Home लाईफ स्टाईल Holi : होळीसाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा नैसर्गिक रंग
लाईफ स्टाईल

Holi : होळीसाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा नैसर्गिक रंग

0

लवकरच आपण सर्व होळीचा अतिशय पवित्र आणि मोठा सण साजरा करणार आहोत. होलिका दहन म्हणजे आपल्यातील सर्व वाईट प्रवृत्ती आणि वाईट गुणांना होळीमध्ये दहन करून एक नवी सुरुवात केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी होते, धुळवड. यादिवशी रंगांची उधळण करत एकमेकांना विविध रंगांमध्ये न्हाऊ घातले जाते. त्यामुळे आता बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या होळीचे रंग रंगपंचमीचे साहित्य विकायला सुरुवात झालेली आहे. परंतु आपण जे बाजारातून रंग विकत घेतो, ते खरंच नैसर्गिक रंग असतात का? ते रंग लावल्याने कोणाला नक्की त्रास होणार नाही ना? याची ग्यारंटी सध्याच्या काळात कोणीच देत नाही. (Holi)

कारण बाजारात नैसर्गिक रंग असल्याचे सांगून सर्रास केमिकल असलेले रंग विकले जातात. या रंगांमुळे परिणामी पुरळ, कट, ऍलर्जी यांसारख्या समस्या धूळवडीच्या दुसऱ्या दिवशी दिसू लागतात. त्यामुळे मधल्या काही काळापासून लोकांमध्ये नैसर्गिक रंगाबद्दल जागरूकता निर्माण होत असून, अनेक लोकं होळीसाठी घरीच रंग तयार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अनेकांना अजूनही घरी रंग तयार करता येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला होळीसाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने नैसर्गिक रंग कसे करायचे याबद्दल सांगणार आहोत. (Festival)

पिवळा
पिवळ्या रंगासाठी तुम्ही बेसन आणि हळद 1/2 सम प्रमाणात मिक्स करून त्याची पावडर बनवू शकता. त्यानंतर आपल्या हाताच्या तळव्यावर ही पावडर घासून पहा, जेणेकरून दोन्ही पदार्थ समप्रमाणात घेतले आहे की नाही याचा अंदाज घेता येईल. यानंतर ते मिश्रण दोन ते तीन वेळा गाळणीद्वारे चाळून घ्या जेणेकरून चांगला पोत मिळेल. तुम्हाला ओला पिवळा रंग बनवायचा असेल तर झेंडूचे फूल किंवा हळद तुम्ही पाण्यात उकळू शकता. (Top Trending News)

Holi

लाल
हळदीमध्ये लिंबाचा रस मिसळा, लिंबाचा रस आम्लयुक्त असतो त्यामुळे हळद लाल होते. त्यानंतर हे मिश्रण सुकण्यासाठी हवेशीर खोलीत ठेवून द्या. लक्षात ठेवा की यावर सूर्यप्रकाश पडू देऊ नका, मिश्रण खराब होईल. लाल रंगासाठी तुम्ही लाल जास्वंदीच्या फुलांचा देखील वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्वंदीचे फुल तीन चार दिवस आधी वाळवून घ्यावी लागतील आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे चूर्ण बनवावे लागेल. त्यानंतर रंगाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ आणि लाल केशर समान प्रमाणात त्यात मिक्स करू शकता. तुम्हाला लाल ओला रंग बनवायचा असेल तर तुम्ही डाळिंबाची साले किंवा बीटरूटचे तुकडे कापून पाण्यात उकळून घ्या. आणि वापरण्यापूर्वी पाणी गाळून घ्या. (Top Marathi News)

गुलाबी
गुलाबी रंग बनवण्यासाठी तुम्ही केशरचा वापर करू शकता. केशर पाण्यात टाकून थोडा वेळ ठेवा त्यानंतर पाणी गाळून त्याचा वापर करा. शिवाय हळदीमध्ये लिंबाचा रस कमी प्रमाणात टाकला तरी गुलाबी रंग तयार होऊ शकतो. लक्षात ठेवा की जर तुम्ही जास्त लिंबाचा रस हळदीमध्ये टाकला तर लाल रंग तयार होईल. शिवाय कोरड्या गुलाबी रंगांसाठी तुम्ही जो लाल रंग बनवला आहे त्यात गव्हाचे पीठ टाकून गुलाबी रंग तयार करू शकतात. (Todays Marathi Headline)

नारंगी
नारंगी रंग तयार करण्यासाठी, संत्र्यांच्या सालींचा वापर करा. संत्र्यांच्या साली मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात थोडी हळद आणि कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण तयार करा. पावडर चांगली एकजीव होईपर्यंत मिसळा. नंतर त्याला चाळणीने चाळून घ्या. हा रंग निसर्गपूरक आहे आणि त्वचेला नुकसान पोहोचवणार नाही. (Marathi News)

हिरवा
हिरवा रंग बनवण्यासाठी पालक किंवा पुदिन्याची पाने वापरू शकता. पालक किंवा पुदिना मिक्सरमध्ये बारीक करून, त्यात कॉर्नफ्लोअर घालून चांगले मिसळा. तयार झालेली पेस्ट उन्हात वाळवून घ्या. वाळल्यानंतर मिक्सरमध्ये पुन्हा बारिक करा. या रंगात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेची काळजी घेतात. (Social Updates)

तपकिरी
तपकिरी रंग येण्यासाठी तुम्ही सुमारे २०० ग्रॅम कॉफी पाण्यात उकळू घ्या. कॉफीचा वास टाळण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी त्यात मिक्स करू शकता. पण लक्षात ठेवा, कॉफीच्या पाण्यामुळे देखील डाग पडतात. त्यामुळे हा रंग शक्यतो वापरला नाही तर योग्य ठरेल. (Latest Marathi Headline)

========

Grahan : होळीच्याच दिवशी होणार २०२६ सालातले पहिले चंद्रग्रहण

 

========

जांभळा
काळे गाजर मिक्सरमध्ये बारीक करून त्यात कॉर्न फ्लोअर मिक्स करून हा रंग बनवता येऊ शकतो. सुगंधासाठी यात गुलाबजल देखील घालू शकता. त्यानंतर ही पावडर सुकवा, छान जांभळा रंग तयार होईल. (Top Stories)

राखाडी
राखाडी रंग मिळविण्यासाठी तुम्ही आवळा किंवा भारतीय गुसबेरीच्या बिया तुम्ही वापरू शकता. वाळलेल्या पावडरला कॉर्न फ्लोअरमध्ये मिसळा आणि कोणतीही काळजी न करता वापरा. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!