येत्या 19 मार्च रोजी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. या दिवशी हिंदू आणि मराठी नवीन वर्ष सुरु होते. त्यामुळे या दिवसाला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी महाराष्ट्रामध्ये विजयाची गुढी उभारली जाते. सकाळी पारंपरिक वेषभूषेमध्ये शोभायात्रा काढल्या जातात. हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या साडे तीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे. त्यामुळे यादिवशी लोकं विविध प्रकारची खरेदी देखील करतात. खरे तर गुढीपाडव्याला सोने खरेदी करण्याला जास्त महत्त्व आहे. (Gudhipadwa)
गुढीपाडव्याच्या दिवशी काही लोकं आवड म्हणून सोनं खरेदी करतात. तर काही लोकं हे गुंतवणुकीचा विचार करुन सोनं खरेदी करत असतात. या हिंदू नववर्षामध्ये नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी अनेकजण हे सोन्याची किंवा चांदीची वस्तू देखील एकमेकांना भेट देतात. सोने खरेदी करणे म्हणजे केवळ गुंतवणूक किंवा आवड असे नाही. भारतात सोने खरेदी करण्याला मोठे महत्त्व आहे. सोने हा धातू हिंदू धर्मामध्ये शुभ आणि पूजनीय समजला जातो. त्यामुळे हा धातू घरी आणण्यासाठी देखील खास दिवस निवडला जातो. (Marathi)
भारतात, सोने खरेदी करणे हे केवळ आर्थिक गुंतवणूक म्हणून पाहिले जात नाही तर एक सांस्कृतिक प्रथा म्हणून देखील पाहिले जाते. या शुभ दिवशी सोने खरेदी करण्याशी पवित्रता आणि संपत्तीचा संबंध आहे. लोकांचा असा विश्वास आहे की या शुभ दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर आशीर्वाद आणि यश मिळते. गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी केली किंवा मग गुंतवणूक केली तर हे खूप लाभदायक असते असेही ज्योतिषी मानतात. मात्र सध्या सोन्याचे भाव बघता हे अनेकांना शक्य नाही. म्हणूनच पाडव्याला सोन्यासोबतच अजून काय खरेदी केले जाते, चला जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

सोने-चांदी
गुढीपाडवा हा सोने किंवा चांदी खरेदीसाठी अतिशय चांगला आणि शुभ दिवस आहे. या दिवशी तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करता आले नाहीत तरी काही ग्रॅम सोनं तुम्ही खरेदी करु शकता. या दिवशी सोन्या – चांदीच्या दागिन्यांची खरेदी केल्याने घरात सुख -समृद्धी येते, असे मानले जाते. (Top Stories)
धान्य
गुढीपाडव्याला अनेक जण धान्य खरेदी करतात. तांदूळ, गहू आणि इतर धान्यांची खरेदी यादिवशी केली जाते. या दिवशी नवीन धान्य खरेदी केल्यामुळे घरात समृद्धी टिकून राहते, असे मानतात. (Latest Marathi Headline)
भांडी आणि इतर वस्तू
घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तू गुढीपाडव्याला खरेदी कराव्यात. रोज लागणारी भांडी, दुरूस्तीसाठीचे टूल्स इत्यादी वस्तूदेखील या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. (Top Marathi News)
==========
Gudipadwa : गुढीवर तांब्याचाच कलश उपडा का ठेवतात?
Gudhipadwa : गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची योग्य पद्धत काय?
==========
गाडी किंवा घर
गुढीपाडव्याला अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात. काही जण या दिवशी नवीन घर खरेदी करतात. वाहन आणि गृह खरेदीसाठी गुढीपाडवा हा चांगला दिवस आहे.
गोड पदार्थ
प्रत्येक सणाला गोड पदार्थ तयार करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सणाच्या निमित्ताने एकमेकांना गोड पदार्थ दिले जातात. या दिवशी गोड पदार्थांचीही खरेदी केली जाते. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics