Home आंतरराष्ट्रीय Iran Targeting Dubai: …म्हणून इराणनं दुबईला केलं लक्ष
आंतरराष्ट्रीय

Iran Targeting Dubai: …म्हणून इराणनं दुबईला केलं लक्ष

0

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले सुरू केल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी इराणने मध्यपूर्वेतील काही मुस्लिम देशांवर क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात केली. यामध्ये दुबईचाही समावेश असल्याने जगभरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण दुबईमध्ये खामेनी यांचा उत्तराधिकारी मानल्या जाणाऱ्या त्यांच्या मुलगा मुजतबा खामेनी यांचीही मोठी संपत्ती असल्याची माहिती आहे. शिवाय दुबईमध्ये अमेरिकेचा लष्करी तळ नाही. असे असतानाही इराणने दुबईला लक्ष्य का केले, यामागील मुख्य कारण म्हणजे दुबईमध्ये अमेरिकेची असलेली मोठी गुंतवणूक. खामेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेला शक्य तितके आर्थिक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न इराण करीत असल्याचे म्हटले जात आहे. त्यातूनच दुबईवर हल्ले झाल्याचे सांगितले जाते. दुबईमध्ये अमेरिकन कंपन्या, जेबेल अली बंदर आणि अनेक पर्यटन स्थळांमध्ये अमेरिकेची मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळेच दुबईवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने तात्काळ सर्व उड्डाणे स्थगित केल्याची माहिती आहे. हे विमानतळ जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असून हजारो प्रवासी अडकले असल्याचे सांगितले जाते. ( Iran Targeting Dubai )

इराणने अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध मध्यपूर्वेत युद्ध सुरू केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत आठ मुस्लिम देशांवर हल्ले झाल्याचे म्हटले जाते. यात संयुक्त अरब अमिरातीतील दुबईला मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. २८ फेब्रुवारी रोजी दुबईवर क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याने मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात किमान दोन जण ठार आणि आठ जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दुबईमध्ये अमेरिकेचा लष्करी तळ नसतानाही अमेरिकन उद्योगसमूहांची मोठी गुंतवणूक असल्याने हे लक्ष्य ठरल्याचे म्हटले जाते. विमानतळ, बुर्ज अल अरब, पाम जुमेराह, बुर्ज खलिफा परिसर आणि जेबेल अली बंदर या प्रमुख ठिकाणी अमेरिकेची गुंतवणूक आहे. २०१५ ते २०२४ दरम्यान अंदाजे १.८ लाख कोटी रुपयांची अमेरिकन गुंतवणूक दुबईत झाल्याचे सांगितले जाते. बोईंग, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम आणि गुगल यांसारख्या कंपन्यांची कार्यालये दुबईमध्ये आहेत. त्याशिवाय सुमारे १,५०० अमेरिकन कंपन्या येथे कार्यरत आहेत. बुर्ज खलिफामध्ये अनेक कंपन्यांची कार्यालये असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच इराणकडून बुर्ज खलिफाला लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा आहे. दुबईचे जेबेल अली बंदरही हल्ल्याचे लक्ष्य ठरल्याचे सांगितले जाते. हे जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित बंदर मानले जाते आणि ते व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. या बंदरावर क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याने तेथे आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेसाठी हे बंदर महत्त्वाचे गुंतवणूक केंद्र मानले जाते. बुर्ज खलिफा हा दुबईचा प्रतीकात्मक आणि प्रतिष्ठेचा भाग आहे.

=======

हे देखील वाचा : Mujtaba Khamenei : मुजतबा खामेनीच्या नावाला सर्वांची पसंती

=======

८२८ मीटर उंच ही जगातील सर्वात उंच इमारत असून तिची किंमत सुमारे १.५ अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. या इमारतीच्या विविध मजल्यांवर दररोज हजारो पर्यटक भेट देतात. हल्ल्यांनंतर या परिसरात मोठी हानी झाल्याची माहिती आहे. सात-तारांकित हॉटेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुर्ज अल अरब हॉटेलवरही ड्रोन हल्ला झाल्याची चर्चा आहे. हे हॉटेल दुबईच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक मानले जाते. हल्ल्यानंतर या हॉटेलला काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर सुरक्षेबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दुबईवरील हल्ल्याचा उद्देश अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भविष्यातही दुबईला लक्ष्य केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे सांगितले जाते. ( Iran Targeting Dubai )

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!