Home लाईफ स्टाईल Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा
लाईफ स्टाईल

Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा

0

सध्या सुरु असलेल्या उन्हाळ्याने लोकांना हैराण केले आहे. उष्णता इतकी तीव्र आहे की, सूर्य आगच ओकत असल्याचाच भास होत आहे. मार्चमध्येच हे हाल आहे तर एप्रिल आणि मे महिना काय असेल याचा अंदाज लावायला देखील लोकांना धडकी भरत आहे. लोकांना आता ही गरमी सहन होत नाही. या उन्हामुळे लोकांच्या तब्येतीवर देखील परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांना या उन्हामुळे विविध त्रास होत आहे. पण उन्हाचा सर्वात जास्त परिणाम हा आपल्या त्वचेवर होत आहे. उन्हामुळे त्वचेचे मोठे नुकसान होत असून, ती काळी पडत आहे. या काळवंडणाऱ्या त्वचेसाठी बाहेरचे अनेक उपाय केले जात आहे. मात्र बाहेरच्या उपायांपेक्षा घरी साधे, सोपे आणि अपेक्षित परिणाम देणारे उपाय करता येत असतील तर? तर का बाहेरचे खर्चिक आणि केमिकल्स असलेले प्रोडक्ट वापरून त्वचा अधिक खराब करून घ्यायची? उन्हामुळे त्वचा खराब होऊ नये यासाठी घरगुती कोणते उपाय करता येतील चला जाणून घेऊया. (Skin Care)

लिंबाचा रस आणि मध
लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे त्वचेवरील टॅन दूर करण्यास मदत करतात. मध त्वचेला मॉइश्चरायझ करतो आणि चमकदार बनवतो. लिंबाचा रस आणि मध समप्रमाणात मिसळून त्वचेवर लावा. १५-२० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसेल. (Marathi)

सनस्क्रीन
सूर्याच्या प्रखर यूव्ही किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करता येतो. अशा वेळी एसपीएफ 30 पेक्षा अधिक सनस्क्रीन वापरले पाहिजे. हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते, परंतु त्वचा अधिक संवेदनशील असेल तर एसपीएफ 30 पेक्षा कमी वापरावे. चेहरा टॅनिंगपासून वाचवायचा असेल तर चेहऱ्यावर मास्क लावून मग उन्हात जावे. असे असले तरी जर पुरेसे ऊन मिळाले नाही तर शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होऊ शकते. (Todays Marathi Headline)

बटाट्याचा रस
बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे टॅनिंग दूर करण्यास मदत करतात. बटाट्याचा रस काढून त्वचेवर लावा आणि १५-२० मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. हा उपाय नियमित केल्यास त्वचा उजळ आणि टॅन फ्री दिसेल. (Latest Marathi News)

Skin Care

टोमॅटो आणि दुध पॅक
टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे टॅन दूर करण्यात मदत करतात, तर दूध त्वचेला पोषण देते. टोमॅटोचा रस आणि कच्चे दूध समप्रमाणात मिसळा आणि टॅन झालेल्या भागावर लावा. २० मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचेचा रंग सुधारेल आणि टॅनिंग लवकर कमी होईल. (Top Marathi Headline)

हळद आणि चंदन
हळद आणि चंदन लावल्याने आपली त्वचा थंड आणि मऊ राहते. ज्यामुळे आपल्या त्वचेला उन्हाळ्याच्या उष्णतेपासून खूप आराम मिळतो. थेट त्वचेवर पडणाऱ्या प्रकाशामुळे देखील आराम मिळतो. (Social Updates)

दही आणि बेसनचा स्क्रब
दहीमध्ये लॅक्टिक ऍसिड असते, जे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, तर बेसन त्वचेला उजळ बनवते. दोन चमचे दही आणि एक चमचा बेसन मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि हातांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. १५ मिनिटांनी पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करा. (Top Trending News)

लक्षात ठेवा
उन्हाळ्यात उन्हापासून वाचण्यासाठी व डिहायड्रेशन होऊ नये यासाठी पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तसेच थंडावा मिळावा म्हणून आपण वारंवार चेहरा धुतो. परंतु बोअरवेलमधून सोडले जाणारे पाणी, त्वचेसाठी थोडे कठोर असते. या पाण्यामुळे केवळ कोरडेपणा सारख्या समस्याच उद्भवत नाहीत तर त्वचेची चमकही कमी होऊ शकते. म्हणूनच तुमच्या त्वचेनुसार योग्य पाण्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे. (Latest Marathi Headline)

=========

Healthy Drinks : उन्हाळ्यातील त्रास कमी करण्यासाठी प्या ‘ही’ खास पेय

Gas : PNG, CNG, LPG आणि LNG यांच्यातला नेमका फरक कोणता?

=========

आपल्या शरीराचे काही भाग असे आहेत जे उघडे राहतात आणि या ते सूर्याच्या अधिक संपर्कात येतात. अशावेळी शरीराचे हे भाग सनस्क्रीनने झाकले जाऊ शकतात. याशिवाय डोळ्यांसाठी काळा गॉगल वापरता येतो. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सनस्क्रीन निवडण्यासाठी त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे. उन्हाळ्यात शरीराला पाण्याचा पुरवठा होईल असा आहार घ्या. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर फळे आणि भाज्या आणि त्यांचे ज्यूस यांचा आहारात समावेश करावा. (Top Stories)

जर तुम्हाला उन्हात काही कामासाठी घराबाहेर जावे लागत असेल तर तुमचं शरीर संपूर्ण झाकणारे कपडे घाला. शरीराच्या कोणत्याही भागाला थेट ऊन लागणार नाही याची काळजी घ्या. पूर्ण बाह्यांचे शर्ट, कुर्ते, फुल पॅन्ट्स किंवा सलवार घाला. तसेच डोळ्यांना गॉगल लावा आणि डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी घाला. तुम्हाला हवे असेल तर उन्हापासून वाचण्यासाठी छत्रीचाही वापर करू शकता. (Social News)

( टीप : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!