Home आंतरराष्ट्रीय Golden Coffin for El Mencho: ड्रग माफियासाठी चक्क सोन्याची शवपेटी
आंतरराष्ट्रीय

Golden Coffin for El Mencho: ड्रग माफियासाठी चक्क सोन्याची शवपेटी

0

Mexico चा कुख्यात ड्रग माफिया एल मेंचो मारला गेला. एल मेंचोला मारण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं मेक्सिकोच्या सैन्याला मोठी मदत केली. देशाच्या सैन्य दलानं आपले सर्व बळ एका ड्रग माफियाला मारण्यासाठी वापरले, यावरून एल मेंचोची ताकद किती होती याची जाणीव होते. जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा नेता नेमेसियो ओसेगुएरा रुबेन सर्व्हेंटेस, म्हणजेच एल मेंचो, हा मेक्सिकोसह अमेरिकेचीही मोठी डोकेदुखी ठरला होता. अमेरिकेत बेकायदेशीर मार्गानं पाठवण्यात येत असलेल्या फेंटानिल या ड्रगमागे एल मेंचोची स्वतंत्र यंत्रणा काम करत होती. ही यंत्रणा तोडण्यासाठी अमेरिकेनं अनेक प्रयत्न केले, पण त्यांना त्यात अपयश आले. त्यातूनच एल मेंचोला संपवण्याची योजना आखण्यात आली. एल मेंचोच्या डोक्यावर १५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले होते. यावरून त्याचे मेक्सिकोच्या ड्रग विश्वातील स्थान किती भक्कम होते याचीही माहिती मिळते. यामुळेच अशा ड्रग माफियाचा मृत्यू झाल्यावर मेक्सिकोमध्ये मोठी संतापाची लाट उसळली. एल मेंचोच्या कार्टेलमध्ये मेक्सिकोचे हजारो तरुण काम करतात. आपल्या बॉसला मारण्यात आल्यावर ही सर्व मंडळी रस्त्यावर उतरली आणि जे दिसेल त्याला जाळत सुटली. मात्र या सर्वांवर तेथील सैन्यानं नियंत्रण मिळवले आहे. त्यानंतर शांत झालेल्या एल मेंचोच्या साथीदारांनी आपल्या नेत्याचे त्याच्या अनोख्या थाटात अंत्यसंस्कार केले. त्यांनी चक्क एल मेंचोसाठी सोन्याची शवपेटी तयार केली आणि फुलांनी भरलेले अनेक ट्रक आपल्या कार्टेलच्या बॉसच्या अंत्ययात्रेसाठी उभे केले होते. त्यामुळे एल मेंचोची चर्चा त्याच्या मृत्यूनंतरही सुरू झाली आहे. ( Golden Coffin for El Mencho )

मेक्सिकोमधील सर्व ड्रग कार्टेलचा माफिया बॉस असलेला एल मेंचो याचे संपूर्ण जीवनच चर्चेचा विषय ठरले आहे. सामान्य घरात जन्मलेल्या या मुलानं सुरुवातीला वडिलांच्या अफूच्या शेताची रखवाली केली. त्यानंतर अमेरिकेत गेल्यावर तिथे ड्रगचा काळा व्यापार सुरू केला. तिथून त्याला अटक करण्यात आली आणि मेक्सिकोमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर एल मेंचोनं स्वतःचे कार्टेल उभे केले आणि माफियांच्या जगतात सर्वोच्च स्थानापर्यंत मजल मारली. अत्यंत क्रूर माफिया म्हणून एल मेंचोचा उल्लेख करण्यात येतो. या एल मेंचोनं हजारो तरुणांच्या आयुष्याची होळी केली आहे. फेंटानिलसारख्या घातक ड्रगच्या व्यापारातून हजारो तरुणांचे जीवन उद्ध्वस्त झाले, कित्येकांनी आत्महत्या केल्या तर अनेक जण कायमचे आजारी पडून अंथरुणाला खिळून बसले. मात्र या सर्वांमध्ये एल मेंचोच्या साम्राज्याला काहीही झाले नाही; उलट त्याचे साम्राज्य वाढतच गेले. आता एल मेंचोचा मृत्यू झाला आहे, मात्र त्याचे साम्राज्य किती मोठे होते हे त्याच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थानं समजत आहे. कारण एल मेंचोची अंत्ययात्रा निघाली तेव्हा अवघे शहर स्तब्ध झाले. ( Golden Coffin for El Mencho )

मेक्सिकोच्या ग्वाडालजारा शहरामध्ये एल मेंचोचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्याची शवपेटी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कारण एल मेंचोसाठी लाकडाची नव्हे तर चक्क सोन्याची शवपेटी त्याच्या कार्टेलमधील हस्तकांनी तयार केली होती. एखाद्या सम्राटासारखा एल मेंचोला अंतिम निरोप देण्यात आला. मध्ये त्याचे शव असलेली सोन्याची पेटी आणि आजूबाजूला फुलांनी सजवलेले मोठे ट्रक अशा थाटात एल मेंचोची अंत्ययात्रा झाली. इतकेच नव्हे तर या अंत्ययात्रेमध्ये एल मेंचो किती क्रूर होता, त्यानं कशा पद्धतीने ड्रगचे साम्राज्य उभे केले अशा कथा सांगणारेही फिरत होते. शिवाय एल मेंचोच्या आवडीची गाणी एका बँडद्वारे वाजवण्यात येत होती. यातून एल मेंचो जरी गेला तरी त्याच्याच शिकवणीनुसार त्याचा कार्टेल चालणार, असा संदेश दिला जात होता. या सर्वांमध्ये एल मेंचोची सोनेरी शवपेटी अधिक चर्चेत राहिली. त्यामागे त्याच्या हस्तकांनी सांगितले की एल मेंचो हा सोन्याचा दिवाना होता. त्यामुळे त्याच्यासाठी सोन्याची शवपेटी तयार करण्यात आली.

=======

हे देखील वाचा : El Mencho: ड्रग्ज माफियाला प्रेयसीनं दिला दगा

=======

अर्थात एल मेंचोच्या या अंत्ययात्रेसाठीही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. जलिस्को राज्यातील ग्वाडालजारा जवळ त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. हा भाग एल मेंचोच्या टोळीचा गड मानला जातो. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी फुलांचे मोठे हार लावण्यात आले होते. शिवाय फुलांचे मोठे कोंबडे तयार करण्यात आले होते. एल मेंचोला कोंबड्यांची झुंज पाहायला फार आवडत असे, हे यातून दाखवण्यात आले. या अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांनी चेहऱ्यावर पूर्ण मास्क घातले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटवता आलेली नाही. ( Golden Coffin for El Mencho )

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!