अडवण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र ते जेफ्रीच्या मायाजालातून बाहेर पडू शकले नाहीत. शेवटी मेलिंडानं यांनी २७ वर्षांनंतर बिल गेट्स यांच्यापासून घटस्फोट घेतला. मे २०२१ रोजी बिल गेट्स आणि मेलिंडा हे वेगळे झाले, तेव्हा त्यांच्या घटस्फोटाबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र या जोडीमध्ये आलेला तिसरा व्यक्ती कोण हे आता उघड झाले आहे. जेफ्री एपस्टाईन याच्यामुळेच बिल आणि मेलिंडा वेगळे झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सॉफ्टवेअर क्षेत्राचे जनक म्हणून बिल गेट्स यांच्याकडे पाहिले जाते. मात्र जेफ्री एपस्टाईनची फाईल ओपन झाल्यापासून याच बिल गेट्स यांच्यावर सोशल मिडियावर तुफान विनोद चालू झाले आहेत. बिल यांना रशियन तरुणींपासून गुप्तरोग झाल्याची बातमी आल्यावर तर या विनोदात अधिक भर पडली आहे. यातच मेलिंडा गेट्स या त्यांच्या माजी पत्नीची एक जुनी पोस्ट पुन्हा व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी आपल्या २७ वर्षाच्या संसाराला तुटण्यासाठी जेफ्री एपस्टाईन यांना जबाबधार धरले आहे. पाच वर्षापूर्वी ही पोष्ट आली होती, तेव्हा एपस्टाईन याच्या नावाबाबत फारशी माहिती नव्हती. मात्र आता हे नाव सर्वमुखी झाल्यावर मेलिंडा यांचे दुःख पुन्हा समोर आले आहे. मेलिंडा यांनी नुकतीच एका पॉकडास्टसाठी मुलाखत दिली असून त्यात एपस्टाईनशी बिलची जवळीक वाढल्यानं आपण त्याच्यापासून दूर गेल्याचे सांगितले आहे. मेलिंडा यांची ही मुलाखत लवकरच दाखवली जाणार आहे. ( Gates & Epstein Friendship )

यात मेलिंडा यांनी बिल गेट्स यांच्यासोबतच वैवाहिक आयुष्यातील चांगल्या-वाईट गोष्टींची माहिती जगजाहीर केली आहे. सोबत त्यांचे आणि जेफ्री एपस्टाईनचे संबंध कसे वाढत गेले, हेही सांगितले आहे. पॉडकास्टमधील या मुलाखतीमुळे बिल गेट्स हे अधिक अडचणीत येणार आहेत. या मुलाखतीमध्ये मेलिंडा यांनी एपस्टाईन फाइल्समध्ये केलेल्या दाव्यावरही भाष्य केले आहे. बिल गेट्सना रशियन महिलांशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर लैंगिक संक्रमित आजार झाल्याची कबुली त्यांनी यात दिली आहे. त्यानंतर बिल यांनी मेलिंडा यांनाही नकळत अँटीबायोटिक्स देण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचा मेलिंडा यांच्या मनावर मोठा आघात झाला. त्यांनी या मुलाखतीमध्ये हे दुःख सांगून, मला माझे लग्न मोडावे लागले आणि शेवटी फाउंडेशनही सोडावे लागले, याचे सर्वाधिक वाईट वाटत असल्याचे सांगितले.

=======

हे देखील वाचा : Kiswah Epstein Scandal : काबाचा ‘किस्वा’ आणि एपस्टाईन

=======

आपल्या तीन मुलांवर याचा काय परिणाम होईल, याचीही त्यांना काळजी वाटत होती. या घटस्फोटानंतर काही काळ त्यांनी मानसिक तणावाखाली घालवल्याचेही सांगितले. मात्र आता एफ्री एपस्टाईन फाईल खुली झाल्यावर बिल गेट्स सोबतच या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाने यातील आरोपांचे उत्तर दिले पाहिजे, अशी अपेक्षा मेलिंडा यांनी या मुलाखतीमधून व्यक्त केली आहे. बिल गेट्स यांनी १ जानेवारी १९९४ रोजी हवाईमधील लानाई बेटावर मेलिंडा फ्रेंचशी लग्न केले. त्यांची भेट १९८७ मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये झाली. त्यावेळी मेलिंडा या मायक्रोसॉफ्टमध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या. बिल आणि मेलिंडा यांना आदर्श जोडपे म्हणून पाहिले जात होते. त्यांना जेनिफर, रोरी आणि फोबी अशी तीन मुले आहेत. मेलिंडा यांनी पाच वर्षापूर्वी जे दुःख पचवले होते, ते त्यांनी आता एका पॉडकास्टच्या माध्यमातून जगासमोर व्यक्त केले आहे. आता हा पॉडकास्ट रिलिज झाल्यावर बिल गेट्स आणि जेफ्री एपस्टाईन यांच्याबाबत काय नवीन खुलासा होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. ( Gates & Epstein Friendship )

सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!