Home लाईफ स्टाईल Hair Care : केसांना हेअर डाय केल्याने होऊ शकतात अनेक गंभीर त्रास
लाईफ स्टाईल

Hair Care : केसांना हेअर डाय केल्याने होऊ शकतात अनेक गंभीर त्रास

0
Diwali

आजच्या धकाधकीच्या काळात आपण कामाच्या मागे धावताना स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो. यामुळेच खूपच कमी वयात त्याला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. बदललेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. वाढलेला ताण, चुकीचा आहार आणि प्रदूषण ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जातात. केसांच्या विविध समस्यांना सर्वच कमी अधिक प्रमाणात सामोरे जात आहे. मात्र कमी वयात केस पांढरे होण्याचे प्रमाणात दिवसागणिक वाढत आहे. (Hair Care)

यावर उपाय म्हणून अनेक लोकं केस डाय करतात. आठवड्याला, पंधरा दिवसात केसांना डाय केले जाते, आणि केस काळे दिसतात. काही वर्षांपूर्वी हेअर डायचा वापर केवळ वयस्कर लोक करायचे. मात्र आता अनेक तरुणही नियमितपणे हेयर डायचा वापर करून केस रंगवू लागले आहेत. केस काळे करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे हेअर डाय उपलब्ध आहेत. यात केमिकल बेस्ड डाय, हर्बल डाय आणि इंस्टंट कलरचा समावेश आहे. (Marathi)

हे हेयर डाय लावून लोकं घरीच केस रंगवतात. निश्चीतच या डायमुळे तुमचे केस काळे दिसतात, मात्र यामुळे तुमच्या त्वचेचे मोठे नुकसान होऊ शकते. कारण हेअर डाय वापरताना लोक बहुतेक वेळा फक्त केसांच्या रंगावर लक्ष देतात आणि त्वचेकडे दुर्लक्ष करतात. केसांसोबतच डाय अनेकदा कपाळ, कानाजवळ आणि मानेच्या त्वचेच्या संपर्कात येते, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. या हेयर डायमुळे केवळ त्वचा नाही तर केसांना देखील विविध त्रासांना सामोरे जावे लागू शकते. हेयर डायमुळे नक्की कोणते त्रास होऊ शकतात जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

Hair Care

हेअर डायमध्ये असलेली अनेक रसायने त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. काही लोकांमध्ये यामुळे अॅलर्जी, खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते. जेव्हा डाय त्वचेच्या संपर्कात येते तेव्हा ती त्वचा अधिक संवेदनशील बनवू शकते. काही प्रकरणांमध्ये त्वचेवर लालसरपणा, रॅशेस किंवा सूज देखील दिसू शकते. दीर्घकाळ किंवा वारंवार हेअर डाय लावल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो, त्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. याशिवाय काही लोकांना डाई लावल्यानंतर टाळूवर जळजळ किंवा टोचल्यासारखी भावना जाणवू शकते. ज्यांची त्वचा आधीपासून संवेदनशील असते त्यांच्यात ही समस्या अधिक दिसून येते. त्यामुळे हेअर डाय वापरताना काळजी घेणे आवश्यक मानले जाते. (Top Marathi News)

हेअर डाय हा विविध रसायने वापरून बनवलेला असतो. या रसायनांमुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. हेअर डाय वारंवार लावल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, त्यामुळे केस लवकर तुटू लागतात. शिवाय हेअर डायमधील रसायने टाळूचे नुकसान करू शकतात. यामुळे खाज, जळजळ आणि लालसरपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. काही लोकांना स्कॅल्प ऍलर्जी देखील असू शकते, ज्यामुळे एक्झिमा किंवा डर्माटायटीससारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Latest Marathi Headline)

वारंवार हेअर डाय लावल्याने केसांच्या मुळांवर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे केसगळती वाढते. रसायनांचा जास्त वापर केल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, ज्यामुळे केसांची वाढ थांबते. हेअर डायच्या वारंवार वापरामुळे केसांचा नैसर्गिक रंग निघून जातो. यामुळे केसांचा रंग बदलतो आणि निस्तेज होऊ शकतो. वारंवार डाय केल्याने बदलल्याने त्यांच्या टेक्श्चरवरही वाईट परिणाम होतो. (Top Stories)

========

Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा

========

हेअर डाय लावल्यानंतर त्वचेत जास्त खाज, लालसरपणा किंवा जळजळ जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी त्वरित केस स्वच्छ पाण्याने धुणे गरजेचे असेल. ही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याशिवाय वारंवार हेअर डाई लावणे टाळणे त्वचेसाठी चांगले मानले जाते. हेअर डाय लावण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करावी, जेणेकरून त्वचेला अॅलर्जी आहे का हे कळू शकेल. केसांना डाई लावताना कपाळ, कान आणि मानेभोवती व्हॅसलीन किंवा क्रीम लावल्यास डाय थेट त्वचेवर लागत नाही. चांगल्या ब्रँडचे आणि कमी रसायन असलेला डाय वापरण्याचा प्रयत्न करा. डाय लावल्यानंतर केस आणि त्वचा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुणे देखील महत्त्वाचे आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!