Home आंतरराष्ट्रीय Golestan Palace Attack : येथेच होते भारताकडून लुटलेले मयूर सिंहासन
आंतरराष्ट्रीय

Golestan Palace Attack : येथेच होते भारताकडून लुटलेले मयूर सिंहासन

0
Kargil Din | Kfacts

Iran-America युद्धाची धग आता वाढली आहे. अमेरिका आणि इस्रायलमधून इराणवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यात तेहरानमधील युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असलेल्या गोलेस्टन राजवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. हा राजवाडा इराणमधील अनेक सुंदर ऐतिहासिक इमारतींपैकी एक मानला जातो. त्याला स्थानिक ‘गुलाबांचा राजवाडा’ असेही म्हणतात, एवढी ही वास्तू देखणी आहे. रझा पहलवी यांच्या वडिलांनीही याच राजवाड्यात आपला राज्याभिषेक सोहळा केला होता. ५०० वर्षे जुन्या या राजवाड्याच्या प्राचीन खिडक्या, दरवाजे आणि आरशांचे क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या इतिहासात गोलेस्टन राजवाड्याचे महत्त्वाचे स्थान आहे. याच राजवाड्यात भारताचा एक वारसाही ठेवण्यात आला होता. मुघल बादशहा शाहजहानने मयूर सिंहासन बनवले होते, त्यावर अनेक अमूल्य हिरे-माणिक जडवण्यात आले होते. मुघल सम्राट मुहम्मद शाह असताना त्याचा पराभव करून इराणच्या नादिर शाहने हे मयूर सिंहासन लुटून इराणला नेले. हे मयूर सिंहासन याच गोलेस्टन राजवाड्यात ठेवण्यात आले होते. १७४७ मध्ये नादिर शाहची हत्या झाली. त्यानंतर हे मयूर सिंहासन तोडण्यात आले, त्यावर लावलेले अमूल्य हिरे-माणिक काढून सिंहासनासाठी लागलेले सोनेही वितळवण्यात आले. याच सोन्याचा आणि हिऱ्यांचा वापर नंतर इराणच्या राजांनी दागिने करण्यासाठी केल्याचा उल्लेख आहे. ( Golestan Palace Attack )

Israel, America आणि Iran यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये मोठी मनुष्यहानी होत आहे. यासोबतच या युद्धामध्ये अनेक मालमत्ताही धुळीस मिळत आहेत. त्यात काही ऐतिहासिक स्थळांचेही जबर नुकसान झाल्याची माहिती आहे. युनेस्कोने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. इराणची राजधानी तेहरानमधील जागतिक वारसा स्थळ असलेल्या गोलेस्टन राजवाड्याचे क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हा हल्ला या राजवाड्याभोवती असलेल्या एका ठिकाणी झाला. मात्र त्यातून एवढा मोठा स्फोट झाला आणि वाळूचे लोट उठले की त्याचा परिणाम राजवाड्याच्या भिंतींवर आणि त्यातील अमूल्य वस्तूंवरही झाला.

Golestan Palace हा इराणच्या ऐतिहासिक वारशामधील सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अत्यंत सुंदर आणि इराणी वास्तुकलेचा जिवंत नमुना म्हणून या राजवाड्याकडे पाहिले जाते. त्याच्या गुलाबी रंगामुळे आणि सुंदरतेमुळे त्याला ‘गुलाबांचा राजवाडा’ असेही म्हणतात. हा राजवाडा १९५४ च्या हेग कन्व्हेन्शन अंतर्गत संरक्षित सांस्कृतिक मालमत्ता म्हणून जाहीर करण्यात आला आहे. आता अमेरिका-इराण युद्धात या राजवाड्याची मोठी हानी झाली आहे. गोलेस्टन पॅलेस हा काजार कला आणि कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. पारंपरिक पर्शियन कला आणि हस्तकलेचा अद्वितीय नमुना म्हणून या राजवाड्याकडे पाहिले जाते. तेहरानच्या सर्वात जुन्या राजवाड्यांपैकी एक असलेल्या या राजवाड्यात एकूण आठ रचना आहेत. १८ व्या शतकात झंद राजवंशाचा शासक करीम खान यांनी या राजवाड्याचे नूतनीकरण केले. ( Golestan Palace Attack )

१७९४ ते १९२५ या काळात काजार शासकांनी तेहरानला आपली राजधानी बनवले आणि याच गोलेस्टन राजवाड्यात शहा आपल्या कुटुंबासह राहत होते. १९२५ ते १९७९ या पहलवी राजवटीत गोलेस्टन पॅलेस हे राज्य आणि औपचारिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र होते. येथेच १९२६ साली रझा शाह आणि १९६७ साली मोहम्मद रझा शाह व शाहबानू फराह यांचा शानदार राज्याभिषेक सोहळा झाला. पहलवी काळात गोलेस्टन राजवाडा औपचारिक स्वागतासाठी वापरला जात असे. मात्र पहलवींनीच या राजवाड्याचे पुरातन स्वरूप बदलल्याचा आरोपही आहे. १९२५ ते १९४५ दरम्यान रझा शाह यांच्या आदेशाने राजवाड्याच्या संकुलातील इमारतींचा मोठा भाग पाडून आधुनिक शैलीतील व्यावसायिक इमारती उभारण्यात आल्या.

=======

हे देखील वाचा : US Iran Conflict : कच्चे तेल $120 च्या उंबरठ्यावर! अमेरिका-इराण संघर्षाचा भारतावर मोठा परिणाम

=======

या राजवाड्यातील संग्रहालय हे ऐतिहासिक कागदपत्रांचा मोठा खजिना होते. हस्तलिखिते, छायाचित्रे आणि संग्रहांनी समृद्ध असे ग्रंथालय येथे होते. याच राजवाड्यात भारताचे मयूर सिंहासनही ठेवण्यात आले होते. मुघल सम्राट शाहजहानने तयार केलेले हे भव्य सिंहासन दिल्लीच्या लाल किल्ल्यात स्थापित केले होते. १७३९ मध्ये इराणी शासक नादिर शाहने दिल्लीवर आक्रमण करून मुघल सम्राट मुहम्मद शाहचा पराभव केला आणि मयूर सिंहासन इराणला नेले. १७४७ मध्ये नादिर शाहच्या हत्येनंतर मौल्यवान रत्नांसाठी मयूर सिंहासन तोडण्यात आले आणि त्याचे सोने वितळवण्यात आले. गोलेस्टन राजवाड्यात भारतातून लुटून नेलेल्या अशा अनेक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. आता याच राजवाड्याची अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये मोठी हानी झाली आहे. ( Golestan Palace Attack )

सई बने…

 

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!