Home आंतरराष्ट्रीय Ayatollah Khamenei: खामेनीच्या बंकरला भेदण्यात अमेरिका यशस्वी होणार ?
आंतरराष्ट्रीय

Ayatollah Khamenei: खामेनीच्या बंकरला भेदण्यात अमेरिका यशस्वी होणार ?

0

संभाव्य अमेरिका-इराण युद्ध सुरू झाले आहे. मात्र या युद्धाची सुरुवात अमेरिकेने प्रत्यक्ष न करता इस्रायलला पुढे करून केली आहे, असे म्हटले जात आहे. इस्रायलने इराणमधील सुमारे ३० ठिकाणी हल्ले केले आहेत. इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे घर उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे. लष्करी आणि गुप्तचर संस्थांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यादरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचे निवासस्थान आणि गुप्तचर मुख्यालय देखील लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराण लष्करातील प्रमुख नेतृत्वाचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यावर इराणनेही इस्रायल आणि अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील लष्करी तळांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. एकूणच मध्यपूर्वेत नवीन युद्ध सुरू झाले आहे. यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना बिनशर्त शरण या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा संदेश दिल्याचे सांगितले जात आहे. या संदेशावर खामेनी यांची प्रतिक्रिया अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र अयातुल्ला अली खामेनी हे त्यांच्या सुरक्षित बंकरमध्ये गेले असल्याचे वृत्त आहे. ( Ayatollah Khamenei )

अमेरिकेने यापूर्वीही खामेनी यांच्या बंकरला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात अमेरिकेला यश आले नव्हते. आता अमेरिका अयातुल्ला अली खामेनी यांच्या बंकरला लक्ष्य करून त्यांची इराणमधील राजवट संपवणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. इस्रायलने इराणवर जलद हल्ला सुरू केला आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यात खामेनी यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून त्या ठिकाणी मोठा खड्डा पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा हल्ला होण्याच्या काही तास आधीच खामेनी यांना तेहरानमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे. घरावर हल्ला झाल्यानंतरही त्या परिसरातून स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे इराणमध्ये खामेनी यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हल्ल्यांपूर्वीच खामेनी यांना अत्यंत सुरक्षित भूमिगत बंकरमध्ये हलवण्यात आल्याचे सांगितले जाते. हा बंकर अणुहल्ले आणि हवाई हल्ल्यांना तोंड देण्यास सक्षम अशा अत्याधुनिक बोगदा प्रणालीशी जोडलेला आहे. हा अणुसुरक्षित बंकर सर्वात शक्तिशाली बॉम्बलाही तोंड देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. ( Ayatollah Khamenei )

अयातुल्ला अली खामेनी यांच्या सुरक्षेसाठी एकच बंकर नसून सुधारित बंकरचे संपूर्ण जाळे तयार करण्यात आले आहे. हे सर्व बंकर एकमेकांना जोडलेले आहेत आणि त्यातून भूमिगत हालचाल करता येते. काही ठिकाणी तर या बंकरमध्ये गाड्या चालतील अशीही व्यवस्था आहे. बंकरची आतील सुरक्षा अत्यंत कडक आहे. बंकरमध्ये इराणचे वरिष्ठ अधिकारी गेले तरी त्यांचे डोळे बांधूनच त्यांना प्रवेश दिला जातो, असे सांगितले जाते. खामेनी यांना ज्या बंकरमध्ये ठेवण्यात आले आहे, तो जमिनीखाली सुमारे ६० फूट खोल आहे. या बंकरमध्ये किमान सहा महिने राहता येईल, अशी सर्व तयारी करण्यात आली आहे. सहा महिन्यांचा अन्नसाठा, पाण्याची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा येथे उपलब्ध आहेत. या गुप्त स्थानाचा मागोवा लागू नये म्हणून फोनसह सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळला जातो. बाहेरील जगाशी संपर्क साधण्यासाठी खामेनी त्यांच्या विश्वासू कमांडरमार्फत संवाद साधतात.

=======

हे देखील वाचा : Yad Vashem : मानवतेच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांची आठवण

=======

अणुहल्ल्यांपासून संरक्षणासाठी जमिनीखाली बांधलेल्या या बंकरमध्ये ऑक्सिजनची कमतरता टाळण्यासाठी ऑक्सिजन रीसायकलिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आयसीयू सुविधा, ऑपरेटिंग थिएटर आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. तसेच या बंकरमधून थेट सरकारी एअरबेसकडे जाणारा मार्गही असल्याचे सांगितले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खामेनी यांच्या सुरक्षेसाठी या बंकरमध्ये इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स तैनात आहेत. या सर्व सुरक्षा व्यवस्थेला भेदून इस्रायल आणि अमेरिकेला अयातुल्ला अली खामेनी यांच्यापर्यंत पोहोचता येईल का, यावरच या संभाव्य युद्धाचे भवितव्य अवलंबून आहे. ( Ayatollah Khamenei )

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!