थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर थायलंडच्या सैन्याने भगवान विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यामुळे जगभरातील हिंदूंनी थायलंड सैनिकांच्या या कृत्याचा निषेध केला आहे. कंबोडियाने या घटनेवरुन नाराजी व्यक्त करत, आपल्या देशाच्या सीमेत असलेली मूर्ती थायलंडच्या सैनिकांनी बेकायदेशीरपणे पाडल्याचा ओऱोप केला आहे. भगवान विष्णू यांची ३० फूट उंच मूर्ती २०१४ मध्ये थायलंडच्या सीमेपासून सुमारे १०० मीटर अंतरावर बांधण्यात आली होती. गेल्या दोन आठवड्यापासून थायलंड आणि कंबोडिया या देशांमधील वाढलेल्या तणावात आता या मूर्तीची विटंबना केल्यामुळे अधिक वाढ होणार आहे. गेल्या दोन आठवड्यात या दोन देशांतील ४० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सीमेवर असलेल्या सर्वात प्राचीन प्रेह विहार मंदिराच्या मालकीवरुन हा वाद सुरु आहे. यामुळे हजारो वर्षाचे हे प्रेह विहार मंदिराच्या वास्तुलाही हानी होत आहे. या सर्वांमुळे भारताकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ( Thailand Vs Cambodia )

थायलंड आणि कंबोडिया गेल्या सहा महिन्यांपासून प्रेह विहार मंदिर परिसरावरून युद्धसदृश्य परिस्थिती आहे. जूनमध्ये दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले होते, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर युद्धबंदी झाली. पण तिही फार काळ टिकली नाही. आता कंबोडिया आणि थायलंडमधील दीर्घकाळ चाललेल्या या वादामधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. थायलंड सैन्याने सीमावर्ती भागातील भगवान विष्णूची मूर्ती पाडली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षादरम्यान ही घटना घडली. भगवान विष्णूची ही मूर्ती २०१४ मध्ये उभारण्यात आली होती. सर्वात उंच असलेली ही भगवान विष्णूची मंदिर या देशातील हिंदू जनतेसाठी पूजनीय होती. ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्यानं तोडण्यात आली, आणि या घटनेचे व्हिडिओही शेअर करण्यात आले, त्यामुळे जगभरातील हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. थायलंडच्या सैनिकांनी केलेल्या या कृत्यामुळे कंबोडियामध्ये संतापाची भावना आहे. कंबोडियाच्या प्रेह विहार प्रांताचे सरकारी प्रवक्ते किम चानफान्हा यांनी दावा केली की, ही भगवान विष्णूची मूर्ती कंबोडियाच्या सीमेवरील अन सेस परिसरात होती. थाई लष्करी अभियंत्यांनी ही मूर्ती पाडतांना मोठ्या सैनिक तैनात केले होते. बौद्ध आणि हिंदूंनी पूजनीय असलेली मंदिरे आणि मूर्तींचे नुकसान करणे अत्यंत निंदनीय असल्याचे किम यांनी सांगितले आहे. मात्र थायलंडने अद्याप या प्रकरणावर अधिकृत निवेदन जाहीर केलेले नाही. ( Thailand Vs Cambodia )
कंबोडिया आणि थायलंडमधील सीमा वाद हा अनेक वर्षांपासूनचा आहे. या संघर्षामुळे सुमारे १० लाख नागरिकांनकी त्यांची घरे सोडून अन्य सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. थायलंड-कंबोडिया सीमेजवळ असलेल्या १२ व्या शतकातील प्रेह विहार मंदिरालाही या युद्धामुळे नुकसान झाले आहे. या दोन्ही देशांमधील अशांत वातावरणाचा या ऐतिहासीक वास्तूला फटका बसत असल्यामुळे भारतानंही नाराजी व्यक्त केली आहे. भगवान शंकराला समर्पित आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध असलेले प्रेह विहार मंदिर, जगभरातील प्राचीन वास्तुकलेच्या अभ्यासकांसाठी नंदनवन मानले जाते. हजारो वर्षापूर्वीचा हा वारसा जतन करण्यासाठी जगभरातील अभ्यासक येथे येत असतात. मात्र कंबोडिया आणि थायलंड हे दोन्ही देश याच मंदिराच्या हक्कावरुन एकमेकांवर हल्ला करत आहेत. थायलंड आणि कंबोडियामधील सीमा वाद ११८ वर्षांपूर्वीचा आहे. १९०७ मध्ये, जेव्हा कंबोडिया फ्रेंच राजवटीखाली होता, तेव्हा दोन्ही देशांमध्ये ८१७ किलोमीटरची सीमा आखण्यात आली. ( Thailand Vs Cambodia )
=======
हे देखील वाचा : World War III : अब्जाधीशांना अणुयुद्धाचे भय !
=======
थायलंडने याचा निषेध केला, कारण नकाशात प्रेह विहार मंदिर कंबोडियाच्या हद्दीत दाखवण्यात आले होते. तर ता मुएन थॉम मंदिर थायलंडमध्ये दाखवण्यात आले होते. या मंदिरावर कंबोडिया स्वतःचा हक्क सांगत आहे. १९५९ मध्ये हा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचला. १९६२ मध्ये, न्यायालयाने प्रेह विहार मंदिराला कंबोडियाचा भाग म्हणून मान्यता दिली. थायलंडने हा निर्णय मान्य केला, परंतु आजूबाजूच्या जमिनीवरील दावे आजही सुरू आहेत. कंबोडियाचा दावा आहे की, थाई सैन्याने सीमेजवळील प्राचीन मंदिरांचे अवशेष खराब केले आहेत. थायलंडचा दावा आहे की, कंबोडियाने शतकानुशतके जुन्या मंदिरांभोवती सैन्य तैनात केले आहेत. त्यात २००८ मध्ये युनेस्कोने मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून समाविष्ट केल्यावर वाद आणखी वाढला. २०१३ मध्ये, न्यायालयाने केवळ मंदिरच नाही तर आजूबाजूचा परिसरही कंबोडियाचा असल्याचे सांगून थायलंडला तिथून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेण्याचे दिले. तेव्हापासून हे दोन्हीही देश एकमेकांवर छुप्या पद्धतीनं हल्ला करीत आहेत. आता यातूनच भगवान विष्णूच्या मूर्तीचीही विटंबना कऱण्यात आली आहे.
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- 1962 verdict
- 2013 verdict
- An Ses
- ancient temple
- archaeological loss
- border conflict
- Border Dispute
- bulldozer act
- Cambodia protest
- ceasefire talks
- civilian deaths
- Cultural Heritage
- disputed border
- heritage damage
- Hindu outrage
- holy idol
- ICJ ruling
- mass displacement
- military clash
- Preah Vihear
- Preah Vihear province
- religious tensions
- religious vandalism
- sacred site
- Shiva Temple
- Southeast Asia
- statue demolition
- temple ownership
- temple ruins
- Thai engineers
- Thai soldiers
- Thailand Cambodia
- Trump mediation
- UNESCO site
- Vihear temple
- Vishnu statue