Home आरोग्य Health : काळे गाजर आहेत आरोग्याची खाण, सेवनाने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
आरोग्य

Health : काळे गाजर आहेत आरोग्याची खाण, सेवनाने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

0
Vasubaras

हिवाळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गाजर. थंडीची चाहूल लागली की, सगळीकडे गाजर दिसायला लागते. केशरी रंगाचे कोवळे गाजर सहज आपले लक्ष वेधून घेतात. आता गाजर म्हटले की, गाजराचा हलवा, गाजराची कोशिंबीर तर आलीच सोबतच गाजराचा वापर सॅलडमध्ये, विविध पदार्थांमध्ये सर्रास केला जातो. अनेक रेसिपी तर गाजराशिवाय अपूर्ण आहेत. आपण कायमच केशरी, लाल रंगाचे गाजर खाल्ले आहेत. मात्र अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल की, बाजारात काळे गाजर देखील मिळतात. काळे गाजर म्हटल्यावर भुवया उंचावल्या असतील. मात्र आता बाजारात काळे गाजर सहज मिळतात. (Health)

या काळ्या गाजराचा वापर देखील जेवणामध्ये केला जातो. काळ्या गाजराचा वापर सलाड, ज्यूस, सूप किंवा हलवा अशा विविध प्रकारे करता येतो. या गाजराची चव देखील आपल्या सामान्य गाजरासारखीच गोड आणि स्वादिष्ट असते. यामुळे हे गाजर सहजपणे खाल्ले जातात. रोजच्या आहारात काळ्या गाजराचा समावेश केल्याने शरीराला अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते. काळे गाजर देखील लाल गाजर सारखे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असतात. या गाजराचे सेवन केल्याने अनेक व्याधींपासून सुटका होते. त्यामुळे तुम्ही काळ्या गाजराला देखील तुमच्या आहारामध्ये स्थान देऊ शकता. (Marathi)

भारत, अफगाणिस्तान आणि तुर्कीमध्ये काळ्या गाजराचा उगम झाला. मात्र आज जगभरात ठिकठिकाणी काळं गाजर पिकवले जातात. भारतात, काळी गाजर मुख्यत्वे उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये उगवले जातात. आता विविध शहरातही काळी गाजर उपलब्ध होत आहे. काळ्या गाजरात असलेले विशेष पोषकतत्त्वं त्याला आणखी खास बनवतात. गाजरामध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे गाजर केशरी किंवा लाल रंगाचे दिसते. तर काळ्या गाजरांमध्ये अँथोसायनिन रसायन मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे त्याचा रंग काळा असतो. काळ्या गाजराचा रंग वेगळा असला तरीही लाल आणि केशरी गाजराइतकेच काळे गाजर सुद्धा आरोग्यदायी आहे. (HEalth Care)

या काळ्या गाजरात अँथोसायनिन, फायबर, व्हिटॅमिन A, C, K आणि लोह या घटकांचा मुबलक समावेश असतो. अँथोसायनिनमुळे गाजरात अँटीऑक्सिडंट शक्ती असते, जी शरीरातील हानिकारक मुक्त कणांना नष्ट करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. या घटकांमुळे गाजरात दाहक विरोधी आणि कर्करोगरोधक गुणधर्म आढळतात. यासोबतच या गाजराचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. काळे गाजर खाल्ल्याने शरीराला कोणते लाभ होतात चला जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

Health

– काळे गाजर खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्यात असलेले अँथोसायनिन्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेला खोलवर स्वच्छ करतात, मृत पेशी काढून टाकतात आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. शरीरातील डिटॉक्सिफिकेशनचा त्वचेवर दृश्यमान परिणाम होतो. नियमितपणे काळ्या गाजराचा रस पिणे किंवा फेस पॅक लावल्याने चेहरा उजळतो आणि मेकअपशिवायही त्याला निरोगी चमक मिळते.

– काळ्या गाजराचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारण या गजरात बॅक्टेरिया आणि व्हायरसशी सामना करण्याची शक्ती असते. परिणामी सर्दी आणि फ्लूसारख्या संसर्गजन्य आजरांपासून संरक्षण मिळते. (Marathi News)

– काळे गाजर अन्नपचन सुरळीत व्हावं यासाठी फायदेशीर आहेत. यात भरपूर फायबर असते, त्यामुळे गॅसचा त्रास होत नाही. तसेच या गाजरांमुळे आतडे स्वच्छ राहतात, परिणामी पोटाची दुखणी उद्भवत नाहीत. तसंच वजन नियंत्रित राहण्यासही मदत मिळते. फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रित राहते.

– आहारात नियमित काळ्या गाजराचे सेवन केल्यास रक्त शुद्ध होते. इतकेच नव्हे तर यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते. ज्यामुळे रक्ताशी संबंधित समस्या उदभवत नाहीत. शिवाय रक्तवाहिन्यांमध्येही समस्या निर्माण होत नाही. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते. यामुळे शरीराला रोगापासून संरक्षण मिळते. (Top Marathi Headline)

– काळ्या गाजरांचे वृद्धत्वविरोधी गुणधर्म सुरकुत्या रोखण्यास मदत करतात. ते मुक्त रॅडिकल्सशी लढतात, त्वचेच्या पेशींचे संरक्षण करतात आणि कोलेजनची पातळी राखतात. जेव्हा कोलेजन मजबूत असते, तेव्हा त्वचा मजबूत राहते आणि वृद्धत्वाची चिन्हे नंतर दिसतात. अशा प्रकारे काळे गाजर एक नैसर्गिक वृद्धत्वविरोधी टॉनिक म्हणून काम करतात.

– गाजरात व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असल्याने, या गाजराचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच, हे हृदयासाठीही उपयुक्त आहे कारण ते रक्तवाहिन्यांचे संरक्षण करते आणि हृदयविकाराच्या धोक्यांना कमी करते. (Latest Marathi News)

– हिवाळ्यात कोरडी त्वचा ही एक समस्या आहे. काळ्या गाजरातील व्हिटॅमिन ए आणि पाण्याचे प्रमाण त्वचेला हायड्रेटेड आणि मऊ ठेवण्यास मदत करते. काळ्या गाजराचा फेस पॅक लावल्याने ओलावा टिकून राहण्यास आणि कोरडेपणा टाळण्यास मदत होते. ते नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते, त्वचा दीर्घकाळ मऊ आणि चमकदार ठेवते. ज्यांची त्वचा लवकर कोरडी होते त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.

– काळ्या गाजरात व्हीटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. तसेच यातील बीटा कॅरोटिन डोळ्यांसाठी चांगले असते. यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते आणि हे गाजर नियमित खाल्ल्यास चष्म्याचा नंबरसुद्धा कमी होतो. (Top Trending Headline)

========

Abdominal Pain : सतत ओटीपोटात दुखणे धोक्याचे लक्षण? ‘या’ गंभीर आजारांचा संकेत असू शकतो

 Health : रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने आरोग्यास होतात ‘हे’ मोठे फायदे      

========

– काळ्या गाजरामध्ये कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असते. कारण या गाजरात अँथोसायनिन एंथोसाइनिन रसायन असते. जे दाहक- विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. शिवाय काळ्या गाजरातील अँटि ऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. (Top Stories)

– अभ्यासानुसार, काळे गाजर खाल्ल्याने अल्झायमरपासून संरक्षण होते. काळ्या गाजरात आढळणारे अँटी- इंफ्लेमेटरी आणि अँथोसायनिन यामुळे न्यूरोलॉजिकल आजार होण्याचा धोका कमी होतो.

– काळ्या गाजरातील अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीन सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात. काळ्या गाजराचा रस पिऊन त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने हळूहळू टॅनिंग कमी होते.  (Social News)

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!