Home गाजावाजा स्पेशल Grahan : होळीच्याच दिवशी होणार २०२६ सालातले पहिले चंद्रग्रहण
गाजावाजा स्पेशल

Grahan : होळीच्याच दिवशी होणार २०२६ सालातले पहिले चंद्रग्रहण

0

२०२६ हे वर्ष खगोलप्रेमींसाठी आणि ज्योतिष्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या वर्षात अनेक ग्रहण पाहायला मिळणार आहे. १७ जानेवारी रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण झाल्यानंतर पंधरा दिवसातच चंद्रग्रहण देखील होणार आहे. या २०२६ नवीन वर्षातील पहिले चंद्रग्रहण मंगळवार येत्या ३ मार्च २०२६ रोजी होणार आहे. हे ग्रहण ‘पूर्ण चंद्रग्रहण’ असणार आहे. हे ग्रहण विशेष असण्याचे मुख्य कारण म्हणजे हे ‘पूर्ण’ चंद्रग्रहण आहे, ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या सावलीत पूर्णपणे झाकला जातो आणि त्याला लालसर छटा प्राप्त होते. मार्च महिन्यात होणाऱ्या या ग्रहणावेळी चंद्र सिंह राशीत असणार आहे, ज्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार आहे. (Grahan)

चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ज्यावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी येते. या प्रक्रियेत पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा प्रकाश कमी होतो. साधारणपणे पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण पाहायला मिळते. यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत असतात. तसेच सूर्यग्रहणापेक्षा चंद्रग्रहण पाहणे हे डोळ्यासाठी जास्त आरामदायी असते. हे चंद्रग्रहण आशिया आणि ऑस्ट्रेलिया, तसेच पॅसिफिक बेटांवर आणि उत्तर-दक्षिण अमेरिकेत पाहायला मिळेल. अमेरिकेच्या वेळेनुसार, पहाटे ०३.४४ वाजात चंद्रग्रहण सुरु होईल तर ०९.२३ वाजता संपेल. यानंतर ते भारतात दिसेल. पूर्ण चंद्रग्रहण हे नारंगी रंगाचे दिसू शकते. किंवा काहीसे लालसरही असेल. याला ब्लड मून देखील म्हणतात. (Marathi)

३ मार्च २०२६ च्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. या दिवशी होळीचा सण देखील आहे. या दिवशी चंद्र सिंह राशीत असेल आणि राहू चंद्रावर पूर्ण दृश्य असेल. जेणेकरून हे चंद्रग्रहण उधळून येईल. भारताच्या कोणत्याही भागात चंद्रग्रहणाची सुरुवात, ग्रहणाची सुरुवात आणि ग्रहणाचा मध्य दिसणार नाही. पंचांगानुसार, हे चंद्रग्रहण ३ मार्च २०२६ रोजी, मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला लागणार आहे. भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहण दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील. हे ग्रहण एकूण ३ तास २७ मिनिटे दिसेल. (Top Trending Headline)

Grahan

चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ दुपारी ०३:२० ची असून खग्रास अर्थात पूर्ण चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ ही दुपारी ०४:३४ ची आहे. या चंद्रग्रहणाचा काळ मध्यकाळ संध्याकाळी ०५:०४ मिनिटांनी असणार आहे. खग्रास पूर्ण चंद्रग्रहण संपण्याची वेळ संध्याकाळी ०५:३३ असे तर चंद्रग्रहण संपण्याची वेळ ही संध्याकाळी ०६:४७ ची आहे. खग्रास कालावधी हा एकूण ५९ मिनिटे असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणाचा सूतक काळ खूप महत्त्वाचा असतो. शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहण सुरू होण्यापूर्वी ९ तास आधी लागतो. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. (Latest Marathi Headline)

वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सूतक काळही लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या ९ तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार, या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. सूतक काळ ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत चालेल. या काळात खाण्यापिण्यापासून ते पूजा-पाठ करण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी दैवी शक्ती सक्रिय नसतात. या काळात केलेल्या उपासनेचे कोणतेही फळ मिळत नाही. ग्रहण संपल्यानंतर, स्नान, दान आणि शुद्धीकरण यांना विशेष महत्त्व आहे. (Todays Marathi Headline)

हे खग्रास चंद्रग्रहण केवळ भारतातील पूर्वेकडील राज्ये बंगाल, नागालँड, मिझोराम, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश इ. ग्रहणाच्या पूर्ण शेवटी आणि शेवटी दिसू शकतात. उर्वरित भारतात चंद्रोदय होईपर्यंत ग्रहण संपलेले असेल आणि ग्रहणाचा शेवट झालेला दिसेल. पश्चिम आशियातील पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक इत्यादी देशांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अमेरिका आणि रशिया देखील या दृश्यांचे दर्शन घडणार आहे. (Top Stories)

=========

Two Eclipses Within 15 Days: एकाच महिन्यात दोन ग्रहण

=========

चंद्रग्रहण होळीच्या दिवशी असल्याने अनेक लोकांमध्ये ३ मार्चला होळी साजरी करायची की नाही हा गोंधळ पाहायला मिळत आहे. जाणकारांच्या मते, ०३ मार्च रोजी संध्याकाळी चंद्रग्रहण आणि भद्रा काळ असल्याने, काही ठिकाणी २ मार्च २०२६ च्या मध्यरात्री १२:५० ते ०२:०२ च्या दरम्यान होलिका दहन करणे शास्त्रसंमत मानले जात आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी ३ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ०६:२२ ते रात्री ०८:५० या शुभ मुहूर्तावर प्रदोष काळात होळी पेटवली जाईल. (Social News)

(टीप : येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे दिलेली आहे.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!