Home गाजावाजा स्पेशल Village : ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; रस्त्यांवर फिरते मर्सडीज आणि बीएमडब्लू
गाजावाजा स्पेशल

Village : ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; रस्त्यांवर फिरते मर्सडीज आणि बीएमडब्लू

0

आजच्या काळात पैसा हा सगळ्यांचेच सर्वस्व बनला आहे. आज सगळ्यांचे एकच ध्येय आहे, भरपूर पैसा कमवायचा आणि एशोआरामात जगायचे. मात्र सगळ्यांच्याच नशिबात श्रीमंत होणे लिहिलेले नसते. अफाट मेहनत घेऊन देखील मोजकेच लोकं श्रीमंत होतात. सगळ्यांच्याच नशिबी श्रीमंत होणे नसते. मात्र जर आम्ही तुम्हला सांगितले की, आपल्या देशात एक असे गाव आहे, जे भारतातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. या गावात राहणारे सर्वच लोकं कोट्याधीश आहे. ऐकून आश्चर्य वाटले ना…? मात्र हे खरे आहे. हे गाव श्रीमंतांचे गाव म्हणून ओळखले जाते. (Richest Village)

सामान्यपणे गाव म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर मातीचे रस्ते, मातीची घरे, जास्त सोयी सुविधा नसलेले ठिकाण, अशिक्षित लोकं, शेती करून आपला उदरनिर्वाह करणारे लोकं डोळ्यासमोर येतात. थोडक्यात काय तर गरीब लोकं गावात राहतात असा आपला समज आहे. मात्र आज तुम्हाला तुमचा हाच समज गैरसमज असल्याचे लक्षात येईल. कारण आज आम्ही तुम्हाला भारतातील एक असे गाव सांगणार आहोत जे सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावात प्रत्येकाच्याच दारासमोर लाखो, कोटींच्या गाड्या उभ्या असलेल्या दिसतात. कोणते आहे हे गाव चला जाणून घेऊया. (Marathi)

भारतातील सर्वात श्रीमंत असणारे हे गाव आहे गुजरातमधील धर्मज. येथील लोक ग्रामीण आणि शहरी असे दोन्ही जीवण जगतात. गुजरातच्या आनंद जिल्ह्यात वसलेले हे ‘धर्मज’ भारतातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून देशातच नाही तर विदेशात देखील प्रसिद्ध आहे. या गावालाच ‘एनआरआय गाव’ (NRI Village) म्हणूनही ओळखले जाते, कारण येथील हजारो कुटुंबे युके, अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये स्थायिक आहेत. या गावची लोकसंख्या केवळ ११,३३३ असूनही, हे गाव इतरांपेक्षा वेगळं ठरलं आहे. या गावात १३ हून अधिक बँकांची शाखा आहेत. पाटीदार समाजातील बहुतेक लोक धर्मजमध्ये राहतात, याशिवाय ब्राह्मण, दलित, बनिया समाजाचे लोक देखील येथे राहत असल्याचे आपल्याला दिसते. (Todays Marathi Headline)

Village

मागील अनेक दशकांपासून या गावातील (NRI) उद्योजक व्यक्तींनी आपली कष्टाची संपत्ती स्थानिक बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये गुंतवली असून २०१४ मध्ये त्यांनी १,००० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती गोळा केली आहे. धर्माज या गावाने भारतात सर्वात श्रीमंत गावांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केले आहे. मुख्य बाब म्हणजे, हे गाव कोणत्याही सरकारच्या मदती विना विकसीत झाले आहे. परदेशात वसलेले या गावातील लोक आपल्या गावाच्या विकासासाठी भरपुर पैसे पाठवतात. हे देशातील पहिले गाव आहे, जिथे लोकांचे भुतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सांगणारे कॉफी टेबलबूक प्रकाशित झाली आहे. या गावाची वेबसाईट आहे, यांचे स्वत:चे गाणे आहे. (Top Trending News)

स्वच्छ रस्ते, आलिशान कार, १००० कोटींहून अधिकची संपत्ती अशी या गावाची ओळख. या गावात आल्यावर श्रीमंतीसुद्धा अतिसामान्य बाब आहे हेच लक्षात येते. बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारख्या कार या गावात अतिशय सर्वसाधारण बाब आहे. गुजरातच्या या गावामध्ये प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती एनआरआय अर्थात अनिवासी भारतीय आहे. या गावातील सर्व रस्ते पक्के असून धर्मज गाव आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न आहे. हे गाव फक्त १७ हेक्टरमध्ये पसरले असून, तेथील समृद्ध वातावरणासाठी ते ओळखले जाते. या गावाची कहाणी १८९५ पासून सुरू होते, जेव्हा जोतराम काशीराम पटेल आणि चतुरभाई पटेलने आफ्रिकेची वाट धरली होती. यानंतर प्रभुदास पटेल मँचेस्टरला पोहोचले आणि Manchesterwala अशी त्यांची ओळख ठरली. (Top Stories)

=======

Weekend System in World : जगातील या देशांमध्ये रविवारची सुट्टी नसते! मग कधी मिळते सुट्टी? जाणून घ्या खास गोष्टी

=======

गोविंदभाई पटेल यमनला गेले जिथं त्यांनी तंबाखूचा व्यवसाय सुरू केला. हळुहळू आफ्रिका, ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा ठिकाणी गुजरातच्या या धर्मज गावातील नागरिक पोहोचू लागले. आजच्या घडीला या गावातील १७०० कुटुंब ब्रिटन, ८०० कुटुंब अमेरिका, ३०० कॅनडा, १५० ऑस्ट्रेलियाला वास्तव्यास असून, हे नागरिक आपलं गाव विसरु शकले नाहीत. २००७ मध्ये या नागरिकांनी गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या गावात डझनांपेक्षा जास्त बँक आणि प्रायव्हेट शाळा आहेत, या बँकांमध्ये गावातील लोकांचीच हजारांपेक्षा जास्ती रक्कम आहे. गावात मॅकडॉनल्ड सारखे पिझ्झा पार्लर आहेत, त्याशिवाय मोठ्या रेस्टॉरेंटची फ्रेंचाइजीदेखील आहे. त्य़ाशिवाय मोठे मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल आहेत. गावातील लोक दर वर्षी १२ जानेवारीला, धर्मज-डे साजरी करतात. यात सामील होण्यासाठी सगले एनआरआय येतात. ते महिनाभर येथे राहून आनंद लुटतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!