Home गाजावाजा स्पेशल लंडन एवढा हिमखंड तुटतो तेव्हा….
गाजावाजा स्पेशल

लंडन एवढा हिमखंड तुटतो तेव्हा….

5
Iceberg
When an iceberg the size of London breaks marathi info

अंटार्क्टिका हा पृथ्वीचा सर्वात दक्षिणेकडील खंड आहे. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेनंतर हा पृथ्वीचा पाचवा सर्वात मोठा खंड आहे. अंटार्क्टिकाचा 98% भाग सरासरी 1.6 किलोमीटर बर्फाने व्यापलेला आहे. याच अंटार्क्टिकाला आता बदलत्या हवामानाचा फटका बसत चालला आहे. यातूनच अंटार्क्टिकेच्या काही भागातील मोठे हिमखंड तुटत चालले आहेत. हा मोठा धोका असून यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू शकते.  तसेच याचा समुद्रातील जीवांना धोका होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे, समुद्रातील जहाजांनाही या हिमखंडाचा धोका असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.  कारण हा हिमखंड काही छोटा-मोठा हिमखंड नसून ग्रेटर लंडनएवढ्या आकारचा हा हिमखंड आहे. त्यामुळे त्याचे काय परिणाम होणार आहेत, याच्यावर शास्त्रज्ञ नजर ठेऊन आहेत.  

ग्रेटर लंडनच्या आकारमानाचा एक मोठा हिमखंड अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या कड्यापासून तुटल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  अशाप्रकारचा हिमखंड तुटण्याची गेल्या दोन वर्षांतील ही दुसरी घटना आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा हिमखंड तुटल्यानं त्याचे परिणाम नक्की होणार अशी भीती तज्ञ व्यक्त करीत आहेत.  ग्रेटर लंडनच्या आकाराचा हा महाकाय हिमखंड अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या कड्यापासून तुटल्यावर त्याचा काल्पनिक फोटो आणि व्हिडिओ संशोधकांनी प्रसिद्ध केला आहे. हा हिमखंड त्याच्या मूळ शेल्फ अंटार्क्टिकापासून तरंगत दूर गेला आहे, आणि शास्त्रज्ञ त्यावर नजर ठेऊन आहेत.  

या हिमखंडावर नजर ठेऊन असलेल्या संशोधकांच्या मते, A81 नावाचा हा हिमखंड त्याच्या मुळ स्थानापासून सुमारे 150 किमीवर तरंगत आहे. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, हिमखंडाचा वास्तविक आकार 1550 चौरस किलोमीटर आहे. ते जवळजवळ ग्रेटर लंडनच्या आकाराएवढे आहे. तो वेडेल समुद्रात तरंगत जाईल असा अंदाज आहे, कारण हा हिमखंड या समुद्राच्या जोरदार प्रवाहाबरोबर पुढे जात आहे. अंटार्क्टिका मध्ये संशोधन करणा-या हॅली रिसर्च स्टेशनमधून बर्फाच्या शेल्फवर परत येताना हा व्हिडिओ ब्रिटिश अंटार्क्टिका सर्व्हेने शूट केला आहे.  ध्रुवीय संशोधन संस्थेच्या अहवावानुसार, हिमखंड ए81 पासून तुटलेल्या लहान हिमखंडांनी वेढलेला आहे.  संशोधकांनी सांगितले की, A81 हिमखंड गेल्या दोन वर्षांत अंटार्क्टिकाच्या Chasm-1 पासून तुटलेला दुसरा सर्वात मोठा हिमखंड आहे.

=========

हे देखील वाचा : पुतिन यांच्या विरोधात इंटरनॅशनल कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

=========

ग्लेशियोलॉजिस्ट डॉ. ऑलिव्हर मार्श यांनी हिमनद्याच्या या तुकड्याबाबत आमच्याकडे माहिती होती, असे स्पष्ट केले आहे.  गेल्या काही वर्षापासून हॅली रिसर्च स्टेशनमधून याबाबत संशोधन होत आहे.  हिमनद्यशास्त्रज्ञांनी 2012 मध्ये प्रथम Chasm-1 चे रुंदीकरण पाहिले आहे.  तेव्हापासूनच हा हिमखंड तुटण्याची शक्यता सांगण्यात आली होती.  तज्ज्ञांच्या मते, जेव्हा बर्फाचे खडक खूप जाड होतात तेव्हा ते मुळ स्थानापासून अलग होतात.  आता हा हिमखंड वेगळा झाल्यामुळे त्याचे काय परिणाम होणार याबाबत अभ्यास करण्यात येत आहे.  एवढ्या मोठ्या आकाराचा हिमखंड वितळल्याने समुद्रात पाण्याची पातळी वाढण्याचीही शक्यता आहे.  या सर्वांचा सागरी जीवांवरही परिणाम होऊ शकतो.  यातील चिंता व्यक्त करणारी गोष्ट म्हणजे, हिमखंड तुटण्याची ही दोन वर्षांतील दुसरी घटना आहे.  यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये देखील असाच भव्य हिमखंड वेगळा झाला होता.  तेव्हा A74 नावाचा हिमखंड खडकापासून तुटला होता.  त्याचा आकार 1,270 चौरस किमी होता.  ही परिस्थिती म्हणजे, अंटार्क्टिकाची मोठी हिमनदी वेगाने वितळत असल्याची सूचना असल्याचे शास्त्रज्ञ मानतात.   यामुळे जगावर मोठी आपत्ती येऊ शकते, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.  या हिमखंडामुळे समुद्रातील मोठ्या जहाजांना धोका निर्माण होऊ शकतो.  टायटानिक नावाचे भव्य जहाज हिमखंडाची टक्कर लागल्यामुळे समुद्रात बुडाले होते. अशाच प्रकारची दुर्घटना होऊ नये, म्हणून संशोधक या हिमखंडाला चोवीस तास ट्रॅक करीत आहेत.  

सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!