Home आंतरराष्ट्रीय Mosaic Defense : इराणच्या मोझॅक युद्धनीतीची अमेरिकेने घेतली धास्ती
आंतरराष्ट्रीय

Mosaic Defense : इराणच्या मोझॅक युद्धनीतीची अमेरिकेने घेतली धास्ती

70

प्राचीन मेसोपोटेमियामध्ये उगम झालेल्या मोझॅक कलेची सध्या चर्चा होत आहे. भिंती सजवण्यासाठी टेराकोटाच्या तुकड्यांचा यात वापर करण्यात येतो. ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्ये दगड, काच आणि शिंपल्यांचा वापर करून या कलेला जमिनीवरील आणि भिंतीवरील कलेच्या रूपात विकसित करण्यात आले. काच, दगड, सिरॅमिक किंवा टाइलचे लहान, रंगीबेरंगी तुकडे एकत्र जोडून एक मोठे आणि सुंदर चित्र मोझॅक कलेत तयार केले जाते. टेसेरी म्हटल्या जाणाऱ्या या तुकड्यांना गोंद किंवा सिमेंट वापरून फरशी, भिंत किंवा इतर पृष्ठभागावर चिकटवून टिकाऊ कलाकृती तयार केली जाते. छोट्या तुकड्यांना एकत्र करून मोठी कलाकृती तयार करणे हे या कलेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ( Mosaic Defense )

याच मोझॅक कलेचा वापर इराणने युद्धनीतीमध्ये अत्यंत कुशलतेने केला आहे. अमेरिका आणि इस्रायल गेल्या दोन आठवड्यांपासून इराणवर तुफान शस्त्रांचा मारा करत आहेत. क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत आहे. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या जागी नियुक्त मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीविषयीही विविध बातम्या येत आहेत. त्यातच इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी, त्यांचा मुलगा मोर्तेझा लारीजानी आणि उपसचिव अलीरेझा बायात यांचाही अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. तरीही इराण खचला नाही. उलट इराणने अधिक आक्रमकपणे इस्रायलची राजधानी तेल अवीववर हल्ले करून मोठे नुकसान केले आहे. युद्धातील पहिली फळी संपल्यानंतरही इराण अधिक ताकदीने कसा उभा आहे, याचे कोडे अमेरिकेसह संपूर्ण जगाला पडले आहे. त्यामागे मोझॅक कलेवर आधारित युद्धनीती आहे. याच मोझॅक कलेपासून प्रेरणा घेऊन इराणचे नेते तब्बल वीस वर्षांपासून संभाव्य युद्धाची तयारी करत होते. आपल्या नेत्यांना काही झाल्यास सैन्याची साखळी खंडित होऊ नये म्हणून त्यांनी या कलेचा आधार घेत युद्धनीती विकसित केली, आणि आता याच युद्धनीतीमुळे अमेरिकेला धास्ती बसली आहे. ( Mosaic Defense )

अमेरिका-इराण युद्धाला दोन आठवडे झाले आहेत. इराणवर अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांचा मारा सुरू असला तरी इराण माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. यामागे इराणची ‘मोझॅक संरक्षण प्रणाली’ आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्ध लवकरच संपेल असे सांगत असले, तरी इराणने अमेरिका आणि इस्रायलसोबत पुढील दहा वर्षे युद्ध करण्याची तयारी दर्शवली आहे. या दीर्घकालीन युद्धनीतीचा केंद्रबिंदू म्हणजे मोझॅक संरक्षण प्रणाली. या प्रणालीमध्ये केंद्रीय आदेशाशिवाय लढण्याची क्षमता आहे. युद्धात शत्रूकडून उच्च नेतृत्व मारले गेले तरी इतर सैनिक नेतृत्व स्वीकारून युद्ध चालू ठेवतात. तेहरानमध्येही ही अभेद्य मोझॅक संरक्षण प्रणाली कार्यरत असून, केंद्रीय आदेशाशिवाय लढत त्यांनी अमेरिका आणि मध्यपूर्वेतील देशांना अडचणीत आणले आहे.

इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणची पहिली फळी संपली असली तरी मोझॅक युद्धप्रणालीमध्ये सेना एक, दोन, तीन, चार अशा क्रमांकानुसार विभागली जाते. पहिला उत्तराधिकारी मारला गेला तर दुसरा त्याची जागा घेतो, त्यानंतर तिसरा, चौथा असे क्रम सुरू राहतात. चौथा उत्तराधिकारी गमावला तरी त्याची जागा कोण घेईल हे आधीच निश्चित असल्याने ही साखळी अभेद्य ठरते. ( Mosaic Defense )

मोझॅक संरक्षण प्रणाली ही इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ची संरक्षण प्रणाली आहे. या प्रणालीचे नेतृत्व माजी कमांडर मोहम्मद अली जाफरी यांनी केले असून त्यांनीच ही पद्धत विकसित केली. या प्रणालीअंतर्गत IRGC, बसिज, नियमित लष्करी तुकड्या, क्षेपणास्त्र दल, नौदल संसाधने आणि स्थानिक कमांड संरचना एका वितरित प्रणालीचा भाग म्हणून कार्यरत आहेत. यातील एखादा घटक नष्ट झाला किंवा सर्वोच्च नेता मारला गेला तरी ही साखळी अखंड चालू राहील, अशी याची रचना आहे. या प्रणालीअंतर्गत हत्येपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी प्रत्येक महत्त्वाच्या लष्करी आणि नागरी पदासाठी अनेक उत्तराधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.

=======

हे देखील वाचा : Iran Displacement : युद्धाच्या दाहकतेमुळे इराणमधून सर्वाधिक पलायन

=======

मोझॅक संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून उत्तराधिकाराचे अनेक स्तर तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्या नेत्याची हत्या झाली किंवा त्याचे अपहरण झाले तरी कामकाज थांबत नाही. पहिला उत्तराधिकारी अक्षम ठरल्यास दुसरा, तिसरा किंवा चौथा उत्तराधिकारी तयार असतो. माहितीनुसार, या प्रणालीअंतर्गत IRGC ची ३१ स्वतंत्र तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यातील एक तुकडी तेहरानसाठी आणि उर्वरित ३० तुकड्या विविध प्रांतांमध्ये तैनात आहेत. प्रत्येक तुकडीच्या कमांडरला समान अधिकार असून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. अमेरिकेने हे ३१ कमांडर मारले तरी त्यांची जागा घेण्यासाठी दुसरे ३१ कमांडर तयार आहेत. ही साखळी किती मोठी आहे, याची माहिती केवळ इराणलाच आहे. या न संपणाऱ्या साखळीमुळे महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेलाही हादरवून सोडले आहे. ( Mosaic Defense )

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!