इस्रायली हवाई दलाने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना हवाई हल्ल्यात ठार केल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी तेहरानमधील खामेनी यांच्या अधिकृत निवासस्थानावर आणि कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात खामेनींसह त्यांची मुलगी, जावई आणि नातीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यासोबत इराण प्रशासनातील काही वरिष्ठ नेत्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर इराणमध्ये दुःख आणि काही ठिकाणी संतापाचे वातावरण आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर आता त्यांची जागा कोण घेणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. खामेनी यांचा मुलगा मुजतबा त्यांची जागा घेणार, अशी अटकळ वर्तवली जात आहे; मात्र इतर पाच नावांचाही या पदासाठी विचार होऊ शकतो. दरम्यान, इराणने आठ मुस्लिम देशांवर खामेनी यांच्या मृत्यूच्या कटात सहभागी असल्याचा संशय व्यक्त करत कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. जर मुजतबा खामेनी यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा झाली, तर तणाव आणखी वाढू शकतो. कारण मुजतबा हे अयातुल्ला अली खामेनी यांचे पुढचे पाऊल मानले जातात. ( Mujtaba Khamenei )

सध्या खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने ४० दिवसांचा शोक आणि सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. रुहोल्ला खोमेनी यांच्या १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर खामेनी यांनी सर्वोच्च पद स्वीकारले. त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) या शक्तिशाली सैन्यदलाची उभारणी केली आणि इराणवर कठोर नियंत्रण ठेवले. आता त्यांच्या मृत्यूनंतर इस्लामिक रिपब्लिक नवीन सर्वोच्च नेते म्हणून कोणाची निवड करते, यावर मध्यपूर्वेतील परिस्थितीचा पुढील कल अवलंबून असेल. इराणमध्ये सर्वोच्च नेत्याला “रहबर” म्हटले जाते. “रहबर” म्हणजे “मार्गदर्शक”. ८८ धर्मगुरूंच्या सभेत सर्वोच्च नेत्याची निवड केली जाते. इराण आणि व्हॅटिकन सिटी हे जगातील असे देश आहेत, जिथे धार्मिक नेत्यांकडे सर्वाधिक अधिकार आहेत. इराणच्या संविधानानुसार “मजलिस-ए-खोब्रेगन-ए-रहबारी” ही तज्ञांची सभा सर्वोच्च नेत्याची नियुक्ती आणि देखरेख करते. ही व्यवस्था “विलायत-ए-फकीह” या तत्त्वावर आधारित आहे, ज्यामध्ये केवळ इस्लामिक धर्मगुरू सर्वोच्च पद भूषवू शकतो.
८८ सदस्यांची ही सभा जनतेद्वारे थेट मतदानातून आठ वर्षांच्या कालावधीसाठी निवडली जाते. हीच सभा सर्वोच्च नेत्याची नियुक्ती, देखरेख आणि आवश्यक असल्यास पदावरून दूर करण्याचे अधिकार राखते. उमेदवारांची छाननी करणाऱ्या पालक परिषदेत १२ सदस्य असतात—सहा इस्लामिक फकीह आणि सहा कायदेतज्ज्ञ. आता हीच तज्ञांची सभा नवीन सर्वोच्च नेत्याचे नाव जाहीर करणार आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मुलगा मुजतबा यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून घेतले जात आहे. त्यांच्यासोबत होज्जत-उल-इस्लाम मोहसेन कोमी यांचेही नाव चर्चेत आहे. कोमी हे खामेनी यांचे जवळचे सल्लागार मानले जातात. अलिरेझा अराफी हे आणखी एक प्रमुख दावेदार आहेत. अराफी हे दीर्घकाळ खामेनी यांचे विश्वासू मानले जातात. ते तज्ञांच्या परिषदेचे सदस्य आहेत आणि पालक परिषदेतही त्यांनी काम केले आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ते आग्रही असल्याचे सांगितले जाते. ( Mujtaba Khamenei )
अली असगर हेजाझी यांचे नावही चर्चेत आहे. ते राजकीय सुरक्षा मंत्रालयात कार्यरत असून त्यांचे IRGC आणि वरिष्ठ धर्मगुरूंशी चांगले संबंध आहेत. मात्र त्यांच्याकडे सर्वोच्च नेते होण्यासाठी आवश्यक असलेली अयातुल्ला पदवी नाही. हाशिम अली बुशेहरी हेही संभाव्य दावेदारांपैकी एक आहेत. त्यांनी इराणचे प्रमुख धर्मगुरू म्हणून काम केले आहे आणि विविध धार्मिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. या सर्व दावेदारांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे मुजतबा खामेनी. ते अयातुल्ला अली खामेनी यांचे दुसरे पुत्र आहेत. सध्याच्या परिस्थितीत IRGC नवीन सर्वोच्च नेत्याच्या नियुक्तीबाबत तातडीचा निर्णय घेऊ शकते. संवैधानिक प्रक्रियेला दुय्यम ठरवत मुजतबा खामेनी यांचे नाव सर्वोच्च नेते म्हणून घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
=======
हे देखील वाचा : Ayatollah Khamenei: खामेनीच्या बंकरला भेदण्यात अमेरिका यशस्वी होणार ?
=======
मुजतबा खामेनी यांचा जन्म ८ सप्टेंबर १९६९ रोजी मशहाद येथे झाला. सध्या ते ५६ वर्षांचे असून त्यांना तीन मुले आहेत. ते मध्यम दर्जाचे धर्मगुरू असून इराणी सत्ताकेंद्रांमध्ये त्यांचा प्रभाव मानला जातो. इराणच्या गुप्तचर आणि सशस्त्र दलांमध्ये त्यांची पकड असल्याचे सांगितले जाते. त्यांनी इराण-इराक युद्धात सहभाग घेतला होता. १९९० पासून ते पडद्यामागे राजकारणात सक्रिय आहेत. मोहम्मद अहमदीनेजाद यांना राष्ट्रपती बनवण्यात त्यांची भूमिका असल्याचेही मानले जाते. इराणच्या माध्यमांवर त्यांचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. २०१४ मध्ये त्यांनी आयआरआयबी या सरकारी टेलिव्हिजन संस्थेच्या संचालकांना हटवून आपल्या पसंतीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. इराणमधील आंदोलने दडपण्यासाठी घेतलेल्या कठोर कारवाईतही त्यांचे नाव घेतले जाते. २०२१ मध्ये त्यांना अयातुल्ला पदवी देण्यात आली, जी सर्वोच्च नेते होण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांचे नाव कधीही सर्वोच्च प्रमुख म्हणून घोषित होऊ शकते, अशी अटकळ आहे. मात्र मुजतबा हे त्यांच्या वडिलांपेक्षा अधिक कट्टर मानले जातात. २०२२ मध्ये महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या निदर्शनांमध्ये सुरक्षा दलांच्या कठोर कारवाईमागे त्यांचा प्रभाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंधही लादले आहेत. त्यामुळे मुजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्यास अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ( Mujtaba Khamenei )
– सई बने
- Ali Asghar Hejazi
- Ali Khamenei death
- Alireza Arafi candidate
- Assembly of Experts
- Guardian Council role
- hardline cleric leadership
- Hashem Bushhehri name
- Iran constitutional process
- Iran leadership crisis
- Iran Supreme Leader
- IRGC influence network
- Islamic Republic politics
- Israeli military strike
- Mahsa Amini protests
- Majlis e Khobregan
- Middle East tensions
- Mohsen Qomi contender
- Mojtaba Khamenei successor
- political power transition
- Rahbar selection process
- regional war implications
- Tehran airstrike report
- Tehran succession debate
- US Iran sanctions
- Wilayat al Faqih