Home आंतरराष्ट्रीय Tariq Rahman : बांगलादेशाच्या राजकारणातला नवा मोहरा
आंतरराष्ट्रीय

Tariq Rahman : बांगलादेशाच्या राजकारणातला नवा मोहरा

0

बांगलादेशच्या राजकारणात नवीन अध्याय सुरु झाला आहे. कायम अस्थिर राजकीय परिस्थितीमधील बांगलादेशाच्या राजकारणात आता तारिक रहमान नावाचा नवा मोहरा आला आहे. तब्बल १७ वर्षापूर्वी आपल्याच देशातून भ्रष्ट्राचाराचे आरोप असेलेले तारिक रहमान हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे चिरंजीव आहे. हिंसक आंदोलनामध्ये पोळून निघालेल्या बांगलादेशचे भावी पंतप्रधान म्हणून तारिक रहमान यांच्याकडे बघितले जात आहे. त्याच थाटात त्यांचे बांगलादेशमध्ये स्वागतही झाले. मात्र सुरुवातीला वाटतो तेवढा हा खेळ सोप्पा नाही. कारण या देशाच्या राजकारणाची सूत्रे अमेरिकेच्या गुप्तहेर संघटना, पाकिस्तान आणि आयएसआय अशा दहशतवादी संघटनांच्या हातात आहेत. या सर्वांना मिळून जर तारिक रहमान राजी करु शकले, तरच ते बांगलादेशच्या पंतप्रधान पदावर विराजमान होऊ शकणार आहेत. आजारी माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्यासोबत रहाण्याचे निमित्त साधून ६० वर्षीय तारिक रहमान हे बांगलादेशमध्ये आले असले तरी ते आईपेक्षा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात अधिक व्यस्त रहाणार आहेत. बांगलादेशच्या अस्थिर राजकीय क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमात-ए-तैयबासाठी तारिक रहमानचे नरागमन महत्त्वपूर्ण ठरणार असले तरी सध्याचे नामधारी प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यासाठी मात्र त्यांचे आगमन तापदायक ठरण्याची शक्यता आहे. ( Tariq Rahman )

Tariq Rahman
Tariq Rahman

गुरुवारी बांगलादेशच्या राजकारणातील नवा अंक सुरु झाला. जवळजवळ १७ वर्षांच्या स्व-निर्वासनानंतर, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान लंडनहून ढाका येथे परतले. तारिक रहमान यांच्यासोबत त्यांची पत्नी डॉ. झुबैदा रहमान आणि मुलगी झैमा रहमान याही ढाका येथे परतल्या आहेत. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांचे अभूतपूर्व स्वागत कऱण्यात आले. तारिक यांच्या स्वागताला हजर असलेल्या हजारोंच्या जनसमुदायामुळे फेब्रुवारीमध्ये होत असलेल्या निवडणुकांमधील जनतेचा कल कुठल्या दिशेला असेल, याची झलक मिळाली आहे. तारिक रहमान हे बांगलादेशमध्ये परत आले आहेत, त्यावेळीच तिथे अनेक महत्त्वाच्या राजकीय घटना होत आहेत.  एकतर नॅशनलिस्ट पार्टीचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी अवामी लीग निवडणुकीतून बाहेर आहे, विद्यार्थी संघटना विखुरल्या आहेत आणि जमातला अद्याप जनतेनं पूर्णपणे स्विकालेलं नाही. अशा परिस्थितीत, बीएनपी सर्वात मजबूत दावेदार असून तारिक रहमान हे भावी पंतप्रधान म्हणूनच प्रचारात उतरणार आहेत. ( Tariq Rahman )

तारिक रहमान यांचे त्याच जोषात बांगलादेशमध्ये स्वागत करण्यात आले. त्यांनी एव्हरकेअर रुग्णालयात त्यांच्या आजारी आई आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची भेट घेतली. त्यानंतर ते निवडणुकीच्या कार्याला स्वतःला झोकून देणार आहेत. प्रथम तारिक रहमान मतदार म्हणून औपचारिकपणे नोंदणी करणार आहेत. त्यानंतर युवा नेते उस्मान हादी यांच्या कबरीलाही ते भेट देणार आहेत. तारिक रहमान बोगुरा ६ जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, तर पक्षाच्या प्रमुख खालेदा झिया त्यांच्या बालेकिल्ल्याच्या बोगुरा ७ जागेवरून निवडणूक लढवतील, अशी सध्याची माहिती आहे. तारिक रहमान यांचे वडील झियाउर रहमान हे बांगलादेशचे पहिले लष्करप्रमुख होते. त्यांनी बीएनपीची स्थापना केली आणि १९७७ ते १९८१ पर्यंत बांगलादेशचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९८१ मध्ये त्यांची हत्या करण्यात आली.  

शेख हसीनाच्या राजवटीत तारिक रहमान यांना अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले. २००७ मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात रहमान यंना अटक झाली. २००८ मध्ये रहमान यांना जामीन मंजूर झाला आणि उपचारांसाठी लंडनला जाण्याची परवानगी मिळाली, तेव्हापासून रहमान लंडनमध्येच रहात होते. या सर्वात शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन होत असतांना मोहम्मद युनूस यांनी त्यांची लंडनमध्ये भेट घेतल्याचीही माहिती आहे. युनूस सरकार बांगलादेशमध्ये आल्यावर त्यांनी रहमान यांच्या विरोधातील सर्व गुन्हा मागे घेतले. तेव्हापासून तारिक रहमान बांगलादेशमध्ये परतणार, अशी अटकळ होती. मात्र शेख हसीना यांच्या हत्येच कट केल्याचा आरोपही रहमान यांच्यावर आहे. २००८ मध्ये, ढाका ट्रिब्यूनने २००१ ते २००६ या काळात बीएनपीच्या राजवटीत झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यात रहमान यांचा उल्लेख “डार्क प्रिन्स” असा करण्यात आला होता. अर्थात गेल्यावर्षी युनूस यांनी त्यांना सर्व प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे. ( Tariq Rahman )

=======

हे देखील वाचा : Bangladesh News : बांगलादेशात पत्रकारांचे जगणं झालंय कठीण

=======

बांगलादेशचे राजकारण हे तीन खांबांवर आधारीत आहे. त्यात एका बाजूला शेख हसीना यांची अवामी लीग आहे. अवामी लीगवर या निवडणुकीत बंदी घालण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला बीएनपी आहे, या पक्षाच्या खालीदा झिया आजारी असल्यामुळे आणि पक्षाची धुरा सांभाळत असलेले तारिक रहमान परदेशात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. पण आता तेच कार्यकर्ते तारिक यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करत जल्लोष करीत आहेत. या सर्वात विद्यार्थी संघटना कुठल्या पक्षाला मदत करणार, हेही महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षीच्या सत्तापालटानंतर काही विद्यार्थी संघटनांनी नवीन पक्ष स्थापन केले आहेत. जनरल-झेडमध्ये त्यांचे निश्चितच अनुयायी असले तरी, ते ढाका आणि शहरी भागात मर्यादित असल्याचे दिसून येते. जमात-ए-इस्लामी सारखे पक्ष देखील निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, परंतु बांगलादेशमधील तरुणवर्ग विशेषतः महिलांचा त्यांना पाठिंबा नसल्याचे उघड झाले आहे. अशात बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी रोजी होणा-या निवडणुकीत तारिरक रहमान यांचेच पारडे जड असल्याचे चित्र आहे. ( Tariq Rahman ) 

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!