Home लाईफ स्टाईल Healthy Drinks : उन्हाळ्यातील त्रास कमी करण्यासाठी प्या ‘ही’ खास पेय
लाईफ स्टाईल

Healthy Drinks : उन्हाळ्यातील त्रास कमी करण्यासाठी प्या ‘ही’ खास पेय

0

उन्हाळा कमालीचा वाढत असून, याचा परिणाम आता आपल्या आरोग्यावर होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाच्या वाढणाऱ्या झळाळीमुळे शरीरातील पाणी कमी होणे, उष्माघात, त्वचेचे त्रास, पचनाच्या समस्या, डोळे जळजळणे, यूरीनला जळजळ होणे हृदयविकार, श्वसनाचा त्रास बळावणे. आदी अनेक समस्या जाणवू लागतात. ऊन कितीही वाढले तरी आपली दैनंदिन कामं थांबवू शकत नाही. त्यामुळे जे लोकं कामासाठी किंवा इतर कारणांमुळे बाहेर पडत असतील त्यांनी आणि जे घरात असतील त्यांनी देखील उन्हामुळे होणारे त्रास टाळण्यासाठी खास उन्हाळ्यात प्यायली जाणारी पेय पिणे उत्तम उपाय आहे. (Healthy Drinks)

या पेयांमुळे आपण हे सर्व उन्हाचे त्रास नक्कीच टाळू शकतो किंवा प्रमाण तर कमी करूच शकतो. उन्हाळ्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिहाड्रेशनची समस्या फार मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशा परिस्थितीत आहारात पेयांचा समावेश करणे फायद्याचे ठरेल. या पेयांमुळे उष्णतेपासून आराम मिळेलच शिवाय शरीर थंड राखण्यास मदत होईल. बाहेर मिळणारी पेय ही साखरेने ओतप्रोत असतात, जे पिऊन तुमचा त्रास कमी तर होणार नाही उलट वाढेल. त्यापेक्षा तुम्ही काही पेय घरीच बनवून पिणे उत्तम असेल. मग उन्हाळ्यात नक्की कोणती पेय प्यावी जेणेकरून तुमचा त्रास कमी होऊ शकतो, पाहूया. (Marathi)

ताक
ताक किंवा मठ्ठा दोन्ही आरोग्यदायी फायदे देणारे आहेत. ताक हे प्रोबायोटिक पेय आहे. हे आतड्यासाठी खूप चांगले आहे. हिंग, चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि दही वापरून बनवले जाते. हे एक अतिशय चवदार पेय आहे. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आपण ताकाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आणि फायदेशीर आहे. (Social Updates)

उसाचा रस
उसाचा रस बाराही महिने उपलब्ध असणारे पेय आहे. उन्हाळ्यात तु्म्ही हा रस पिऊ शकता फक्त रसात बर्फ टाकून पिण्याची चुक करू नये.

Healthy Drinks

कोकम सरबत
कोकम वात आणि पित्तनाशक आहे. कोकम शरीरासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात कोणते पेय प्यावे यावर कोकम सरबत परफेक्ट उत्तर आहे.

नारळ पाणी
नारळ पाणी हे उन्हाळ्यातील एक उत्तम पेय आहे. उन्हाळ्यात याचे नियमित सेवन करावे. हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते. त्यामुळे किडनी स्टोन रोखण्यास मदत होते. तसेतर बाराही महिने नारळाच्या पाण्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यामुळे आपले त्वचा चांगली होण्यासही मदत होते. (Top Trending Headline)

फळांचा रस
तुम्ही संत्री, मोसंबी, कलिंगड यासारख्या फळांचा रस उन्हाळ्यात पिऊ शकता. यातील पोषक घटक एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात आणि फळांच्या रसामुळे शरीर हायड्रेट राहते, उष्णतेपासून दिलासा मिळतो. (Marathi News)

जलजीरा
उन्हाळ्यात जलजीरा पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जलजीरा हे जिरे, आले, काळी मिरी, पुदिना आणि वाळलेल्या कैरीची पावडर वापरून बनवले जाते. या मसाल्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात. ते मळमळ, सूज आणि अपचन दूर करण्यासाठी कार्य करतात. त्यात पुदिन्याची पाने टाकल्याने उन्हाळ्यातही थंडावा मिळतो. (Top Marathi News)

बेलाचा रस
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये ऊर्जावान राहण्यासाठी बेलाच्या रसाचे सेवन करणे खूप जास्त फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळे कोलेस्टेरॉल आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो. (Latest Marathi Headline)

कैरीचे पन्हे
उन्हाळ्यामध्ये कैरीचे अनेक प्रकारे सेवन केले जाते. कैरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कैरीमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. कैरीचे पन्ने खाण्यासाठी अत्यंत चवदार लागते. पन्ने घरी तयार करण्यासाठी कुकरमध्ये कैरी ठेवा आणि चार ते पाच शिट्ट्या करा. त्यानंतर कैरी चांगली मॅश करून घ्या. साखर, भाजलेले जिरेपूड, चवीनुसार काळे मीठ घाला. थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये काही वेळ ठेवा आणि नंतर सर्व्ह करा. (Top Stories)

=======

Skin Care : उन्हाळ्यात काळवंडलेली त्वचा उजळवण्यासाठी घरगुती सिरम ठरू शकते फायदेशीर

=======

काकडी आणि दही
असे म्हटले जाते की काकडीत सुमारे 96 टक्के पाणी असते आणि म्हणूनच उन्हाळ्यात ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. याचे सेवन केल्याने शरीर आतून हायड्रेट राहते, तर सेलेरी आपली पचनक्रिया सुधारण्याचे काम करते. काकडीचे काही तुकडे आणि एक वाटी दही मिक्स करा आणि ज्यूस तयार करा. यामुळे तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमी राहणार नाही. (Social NEws)

गोड लस्सी
लस्सी कित्येकजणांच्या आवडीची असते. तुम्हाला वाढत्या उष्णतेपासून दिलासा हवा असल्यास लस्सी प्यावी. यातील कॅल्शियम थकवा दूर करते.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!