Home गाजावाजा स्पेशल Gudhipadwa : अतिशय शुभ मानले जाणारे साडे तीन मुहूर्त कोणते?
गाजावाजा स्पेशल

Gudhipadwa : अतिशय शुभ मानले जाणारे साडे तीन मुहूर्त कोणते?

72

कोणतेही चांगले, शुभ काम करायचे असेल, नवीन लहान किंवा मोठी खरेदी करायची असेल तर आपल्याकडे नेहमीच शुभ दिन, शुभ मुहूर्त बघण्याची परंपरा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये मुहूर्ताला खूपच महत्व आहे. एका वर्षांमध्ये जरी अनेक शुभ दिन, शुभ मुहूर्त असले तरी साडे तीन मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्व आहे. असे म्हटले जाते की, या साडे तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी शुभ काम करण्यासाठी इतर काहीच पाह्यची गरज नसते. हा पूर्ण दिवसच शुभ आणि लाभदायक असतो. (Gudhipadwa)

या साडे तीन मुहूर्तांबद्दल आपण अनेकदा ऐकले, वाचले आहे. मात्र याबद्दल अधिक माहिती कोणालाच जास्त नसेल. आता येणाऱ्या गुढीपाडव्याचा मोठा आणि पूर्ण मुहूर्त येत आहे, त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया साडे तीन मुहूर्तांबद्दल. कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्याची सुरुवात शुभ मुहूर्तावर केली जाते. कारण या शुभ मुहूर्ताचा संबंध शुभतेशी, लाभाशी जोडला जातो. हिंदू धर्मात असणारे हे साडेतीन मुहूर्त म्हणचे पुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी पाडवा. यात पुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा हे पूर्ण मुहूर्त तर दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. (Marathi)

साडेतीन मुहूर्त म्हणजे काय?
साडेतीन मुहूर्त म्हणजे स्वयंसिद्ध मुहूर्त. कोणताही मुहूर्त काढण्यासाठी पंचांग शुद्धी, नक्षत्र, शुद्धी, तारा बल, चंद्र बल पहावे लागते. पण वर्षातले काही दिवस असे असतात की, त्या दिवशी उत्तम तिथी, नक्षत्र आणि योग असा पूर्ण संयोग होतो. या योगावर, या दिवशी कुठलाही वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नसते. तसेच या दिवशी खरेदी केलेली संपत्ती अक्षय राहते, ती घेणाऱ्याला लाभते आणि कायम वृद्धिंगत होते. त्यामुळे हे मुहुर्त साधून सोने चांदी घर वाहन आदी खरेदी आवर्जून केली जाते. (Todays Marathi HEadline)

गुढीपाडवा 
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असतो. गुढीपाडवा हा साडे तीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. यादिवशी लोकं नवीन वस्तूंची खरेदी करतात. आपल्या नवीन व्यवसायाचा शुभारंभ करतात. या दिवशी गुढी उभारली जाते. देवदर्शनाला जातात, गोडधोडाचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. साडे तीन मुहुर्तांपैंकी एक असल्यामुळे गुढीपाडवा या सणाला खूपच विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. (Top Marathi News)

Gudhipadwa

अक्षय तृतीया 
अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहुर्तापैकी दुसरा महत्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी सुरु केलेले कार्य, किंवा खरेदी कधी क्षय होत नाही कायम अक्षय राहते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीच क्षय किंवा नाश होत नाही असा दिवस. या दिवशी सुरु केलेल्या कमल मोठे यश मिळते, अशी मान्यता आहे. अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीया या तिथीला येतो. क्षय नसलेली तिथी असल्याने यादिवशी दान- धर्म, खरेदी, नवीन कार्यचा प्रारंभ तसेच जप- तप आदी गोष्टी केल्या जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सोने खरेदी करण्यास अधिक प्राधान्य देतात. (Marathi Headline)

विजयादशमी 
दसरा हा सण देखील साडेतीन मुहूर्तापैंकी तिसरा महत्वाचा मुहूर्त आहे. अश्विन महिन्यातील दशमीला विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन तसेच शस्त्रपूजन ही केले जाते. हा दिवस विजयाचा दिवस असल्याने, या दिवशी कोणतेही कार्य मुहूर्त न बघता करता येतात. सोने-चांदी, दागिने, घर, वाहन यांची खरेदी करतात. (Top Stories)

बलिप्रतिपदा 
कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा दिवस देखील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून या दिवसाला मानले जाते. या दिवसाला बलिप्रतिपदा देखील म्हणतात. हा दिवस नवीन कार्याच्या शुभारंभासाठी महत्त्वाचा मानला जातो. सर्व व्यापारी वर्गाचे लोक या दिवशी वही खात्याचे पूजन करतात. यादिवशी सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. पाडव्याला पत्नी पतीचे औक्षण करते. (Social News)

(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!