Home गाजावाजा स्पेशल Gudhipadwa : गुढीपाडवा का साजरा केला जातो?
गाजावाजा स्पेशल

Gudhipadwa : गुढीपाडवा का साजरा केला जातो?

72
Gold

महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे, गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. गुढीपाडवा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण उत्सव आहे. या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारुन तिची पूजा करुन तिला गोडधोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो. याच दिवसापासून वसंत ऋतूचीही सुरुवात होते. मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. यंदा १९ मार्च रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. ‘गुढी’ म्हणजे ‘विजय ध्वज’ आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते. (Gudhipadwa)

गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली. या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचेही मानले जाते. तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास करुन माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणूनचा या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. या दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते, प्रत्येक घरात माँ दुर्गा वास करते देवीची पुजा केली जाते. तिसरे कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या घरात या दिवशी नवीन पीक येते. धन धान्यांनी शेतकऱ्याची घर भरते. (Marathi)

Gudhipadwa

पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री रामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले. यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला. ज्याला गुढी म्हणतात. चैत्र प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढत जातो. त्यामुळे या दिवसाला पाडवा म्हणतात. ‘पडव’, ‘पाडवो’ या शब्दापासून नंतर पाडवा हा शब्द तयार झाला असावा, असे म्हटले जाते. चैत्र महिन्यानंतर शेतकरी पेरणीसाठी शेत तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी निसर्गाचे आभार मानले जातात आणि गुढी उभारली जाते. (Latest Marathi Headline)

गुढीपाडव्याच्या दिवशी बहुतेक मराठी घरांमध्ये गुढी दारात उभारलेली दिसते. खरे तर यामागे एक प्रमुख कारण आहे. त्यानुसार, प्राचीन काळी, जेव्हा योद्धे युद्ध जिंकल्यानंतर येतात तेव्हा ते आपल्या घराच्या आणि राजवाड्याच्या गेटवर विजय ध्वज म्हणून राजवाड्यांबाहेर ध्वज फडकावत असत. तेव्हापासून, चैत्र प्रतिपदेच्या दिवसापासून, हिंदू नववर्ष आणि विजय उत्सवाचा भाग म्हणून गुढीची पूजा केली जाते आणि घराच्या दारात किंवा गच्चीवर उभारली जाते. (Top Trending News)

=======

Gudhipadwa : गुढीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे आहे विशेष अर्थ

=======

असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव जगात प्रथमच अवतरले होते. दुसरीकडे, पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात, भगवान श्रीरामांनी या दिवशी बळीचा वध केला आणि लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले होते. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतात. म्हणून या आनंदाच्या प्रसंगी घराबाहेर रांगोळी काढली जाते आणि गुढी उभारून विजय साजरा केला जातो.चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो. जुनी वाळलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, तर आंब्याला मोहोर येतो. या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो. (Social News)

(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!