Home आरोग्य Bones Care : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजामागे ‘हे’ गंभीर कारण असू शकते
आरोग्य

Bones Care : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजामागे ‘हे’ गंभीर कारण असू शकते

1
BBC
BBC

आपल्या निरोगी आरोग्याचे रहस्य म्हणजे सकस, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम. या दोन गोष्टींच्या जोरावर आपण आपले उत्तम आरोग्य टिकाऊ शकतो. मात्र यातली एक गोष्ट जरी नीट झाली नाही, किंवा आपण केली नाही तर त्याचा नक्कीच दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळेच वेळेवर सकस जेवण आणि व्यायाम प्रत्येक व्यक्तीने केलाच पाहिजे. आपण जे खातो त्यापासून आपल्या शरीराला अनेक आवश्यक गोष्टी प्राप्त होत असतात. त्यामुळेच आपण शरीराला गरजेच्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. मात्र आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. ज्यामुळे बरेच आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Bones Care)

अनेकदा आपल्याला काही छोटे त्रास लक्षात येतात पण आपण त्याकडे सहज कानाडोळा करतो. पण हेच छोटे त्रास पुढे जाऊन मोठे स्वरूप घेतात आणि आधी लहान वाटणारा त्रास नंतर सहन करण्याच्या पलीकडे जातो. असाच एक दुर्लक्षित होणार त्रास म्हणजे हाडांमधून अनेकदा येणार कटकट आवाज. अनेक लोकांच्या हाडांमधून बसतांना, उठतांना, वाकताना आदी विशिष्ट क्रिया करताना कटकट असा आवाज येतो. मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, असा आवाज का येतो आणि त्यामुळे नक्की कोणता त्रास उदभवण्याची शक्यता असते? (Marathi)

आपल्या सांध्यांमधून कट -कट आवाज येत आहे. जर का होय, तर ह्याला अजिबात दुर्लक्षित करू नका. हे हाडांच्या गंभीर समस्येचे लक्षणे असू शकतात. लोक अनेकदा याला संधिवाताचा त्रास समजतात आणि घरगुती उपायांनी त्यावर उपचार करण्यास सुरुवात करतात. हाडांमधून येणारा असा आवाज आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. पूर्वी वृद्धांमध्येच ही समस्या दिसायची परंतु आता तरूण लोकांनाही याचा त्रास होत आहे. हा आवाज हाडे आणि सांधे कमकुवत होण्याचे लक्षण असते. त्याचबरोबर अनेक आजारांचे कारणही असू शकतो. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (Latest Marathi News)

वय जसजसे वाढत जाईल तसतसे सांध्यांमध्ये अशा प्रकारचा आवाज वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण वाढत्या वयाबरोबर सांध्यांचे काही कूर्चा म्हणजेच कार्टिलेज खराब होतात. बऱ्याचदा हे आवाज वेदना किंवा सुजेमुळे किंवा दुखापतीनंतर येतात. सांध्याच्या भोवती असलेल्या मऊ ऊतींमध्ये हवा शिरल्यास, सांधा वाकवताना हवेचे फुगे फुटतात आणि आवाज येतो. स्नायू ताणल्याने हाडांमध्ये आवाज येऊ शकतो, खासकरून जर जास्त वेळ बसून किंवा एकाच स्थितीत उभे राहिल्यास. शिवाय संधिवात किंवा इतर काही आजारांमुळे हाडांमधून आवाज येऊ शकतो. शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास, हाडांमध्ये आवाज येण्याची शक्यता वाढते. वयोमानानुसार सांध्यांमध्ये बदल आणि घर्षणातून आवाज येण्याची शक्यता वाढू शकते. मात्र यावर मग नक्की उपाय कोणते जाणून घेऊया. (Todays Marathi HEadline)

Bones Care

नियमित व्यायाम
ही समस्या दूर ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दररोज व्यायाम करणे. तंदुरुस्त राहण्यासाठी आठवड्यातून १५० मिनिटं व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. तुमचे वय आणि जीवनशैलीला अनुरूप असे व्यायामप्रकार निवडा. घरकाम, बागकाम करणं किंवा जवळपास चालायला जाणं असे हलकेफुलके व्यायाम करू शकता. (Healthy Bones)

शारीरिक हालचाली
आजकाल अनेक जण बैठं काम करतात. दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम केलं जातं. त्यामुळे शरीर आखडल्यासारखं होतं. त्यामुळेही सांध्यांतून असा आवाज येऊ शकतो. त्यामुळे सतत शारीरिक हालचाली करणं आवश्यक आहे. तुम्ही दिवसभर एका ठिकाणी बसून काम करत असाल, तर किमान दर अर्ध्या तासाने जागेवरून उठण्याची सवय लावा. (Health Care)

स्ट्रेचिंग
नियमित स्ट्रेचिंगमुळे सांधे लवचिक राहतात आणि आवाज येण्याची शक्यता कमी होते. रोज काही वेळ स्ट्रेचिंग व्यायाम केल्याने सांधे लवचिक राहतात आणि आवाज येण्याची शक्यता कमी होते. (Marathi)

सांध्यांना पोषण
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या पौष्टिक घटकांचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन के हे हाडांच्या मजबुतीसाठी महत्त्वाचे आहे. पालेभाजी, टोमॅटो आणि काही फळांमध्ये हे व्हिटॅमिन असते. व्हिटॅमिन सी हे कोलेजनच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे, जे सांध्यांना लवचिक ठेवते. संत्री, लिंबू, पालेभाजी आणि काही फळांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. आपल्या आहारात कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांचा समावेश करा, जेणेकरून हाडं मजबूत राहतील. (Top Marathi News)

वजन नियंत्रण
अतिरिक्त वजनामुळे सांध्यांवर दाब वाढतो, ज्यामुळे आवाज येण्याची शक्यता वाढू शकते. जास्त वजनामुळे सांध्यांवर अधिक ताण येतो, ज्यामुळे आवाज येऊ शकतो. निरोगी वजन राखल्यास सांध्यांवरील ताण कमी होतो आणि आवाज येण्याची शक्यता कमी होते. योग्य आहार आणि नियमित व्यायामाने वजन कमी करता येते, ज्यामुळे सांध्यांवरील ताण कमी होऊन आवाज कमी होऊ शकतो. (Latest Marathi Headline)

मेथी दाण्यांचे सेवन
मेथी दाण्याचे सेवन केल्याने हाडांना अनेक लाभ होतात. या साठी रात्री अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून द्यावे, सकाळी मेथी दाणे चावून-चावून खावं आणि या पाण्याला प्यावं. असे नियमित केल्याने हाडांमधून आवाज येणं थांबण्यात मदत होईल. (Social Updates)

दूध पिणे
हाडांमधून कट कट आवाज येण्याचे अर्थ आहे की त्यामधील लुब्रिकेंट कमतरता होणं. सरत्या वयात हा त्रास वाढू लागतो. म्हणून शरीरास पुरेश्या प्रमाणात कॅल्शियम देणं गरजेचे असते. कॅल्शियमचे इतर पर्याय घेण्याव्यतिरिक्त भरपूर दूध प्या. (Top Marathi Stories)

गूळ आणि हरभऱ्याचे सेवन
भाजके हरभऱ्यासह गुळाचं सेवन करणं फायदेशीर मानले जाते. भाजक्या हरभऱ्यांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिनं, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळतं. दिवसातून एकदा तरी गूळ आणि भाजके हरभरे खावे. या मुळे हाडांची कमतरता दूर होईल आणि हाडांमधून कट-कट आवाज येणं देखील थांबेल. (Top Trending HEadline)

========

Mental Health Tips : तुम्हाला प्रत्येक वेळी एखाद्या गोष्टीची भीती वाटते? या टिप्स फॉलो करून सुधारा मानसिक आरोग्य

Bad Cholesterol Control : शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल असे करा कंट्रोल, आहारात खा हे पदार्थ

========

स्ट्रेसपासून दूर राहा
काही लोक तणावामुळे सतत सांधे मोडत असतात किंवा शरीरातील हाडे मोडण्याचा प्रयत्न करत असतात. तणावाचा सामना करण्यासाठी आपण त्याऐवजी दीर्घ श्वास घेण्याचा, ध्यानधारणा करण्याचा किंवा स्ट्रेस बॉलचा आधार घेणे यासारखे प्रभावी व साधेसोपे उपाय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (Top Stories)

योग्य आहार
आपल्या आहारात काही बदल करा. आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचा समावेश करा. संत्री हे फळ व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत आहे. संत्रीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देखील असते. यामुळे आरोग्य सुधारते. शिवाय नाचणीमध्ये देखील कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. रागीच्या पीठाची भाकरी खायला सुरूवात करा. तीळ हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे. सर्व वयोगटातील लोकांनी तीळ खावे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. आहारात पालक अन् ब्रोकोलीचा समावेश करा. (Social News)

(टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!