उद्या शक्तीची देवता समजल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. संकटमोचन हनुमानाचे स्मरण केल्याने सर्व विघ्न दूर होतात, असे मानले जाते. हनुमानाने आपलं संपूर्ण जीवन रामभक्तीसाठी समर्पित केले होते. हनुमान यांची ओळखच रामभक्त म्हणून जगभर आहे. याच हनुमानाचे नाव सात चिरंजीवींमध्ये देखील घेतले जाते. शिवाय त्यांची अजून एक ओळख म्हणजे बालब्रह्मचारी. हनुमानाने त्यांच्या कार्यकाळात लग्न केले नाही. मात्र काही ठिकाणी त्यांचे लग्न झाल्याचा देखील उल्लेख आहे. आज या लेखातून आपण हनुमानाच्या लग्नाबद्दल माहिती जाणून घेऊया. (Hanuman Jayanti)
पराशर संहिता मध्ये सापडलेल्या कथेनुसार हनुमान जी विवाहित होते परंतु तरीही ते नेहमी ब्रह्मचारी राहिले. जेव्हा मारुती त्याचे गुरू सूर्याकडून विद्या शिकत होते तेव्हा 9 विद्यांपैकी 5 विद्या शिकवल्यावर इतर 4 विद्या शिकण्यासाठी विवाहीत असणे गरजेचे होते. त्यासाठी तशी अटच होती. आजीवन ब्रह्मचारी राहाण्याचे व्रत घेतलेल्या मारुतीला यामुळे बैचेनी होऊ लागली. मारुतीची मनस्थितीत पाहून सूर्यदेवांनी हनुमंताला स्वत:च्या मुलीशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. (Marathi)
सूर्यदेवांची मुलगी सुवर्चला तपस्विनी होती. ज्येष्ठ शुद्ध दशमी, भानू वासरे, रविवार, उत्तरा नक्षत्र, युक्ताशिमा लग्न” हा शुभ मुहूर्त बृहस्पतींनी काढला. ३२ करोड देवांच्या समक्ष सुवर्चला हनुमान यांचे लग्न झाले. भगवान सूर्या देवांनी हनुमंताचे पद प्रक्षालन केले आणि त्यांना आपल्या मुलीशी लग्न करण्याची विनंती केली. आणि मग अशा रीतीने हा सुंदर विवाह संपन्न झाला. अशा प्रकारे मारुतीने विवाहाची अट पूर्ण झाली आणि ब्रह्मचारी राहाण्याचे व्रतही पाळले गेले होते. मारुतीबरोबर विवाह करून सुर्वचला देखील तपस्या करायला गेली. (Todays Marathi Headline)
सुवर्चला सहित हनुमानाचे मंदिर भारतात 4-5 ठिकाणी आहे. त्यातले एक हे तेलांगणाच्या खम्माम या ठिकाणी विवाहीत जोडप्याने येऊन त्या सपत्निक मारुतीचे दर्शन घेतले, तर त्या दांपत्यामध्ये प्रेम, सुख-शांती नांदते, अशी धारणा आहे. येल्लांडू गावात हे मंदिर आहे. या शिवाय अजून काही मंदिर सिकंदराबाद, गुंटूर, राजामुण्ड्रि इतर ठिकाणी आहेत. सूर्यदेवाचा तेज कुणीही सहन करु शकत नव्हतं. त्यांची उर्जा, उष्णता, शक्ती इतकी तीव्र होती की त्यांची पत्नी छाया यांना देखील सूर्याजवळ राहणे शक्य होत नव्हते. एकेदिवशी छाया देवींनी आपल्या पिता विश्वकर्मा यांच्याकडे यावर उपाय सुचवण्यास म्हटले. (Top Marathi News)
यावर विश्वकर्म्याने आपल्या तपश्चर्येचा उपयोग केला आणि त्या दोघांना संतान व्हावी असी इच्छा केली. विश्वकर्म्यांना इच्छित सर्व काही मिळवण्याचे वरदान होते. अशा रीतीने भगवान सुर्य आणि छाया देवी यांच्या आयुष्यात एक अतिशय सुंदर, सूर्यासारखे तेजस्वी आणि छाया देवी सारखे निर्मळ कन्यारत्न आले. त्या कन्येचं नाव सुवर्चला असे ठेवले. सुवर्चला सर्व देवी-देवतांची लाडकी होती म्हणून तिच्या साथीदार कोण असणार यासाठी सर्वांची उत्सुकता वाढत होती. हे जाणून घेण्यासाठी सर्व ब्रह्म देवाकडे गेले आणि त्यांना हा प्रश्न विचारला, या सुंदर कन्येचा योग्य साथीदार कोण असणार? ब्रह्मदेवाने खूप गंभीरतेने विचार केला आणि उत्तरले, “भगवान अन्जनेया अर्थातच हनुमान” (Latets Marathi Headline)
जसा जसा काळ निघत गेला सुवर्चला मोठी होत गेली साऱ्या देवांकडून त्यांना गुरु मानून दैवी शक्ती शिकत गेली. त्याच वेळी हनुमान भगवान सुर्यादेवाकडे दैवी विद्या शिकण्यासाठी आले होते. सुवर्चला त्या तरुण, तल्लख, उत्तम शरीरयेष्टी असलेल्या हनुमानाला बघून आकर्षित झाली. सुवर्चलेने आपल्या आप्तेष्टांना, मित्र मैत्रिणींना आणि पालकांना आपल्या मनातील गोष्ट सांगून त्याच्याशीच लग्न करायचे असे सांगितले. तो पर्यंत हनुमानाच्या नऊ पैकी चार विद्या शिकून झाल्या होत्या. भगवान सूर्य देवाने, साऱ्या विद्या शिकण्यासाठी हनुमानाला आपल्या मुलीशी लग्न करण्याची अट घातली. अंजनेय म्हणाला मी तर आजन्म ब्रह्मचारी आहे, मी कसे लग्न करणार. पण नंतर त्यांनी आपल्या गुरूची आज्ञा पाळायचे ठरवले. (Top Trendning News)
======
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीचे महत्त्व आणि पूजेचा विधी
Hanuman Jayanti : ‘या’ कारणामुळे भगवान रामाने चक्क प्रिय हनुमानाला सुनावलं होता मृत्यूदंड
======
वाल्मिकी रामायणात यांनी हनुमानाच्या मुलाचा उल्लेख सापडतो. पौराणिक कथेनुसार, अहिरावणने राम-लक्ष्मणचे अपहरण केले आणि त्याला पाताळ पुरी येथे नेले. तेव्हा राम-लक्ष्मणच्या मदतीसाठी पातळ पुरी येथे पोहोचलेल्या हनुमानाची भेट पाताळाच्या प्रवेशद्वारावर त्याचा मुलगा मकरध्वजशी झाली. जो दिसायला अगदी वानरासरखा होता. तो हनुमानजीला आपला परिचय देत म्हणाला की मी हनुमान पुत्र मकरध्वज आहे आणि मी पाताळ पुरीचा द्वारपाल आहे. (Top Stories)
मकरध्वजचं ऐकून हनुमान जी संतप्त झाले. तेव्हा मकरध्वज त्यांना त्याच्या उत्पत्तीची कहाणी सांगितली. मकरध्वज म्हणाला, जेव्हा तुम्ही रावणाची लंका जाळली, तेव्हा अग्नीच्या ज्वालांमुळे तुम्हाला घाम फुटण्यास सुरुवात झाली. शेपटीची आग विझविण्यासाठी आपण समुद्रात उडी मारली. त्याचवेळी आपल्या शरीरातून घामाचा थेंब निघाला जो एका माशाने तिच्या तोंडात घेतला आणि ती गरोदर राहिली. काही काळाने अहिरावणाच्या सैनिकांनी समुद्रातून त्याच माशाला पकडून आणले. जेव्हा माशाचं पोट कापण्यात आलं तेव्हा माझा जन्म झाला. त्यानंतर मला पाताळाचा द्वारपाल बनविण्यात आले. (Social News)
( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Chaitra Purnima
- Hanuman
- Hanuman and suvarchala
- Hanuman Jayanti
- Hanuman Jayanti 2026
- Hanuman marriage
- Hanuman wedding
- know about Hanuman marriage
- shriram
- south india
- Telangana
- चैत्र पौर्णिमा
- तेलंगणा
- पराशर ऋषी
- राम
- वाल्मिकी रामायण
- विवाहित हनुमान
- हनुमान
- हनुमान आणि सुवर्चला
- हनुमान जयंती
- हनुमान जयंती 2026
- हनुमान जयंती विशेष
- हनुमानाचे लग्न